शुक्रवार, २४ जुलै, २०२०

६९ आत्मियता

                                              ६९  आत्मियता
       धर्म किती का गूढ असेना , पण साधी गोष्ट अशी आहे की, दुसऱ्याला पीडा देणे हा अधर्म आहे आणि आनंद देणे हा धर्म आहे. आपण आपापसात एकमेकांना अनुकूल बनणे हा धर्म आहे. धारणाशक्ती हे धर्माचे मुख्य तत्व आहे. जो व्यवहार आपलेशी केला असता आपल्याला कष्टदायक वाटेल तो व्यवहार दुसऱ्याशी करू नका. वस्तुतः आत्मीयता हाच समष्टीमार्गाचा आधार आहे. संपूर्ण समाजाविषयी आपलेपणा निर्माण करणे, 

         आम्ही समतेच्या नव्हे तर आत्मियतेच्या आधारानेच विचार करण्यास प्रारंभ केला. परिवारातील लहान मूल व वृद्ध पैसे मिळवित नाहीत म्हणून ते समान होऊ शकत नाहीत. परंतु कर्तव्यबुद्धीने चालणाऱ्या कुटुंबातील सर्वांना आत्मियतेमुळे आपल्या आवश्यकता पूर्ण करून घेणे शक्य होते. म्हणून आम्ही कोणा एका विशिष्ट अंगाचा विचार न करता संपूर्णतेच्या व आत्मियतेच्या विचारावरच विश्वास ठेवतो.                         - पं. दीनदयाळ उपाध्याय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा