मंगळवार, २१ जुलै, २०२०

६० सज्जनशक्ती

                                    ६० सज्जनशक्ती 
          संघ जनमानसात परिवर्तन घडवू इच्छितो.  जेव्हा ते घडून येईल तेव्हा त्या शक्तीचे वर्णन आमच्याकडे असे केले गेले आहे कि ' ज्ञानाय दानायच रक्षणाय ' अशी सज्जनशक्ती समाजात उभी ठाकेल. तिचे अस्तित्व सगळ्यांच्या कल्याणासाठी असते. आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांतून अशी शक्ती अतिशीघ्र उभी झाली पाहिजे. 

            मार्ग एकच ! जनतेला प्रचिती येऊ द्या की, स्वतःला वाचविणारी शक्ती तिच्या स्वतःजवळ आहे. यासाठी माणसे हवीत जी जनतेची दुःखे आपलीच दुःखे मानतील, जनतेच्या सर्व समस्या समजून घेऊन त्यांच्या निराकरणाचे मार्ग शोधून काढतील, त्या मार्गावरून जाणाऱ्या जनतेबरोबर स्वतः राहून निराशेच्या दाट काळोखात आशेचा किरण दिसेपर्यंतचा आत्मविश्वास निर्माण करीत राहतील ! अशी माणसे या देशात पुरेशा संख्येत उपलब्ध झाली पाहिजेत.                                     - भय्याजी दाणी 
        शाखा या दैनंदिन साधनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारीत जनशक्ती जागृत करण्याचे कार्य करीत आहे. संघाचे ध्येय शासन किंवा सत्ता हस्तगत करणे हे नसून जनशक्तीचे संघटन हे आहे. कारण राष्ट्राचा आधार सत्ता नसून जागृत जनशक्ती हाच आहे. म्हणून राजकारणापासून दूर राहून जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन प्रामाणिकपणे जनसेवा करणे हेच संघास अभिप्रेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा