१
आपल्या हिंदुराष्ट्राला सर्वांगीण वैभव प्राप्त करून देऊन त्याचे सर्वदिक श्रेष्ठत्व पुनः प्रस्थापित करणे हे आपले एकमात्र परम लक्ष्य आहे . या लक्ष्याचे यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्या प्रार्थनेत आपण ज्याला ' परम वैभवम ' म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय आहे ते नीट समजावून घेतले पाहिजे . त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राची हि परमवैभवसंपन्न स्थिती निर्माण करून ती सुस्थिर कशी करावयाची हेही समजावून घेतले पाहिजे .
२
आपल्या प्रार्थनेत संघाचा संपूर्ण विचार व संकल्प देखील समाविष्ट केला आहे . व्यक्तीव्यक्तीवर चारित्र्याचे संस्कार करून त्याचे जीवन उत्कृष्ट बनविणे, आपल्या मातृभूमीची भक्ती व राष्ट्राचे यथार्थ स्वरूप आपल्या हृदयात अंकित करणे, या राष्ट्राच्या सेवेसाठी स्वतःचे जीवन सद्गुणसंपन्न व उत्कृष्ट बनविणे, एकेकट्याने नव्हे तर सगळे मिळून संघटित होऊन उभे राहणे, संघटनेद्वारे म्हणजेच सूत्रबद्धतेने आपली शक्ती बुद्धी प्रकट करणे, योग्य पद्धतीने स्वरात स्वर मिळविणे हे जे काही आपल्या कार्याचे स्वरूप आहे, ते आपल्या प्रार्थनेतच प्रकट झाले आहे .
३
प्रार्थनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण विचारप्रणाली आणि पूर्ण कार्यपद्धती आलेली आहे. यासाठी आपण तिला ' संघाचा मंत्र ' म्हणण्यात कोणतीही चूक होणार नाही. - मा. बाबासाहेब आपटे
४
या सुप्त राष्ट्राच्या पुनर्जागरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झालेला आहे. संघाची प्रार्थना हा एक मंत्र आहे. ज्या गोष्टीच्या मनन करण्याने, आपल्या रक्षणाचा मार्ग दिसू लागतो त्यालाच मंत्र म्हणतात. आपल्या प्रार्थनेत संघाचा सिद्धांत, कार्यपद्धती, भूमिका या सर्वांचे दर्शन होते. हि प्रार्थना म्हणजे आपला परिपूर्ण ग्रंथ आहे. - बाबासाहेब आपटे
५
प्रार्थना एक प्रकार का मन्त्र है। हमें केवल उसके शब्दोंका उच्चारण ही नहीं करना है। तो साथ ही प्रत्येक शब्द के उच्चारण के साथ अपने अंदर यह महान आदर्श, अंगीकृत इस महान कार्य के सफलता के लिए कार्य के अनुरूप अपने जीवन को ढालने का यह श्रेष्ठ विचार जागृत करना है।
- पू . श्रीगुरुजी
६
संघरुपी ' वीज निर्मिती केंद्रात ' असे शिस्तबद्ध व समर्पित स्वयंसेवक तयार होत आहेत की, जे खऱ्या व संपूर्ण पुनर्जागरणाच्या ध्येयाने प्रेरित झालेले आहेत. त्यांच्यात ते सर्व गुण आहेत जे राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहेत. दैनंदिन शाखेत प्रार्थना करताना स्वयंसेवक आपल्या मनाने व बुद्धीने ' परम वैभवन् ' च्या सर्वोच्च ध्येयाची आराधना करीत असतात. हेच ध्येय त्यांना प्रयत्नांची परिसीमा करण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा सतत देत असते.
७
आम्हाला आराधनेच्या सांघिक व सामाजिक बाजूकडे अधिक लक्ष केंद्रित करून याद्वारा आत्मोद्धार करावयास हवा. त्यासाठी सांघिक प्रार्थनेचा अवलंब केला पाहिजे. हे सांघिक प्रार्थना अनेकजण बरोबर एकस्वरात म्हणणारे पाहिजेत. यावेळेस अनेक लोक सामुदायिक पद्धतीने श्लोक म्हणतात त्यावेळी त्यांचे दोन गट करून त्यांचे आळीपाळीने श्लोकगायन होणे अधिक हितकारक होते. भगिनी निवेदिता
८
“प्रार्थना का करायची हे आम्हाला निश्चितपणे महित असावयास हवे. प्रार्थना आपल्या जीवनामागील प्रेरणा स्पष्ट करते, विकासाची भूमिका आणि मर्यादा लक्षात घेते. प्रतिकूल परीस्थिती मध्ये सुद्धा, धैर्य आणि उत्साह निर्माण करणारा प्रभावी मंत्र आहे. प्रार्थनेत जीवनाला दिशा देण्याची आणि संपूर्ण जीवन गतिमान करण्याची क्षमता आहे. प्रार्थना हा एक शब्दसमूह आहे जो, संघाच्या कार्यकर्त्यांच्या विकास प्रक्रियेतून व त्यांच्या समर्पणातून काय साध्य करायचे आहे, याचे स्पष्ट संकेत देतो.” मा.सुरेशराव केतकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा