१
प्रभू रामचंद्रांना भगवान का बरे म्हटले जाते ? कारण अगदी बालपणापासून त्यांनी आपल्या आदर्शासाठी आणि स्वधर्मनिष्ठेसाठी दुःखमय आणि कष्टमय जीवन व्यतीत केले म्हणून. अगदी लहान वयात ते विश्वामित्रांबरोबर गेले आणि त्यांनी ऋषीमुनींच्या यज्ञांचे संरक्षण केले. पुढे ते चौदा वर्षे वनात राहिले. तेथे त्यांनी फार मोठा राक्षससंहार केला आणि शेवटी दुष्टशिरोमणी राक्षसराज रावणालाही मारले. त्यांनी आजन्म धर्माचे संरक्षण आणि संवर्धन केले. म्हणूनच आमच्या धर्मानुसार ते अवतारी पुरुष मानले जातात. म्हणूनच आम्ही त्यांना भगवान मानतो. - पू . श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा