रविवार, २६ जुलै, २०२०

७४ संघटन शक्ती

                                             ७४ संघटन शक्ती 


       आपण शतकानुशतके गुलाम राहिलो, प्रथम मोगलांनी व नंतर ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, कारण आपण असंघटित व दुर्बल राहिलो. उलट जेव्हा जेव्हा आपण संघटित सामर्थ्याचीच पूजा केली तेव्हा तेव्हा आपण वैभवाच्या शिखरावर गेलो. आजही आपण सामर्थ्याचीच कास धरली पाहिजे, संघटित झाले पाहिजे.
                                                                                 - मोरोपंत पिंगळे  

२  
      एक व्यक्ती कितीही शक्तिमान असली तरी जगाच्या धकाधकीत ती टिकू शकत नाही. उलट अशा अनेक व्यक्ती एकत्रित आल्या, एकाच ध्येयाने बांधल्या गेल्या किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्या संघटित झाल्या तर त्यांची शक्ती शतपटीने वाढते व अशी शक्ती समाजहितासाठी कार्यक्षम ठरते.                 - पू. गुरुजी
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा