शनिवार, १८ जुलै, २०२०

३० स्वयंसेवक

                                        ३० स्वयंसेवक 
        समाज संघटित करण्यासाठी संघशाखांच्या भक्कम आधारावर निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या विविध गुणांचा उपयोग करीन हा विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात पक्का रुजविणे व त्याला कार्यासाठी उत्साह देणे आवश्यक आहे .                                                        - पू . श्रीगुरुजी 

      स्वयंसेवक, मग तो वयाने मोठा असो किंवा लहान असो, तो राष्ट्राचा जबाबदार घटक असतो. राष्ट्राच्या बाकीच्या घटकांवर जबाबदारी नाही, असे नाही. पण आपण संकल्पपूर्वक जबाबदारी घेऊन या संघात प्रवेश केला आहे म्हणून तुमची जबाबदारी अधिक आहे.                             -पू . डॉक्टर 

       सामान्य जीवन घालवणारे जे स्वयंसेवक सर्व प्रकारचे व्यक्तिगत प्रश्न, मोह, ममता, सुखदुःख, नोकरीधंद्यातील धोक्यांना सामोरे जाऊन सुद्धा आपल्या मनात समाजकार्य करण्याची आकांक्षा घेऊन संघाचे काम करतात तेच संघाचा वास्तविक आधार आहेत.                                                            पू. बाळासाहेब देवरस

मातृभूमीच्या वैभवासाठी अनेक संकटांमध्ये यशापयशाची चिंता न करता जो सर्वस्वार्पण करील आणि असे करण्यात जो स्वतःला ' धन्य ' मानील तो खरा  ' सेवक '   

  आमचा प्रत्येक स्वयंसेवक अन्य सर्व लोकांना अनुकरणीय आणि आदर्श असला पाहिजे. संघ स्वयंसेवक हि एक अशी व्यक्ती आहे कि जी देशासाठी समर्पित आहे, म्हणून याची प्रत्येक कृती निष्कलंक राहील असे सर्वांना वाटले पाहिजे. जेव्हा असे आदर्श स्वयंसेवक सुसंघटित आणि अनुशासनापूर्ण रूपात एकत्र येतील तेव्हा संपूर्ण देशाचे वातावरण बदलून जाईल. आम्हाला हे घडवायचे आहे.                                        - पू . श्रीगुरुजी 

          मार्ग एकच ! जनतेला प्रचिती येऊ द्या की, स्वतःला वाचविणारी शक्ती तिच्या स्वतःजवळ आहे. यासाठी माणसे हवीत जी जनतेची दुःखे आपलीच दुःखे मानतील, जनतेच्या सर्व समस्या समजून घेऊन त्यांच्या निराकरणाचे मार्ग शोधून काढतील, त्या मार्गावरून जाणाऱ्या जनतेबरोबर स्वतः राहून निराशेच्या दाट काळोखात आशेचा किरण दिसेपर्यंतचा आत्मविश्वास निर्माण करीत राहतील ! अशी माणसे या देशात पुरेशा संख्येत उपलब्ध झाली पाहिजेत. 
                    - भय्याजी दाणी 

७ 
           संघाचे तत्वज्ञान उच्च आहे. संघाची कार्यपद्धती चांगली आहे. पण समाजावर संघाचा प्रभाव पडणार असेल, तर तो स्वयंसेवकांच्या माध्यमातून ! कंदील आहे. त्यात तेल आहे. वात आहे पण कंदिलाच्या काचेला काजळी आली असेल, ती जर स्वच्छ नसेल तर प्रकाश चांगला पडणार नाही. म्हणून आपल्या स्वयंसेवकांची ही मोठी जबाबदारी आहे की आपल्या वागणुकीमुळे संघाला कोणत्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही. 

        संघ खरोखर काही करीत नाही, परंतु संघाचा स्वयंसेवक सर्व काही करतो. तो समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सेवारत असतो. संघाने आपल्यासाठी काही मागितले नाही, पण सदैव राष्ट्रासाठी मागितले आहे. म्हणून आमचा दृष्टिकोन असा आहे की, संघ आमचा आहे. आम्ही संघाचे आहोत. याचा प्रभाव सगळीकडे पसरविणार आणि हे शिक्षण जीवनात प्रत्यक्ष असणार. संघाचे शिक्षण आम्हाला स्वार्थ त्याग शिकविते. दुसऱ्यासाठी व समाजासाठी जगण्यास शिकविते. प. पू. श्री गुरुजींचा एकच संदेश सदैव ध्यानात राहावा की  " मैं नही तू ही. "

        ज्याप्रमाणे निखारे कोठेही ठेवले तरी आपल्या आसमंतात ते आपली उष्णता प्रसृत करतात. त्याप्रमाणे आपला प्रत्येक स्वयंसेवक एखाद्या हिऱ्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात आपले सद्गुण तेजस्वितात. तो व्यवहार कुशलता तसेच व्यवहारातील माधुर्य याद्वारे आपला प्रभाव निर्माण करणारा झाला पाहिजे. यासाठी आमची रचना सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे.

१०
       देश की सर्वांगिण उन्नती के लिये आत्मीयता से अपना सारसर्वस्व अर्पण करने के लिए सिद्ध नेता को हम स्वयंसेवक समझते हैं तथा संघ का लक्ष्य इस प्रकार के स्वयंसेवकों के निर्माण का है | इस संघटन में स्वयंसेवक और नेता में भेद नहीं है | हम सभी स्वयंसेवक हैं  यह जानकर ही हम एक दुसरे को समान समझते हैं तथा सबसे समान रूप से प्रेम करते हैं |                     परमपूजनीय गुरुजी

११
       भारताच्या भाग्यलक्ष्मीला प्राप्त करून घेणारे तुमच्या शिवाय दुसरे कोण असू शकतात ? दुसरे कोणीतरी येऊन आपल्या देशाला वैभव प्राप्त करून देतील अशी आशा तुम्ही करू शकता काय ? मग तुमच्या अस्तित्वाचा काय उपयोग ?                               प. पू. डॉ. हेडगेवार
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा