१
क्षणभराकरिता दिपवून टाकणाऱ्या विजेपेक्षा अखंडपणे प्रकाश देत आमचा मार्ग सुगम करणारा दिवा अथवा एखादा छोटा कंदिल हातात असणे चांगले. विद्युल्लतेच्या तुलनेने दिव्याचा प्रकाश थोडा का असेना तो सतत व अखंड मिळत असल्याने अधिक उपयोगी आहे. क्षणभरासाठी जगाचे डोळे दिपवून टाकणारा शक्तीस्रोत आम्हास निर्माण करावयाचा नसून जगाला अखंड नंदादीपाप्रमाणे उजळून टाकणारा असा शक्तिस्रोत निर्माण करावयाचा आहे. - मा. बाबासाहेब आपटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा