१
ह्या भारतवर्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदूंशी आपली वागणूक बंधुप्रेमाची असली पाहिजे. लोक कसे वागतात आणि काय बोलतात हा प्रश्न नाही. आपले आचरण जर सर्वस्वी दोषरहित असेल, तर आपले सर्व हिंदू बांधव आपल्याकडे आकर्षित झालेच पाहिजेत. - पू . डॉक्टर
२
आपण सर्वांनी राष्ट्रकार्याची फार मोठी जबाबदारी शिरावर घेतली आहे. आपल्या उच्च सिद्धांतांना आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखवू असे आपले म्हणणे आहे. आपली हि कार्यपद्धती आपणाला आपल्या ध्येयाप्रत अवश्य पोहोचविल अशी अटळ श्रद्धा आहे. त्यासाठी आपले विचार आपल्याला आपल्या वागणुकीतून प्रकट करता आले पाहिजेत. - पू . डॉक्टर
३
संघाचे तत्वज्ञान उच्च आहे. संघाची कार्यपद्धती चांगली आहे. पण समाजावर संघाचा प्रभाव पडणार असेल, तर तो स्वयंसेवकांच्या माध्यमातून ! कंदील आहे. त्यात तेल आहे. वात आहे पण कंदिलाच्या काचेला काजळी आली असेल, ती जर स्वच्छ नसेल तर प्रकाश चांगला पडणार नाही. म्हणून आपल्या स्वयंसेवकांची ही मोठी जबाबदारी आहे की आपल्या वागणुकीमुळे संघाला कोणत्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही. - मोरोपंत पिंगळे
४
जब कार्यकर्ता अपने चरित्र की शक्ती के साथ वाणी एवं व्यवहार के माधुर्य का संयोग कर देता है तभी वह दुसरों को एकत्रित करके सभी प्रकार की परीक्षाओं एवं कष्ट में साहचर्य-भावना के साथ खडा कर सकता हैं |. परमपूजनीय गुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा