१
जेव्हा फळाची आशा धरून आम्ही काम करतो तेव्हा आम्ही खरोखरच फलाशेच्या बंधनात असतो, स्वतंत्र नसतो. काही मिळण्याची आशा संपत्तीची, सत्तेची वा कीर्तीची असो-आपल्याला काम करण्यास प्रेरित करते. जर ते मिळाले नाही तर कार्य करण्याची आमची प्रेरणाच संपते. याचाच अर्थ असा झाला कि आम्ही लालसेचे दास झालो. कोणताही स्वार्थ मनात न धरता केवळ जग सुधारण्याच्याच इच्छेने कार्य करता येते, पण इथेही ' मी जगासाठी काहीतरी करीत आहे ' या अहंकाराची तृप्तीच कार्याची प्रेरणा बनते. जी सेवा ईश्वराचे चरणी पूर्ण समर्पणाच्या भावनेने केली जाते तीच खरोखरीची उदात्त सेवा होय. - एकनाथजी रानडे

२
आपण आपल्या समाजाचे विनम्र सेवक आहोत. अभावग्रस्त व संकटात सापडलेल्या लोकांना यथाशक्ती मदत करून, समाजसेवा करण्याच्या दृष्टीने आपण समाज उपयोगी होऊ. आम्ही समाजसेवेचे व्रत अंगिकारले पाहिजे. आम्ही लोकांशी सहानुभूतीने, प्रेमाने व्यवहार केला तर तेही आपल्याबरोबर तसाच व्यवहार करतील, नाहीतर ते आपल्याबद्धल उदासीन राहतील. आपली उपेक्षा करतील. समाजसेवेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपला स्वभाव आवश्यकतेनुसार बदलणे हे अपरिहार्य आहे असे समजले पाहिजे.
३
जी व्यक्ती दुसऱ्यांच्या सुखासाठी कष्ट सहन करते, जिला सेवेची आवश्यकता आहे तिची सेवा करते, दीन दुबळ्यांना परमेश्वर मानून त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करते, ती व्यक्ती श्रेष्ठ आहे, ती पवित्र आहे. - वं. मावशी केळकर
४
ग्रामीण भागात राहणारे गलिच्छ, अशिक्षित आणि मूर्ख मानले गेलेले भारतवासी आमचे दैवत आहे. त्यांची पूजा करणे हाच आमचा धर्म आहे. पूजा म्हणजे त्यांची सेवा करणे होय. या बंधूंतील उणिवा दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास जागवून त्या सर्वांना स्वावलंबी बनविणे हीच त्यांची खरी सेवा होय.
५
हमारे देश के महापुरुष सेवाभाव को सदा भगवान के प्रति भक्ती प्रकट करने का सर्वोत्तम प्रकार मानते आये हैं | ऐसा पुरुष सतत यही प्रार्थना करता है कि उसे सेवा करने के लिए अधिक शक्ती तथा क्षमता प्राप्त हो | वह जीवन की पूर्णता इस बात में मानता है कि उसने प्रभू का दिया हुआ सब कुछ उसके सेवार्थ समर्पित कर दिया है | वह कहता है " हे भगवान मैने आपके चरणों में अपने जीवन की झोली खाली कर दी है और इसी में मेरे जीवन की पूर्णता है | " परमपूजनीय गुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा