शनिवार, १८ जुलै, २०२०

३६ हिंदुसमाज

                                         ३६ हिंदुसमाज 

१ 
         संपन्न व सुदृढ हिंदुसमाज हेच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असले पाहिजे. जात, भाषा, पंथ किंवा पक्ष यासारख्या अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार या अनन्य समाजभक्तीच्या आड येता कामा नये. हिंदु समाजरूपी जागृत देवतेची भक्ती करताना आपण आपल्या मनातील सर्व फुटीर प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. आपल्या मार्गात येणा-या सर्व अडचणींवर मात करून आपल्या आंतरिक एकतेचा जीवनदायी संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सिद्ध होऊ या. आणि प्रत्येक हिंदु अंत:करणामध्ये या जीवमान समाजदेवतेची तिच्या अनेकविध गौरवसंपन्न अविष्कारांनी तळपणारी तेजस्वी मूर्ती प्रस्थापित करू या.

२ 
         जो समाज आपल्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आवश्यक गुणांचे संवर्धन करतो आणि त्या उज्ज्वल गुणांची एक परंपरा निर्माण करून अशी एक व्यवस्था उत्पन्न करतो की, ज्यामुळे एका पिढीतून दुसर्या पिढीत त्या गुणांचा विकास होत जावा, तोच समाज आपले जीवन सार्थकी लावून या जगामध्ये एक सुस्थिर व संरक्षित समाज या नात्याने चिरंतन राहतो . अशा गुणांच्या सतत संवर्धनाने तो विशाल होत जातो व विशाल होत असतानाच त्याची विजीगीषाही वाढत जाते . 
     - भय्याजी दाणी 

३ 
        आम्ही जन्माला आलो ती आमची भारतमाता आहे व आम्ही तिचे पुत्र आहोत. आमच्यामध्ये समान विचार, परंपरा, ध्येय व सुखदुःखाविषयी समरसता असल्यामुळे आमचा हा एक समाज आहे. अशा या समाजाच्या सुस्थितीत आमची सुस्थिती दडलेली आहे. आणि याच समाजाचे हित हेच आमचे खरे हित आहे.

४ 
        संघाच्या कामाचा शुभारंभ झाला तेव्हापासून आम्ही असे म्हटले की आम्हास हिंदू समाज संघटित करावयाचा आहे. हिंदुस्थानात हिंदू समाजाच मूळ आणि मुख्य घटक आहे. या भूमीत राष्ट्ररुपाने टिकून राहण्याची जबाबदारी हिंदूसमाजाचीच आहे. या राष्ट्राचे टिकून राहणे, त्याचे जीवन वैभवसंपन्न असणे आणि त्याचे निर्भयतेने परिपूर्ण स्वतंत्र जीवन असणे हेच खरे स्वातंत्र्य होय.         प. पू. श्रीगुरुजी

        आपण हिंदू समाजाचे संघटन करतो. हिंदू समाज हाच या देशाचा कणा आहे. हा देश पुन्हा चांगला व्हायचा असेल तर या देशापुढच्या सर्व समस्या सोडवायला पाहिजेत. व त्यासाठी हिंदू समाज निर्दोष करून त्यात सामाजिक सद्गुण, सामाजिक एकता निर्माण करणे आवश्यक आहे असे आपल्याला वाटते. हिंदू समाजातील सर्व दोष काढून त्याच संघटित करणे हे राष्ट्रीय कार्य आहे असे आपण नि:संदिग्धपणे म्हणतो. हिंदू समाजाचे जीवन हे या देशातील राष्ट्रीयतेचा आधार आहे, हे हिंदुराष्ट्र आहे, असा आपला दृढ विश्वास आहे.

         हिंदु हे नामाभिधान आम्हाला सर्वप्रथम मुस्लिम आक्रमकांनी दिले आणि त्या नावातून तुच्छता प्रगट होते या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. त्याऐवजी आमच्या अवनतीमुळे या शब्दाच्या अर्थाचेही अवमूल्यन झाले हे मी मान्य करीन. हिंदू या शब्दाचा इतिहास पाहिला, हे सहज लक्षात येईल की या शब्दाशी निगडित झालेली घृणेची छटा खूप कालांतराने उत्पन्न झाली आणि तीही हिंदु समाजाच्या पतनामुळे. मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वी, फार अगोदरपासून अन्य देशातील लोक आम्हास हिंदू म्हणूनच ओळखत होते.

        गंगा जहाँ समुद्र से भेंट करती है, वहां उसका वैभव आंक पाना कठीन है | बडा विशाल पाट, मनोरम दृश्य, अगणित जल-वीथियाॅं, अनंत जलराशिपर अनगिन तरंगे | कितना दिव्य कितना विशाल ? किंतु इन सबका मूल कहाॅं ? इन सबका श्रेय तो स्वतंत्र रूप से बहनेवाली गंगोत्री के एक छोटेसे निर्झर को ही प्राप्त है | बस यही बात किसी वर्धिष्णू और जयिष्णू समाज के लिये लागू होती है |जो समाज अपने अभिवृद्धी के लिए उचित गुणों का संवर्धन करता है, और उन उज्वल गुणो की परंपरा का निर्माण कर ऐसी व्यवस्था उत्पन्न कर देता है, कि एक पिढी से दुसरे पिढी में उन गुणों का विकास होता जाय, तो वह समाज अपना जीवित होना सार्थक कर विश्वपटल पर एक सुस्थिर, सुरक्षित समाज के नाम से विद्यमान रहता है |                                                             मा. श्री. भैय्याजी दाणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा