१
सर्व स्वयंसेवकांना संघकार्याचे तत्वज्ञान व कार्यपद्धती याचे ज्ञान झाले पाहिजे. आपले संघाचे काम दिवसभर चालू असते. लोकांना भेटणे, आपली विचारधारा आणि कार्यपद्धती याचा परिचय करून देणे, आपल्या कार्यासाठी त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे, हे काम आपण रोज करतो. हे काम कौशल्याने करता यावे म्हणून, तसेच त्याच्या पूर्ततेसाठी दैनंदिन शाखा चालविण्याचे शिक्षण ग्रहण करण्यासाठी आपण येथे एकत्रित आलो आहोत. या वर्गात जे शिक्षण आम्हाला मिळेल त्यातील कोणताही भाग नगण्य किंवा कमी महत्त्वाचा न मानता, छोट्या मोठ्या सर्व बाबींकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा