मंगळवार, २१ जुलै, २०२०

५६ समरसता

                                            ५६  समरसता 

      हिंदू समाजात श्रेष्ठतम दार्शनिक सिद्धांत असूनही कार्याच्या प्रवाहात अशा अनेक वाईट प्रथा व शिथिलता आली ज्यामुळे शत्रुंनी आमचा पराभव केला . यामध्ये सर्वाधिक कष्टदायक म्हणजे जातीच्या नावावर हिंदू हिंदूंमध्ये भेदभाव व अस्पृश्यता होय . यापासून हिंदू समाजाला मुक्त करून एकरस, जागृत, सबल, समृद्ध तसेच स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले जीवन कष्टविले आहे. यामुळेच आज समाजात अनुकूलता दिसते आहे .                 - पू. कुप्प. सी. सुदर्शनजी

       आपल्या धर्मातील मूलभूत तत्वावर निष्ठा असेल तर मग कसल्याही उग्र परिवर्तनासाठी आपली सिद्धता राहू शकते. आपले शब्द आणि कृती यातील दरी नष्ट करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. ज्या सामाजिक दुष्ट रुढीमुळे लोक दुःखी कष्टी आहेत त्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी संपूर्ण देशभर व्यापक प्रचाराची सदैव अत्यंत आवश्यकता आहे. मानवनिर्मित सर्व प्रकारची असमानता आणि अन्याय दूर करून समाज शुद्ध केला पाहिजे. तसेच व्यक्तिगत कल्याण आणि सामाजिक विकास यासाठी सर्वांना समान संधी प्राप्त करून दिली पाहिजे.                                                                                                                                                       -डॉ. राधाकृष्णन 
          शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आमच्यात काही विकृती, उच्चनीचतेचे भेद, आर्थिक विषमता, मागासलेपणा, जातिवाद इत्यादी दोष उत्पन्न झाले असावेत. परंतु या दोषांचे हत्यार परजून कोणी विदेशी शक्ती आमच्या ' स्व  ' त्वाचेच अपहरण करू पाहतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांची ही आसुरी आकांक्षा आम्ही धुळीस मिळवू. आमच्या या घरगुती समस्या आहेत. आम्ही त्या परस्पर मिटवून टाकू. व्यक्तिगत लाभासाठी किंवा सामाजिक दृष्टीने अवनत स्थितीतून बाहेर येण्याच्या इच्छेपोटी आम्ही कोणत्याही विदेशीयांचे हस्तक बनणार नाही. आपल्यातूनच उत्पन्न होणाऱ्या ' जयचंदा ' पासून आम्हाला अत्यंत सावध राहिले पाहिजे. ज्या राष्ट्राचे तसेच समाजाचे आपण अवयव आहोत त्या समाजाचे हित आपण नीट ओळखले पाहिजे.
                                                                                                                              - बाबासाहेब आंबेडकर 
        आपल्या मातृभूमीला परमवैसंपन्न करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पण यासाठी सर्वप्रथम आपल्याला एकसंध समाज घडवायचा आहे. जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद यांना कायमची मूठमाती द्यायची आहे. अखिल हिंदू समाज स्नेहमही धाग्यांनी गुंफायचा आहे. आपल्या वत्सल, संवेदनशील, पवित्र वागणुकीने आम्ही सर्वांची हृदये जिंकू. सर्वांना एक नवा विश्वास आधार अन् दिव्यत्वाचा वसा देऊ. हे जर झाले तर भारत वैभवशाली बनण्यास कितीसा उशीर !

        आपल्या देशाच्या वैभवसंपन्न जीवनासाठी, विजयी जीवनासाठी आपण सर्व मिळून निश्चयाने म्हणूया " आम्ही हिंदू समाजाला परस्परांतील भेदभावनांतून मुक्त करू !  समाजांतील उच्चनीचतेच्या, प्रशासृश्याच्या विकृती पूर्णपणे नाहीशा करू ! आपल्या समाजाचे सामाजिक जीवन निर्दोष करू ! आत्मियतेच्या आधाराने शोषणमुक्त करू ! सारे हिंदू एक आहोत या एकत्वाच्या भावनेने त्याला समर्थ करू ! आपल्या भूमीच्या श्रेष्ठ विचारांची सांगड आधुनिक काळातील विज्ञानाशी घालून सामूहिक परिश्रमाने आपल्या समाजाला वैभवसंपन्न करू ! 

         अस्पृश्यता हा आपल्या समाजातील विषमतेचा एक अत्यंत दुःखद व दुर्दैवी प्रकार आहे. अगदी पूर्वीच्या काळी अस्पृश्यता अस्तित्वात नव्हती. ती काळाच्या ओघात आगंतुकपणे रूढ झाली असे अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे. काहीही असले तरी शेकडो वर्षे ही अनिष्ट रूढी चालत आली आहे. अस्पृश्यता चूक आहे व ती सर्वतोपरी गेली पाहिजे यासंबंधी आता कुठेही दुमत नाही. तेव्हा आपल्या सर्वांच्या मनात सामाजिक विषमतेच्या उच्चारणाचे ध्येय जरूर असले पाहिजे. विषमतेने आपल्या समाजात कशी विघटना व दुर्बलता आली हे लोकांसमोर स्पष्ट केले पाहिजे, ती दूर करण्याचे उपाय सांगितले पाहिजेत व सगळ्यांचा आपल्या परीने या प्रयत्नास हातभार लागला पाहिजे. यासाठी विषमतेवर टीका करताना संपूर्ण समाजासंबंधी आत्मीयतेची भावना सदैव अंतःकरणात असली पाहिजे.

         जणु काही आवश्यक असलेली जीवनशक्तीच लुप्त होऊन जावी अशी आपल्या समाजाची स्थिती अत्यंत विचित्र झाली आहे. या बाबतीत आम्ही योग्य प्रकारे चिंतन केले पाहिजे. भंगी समाजाने पिढ्यामागून पिढ्या समाजाचा मैला वाहण्याचे तेच ते काम करीत राहावे हे किंवा ' माझ्या दहा पिढ्या हेच काम करीत आल्या, कुणाला ना कुणाला हे करावेच लागणार आहे तेव्हा माझी पुढील पिढीही हेच काम आपोआप करीत राहील ' असे एखादा भंगी म्हणेल हे आज अगदी असंभव आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जगभर ज्या ज्या शक्ती क्रियाशील आहेत त्या सर्वांचे ज्ञान आणि भान आम्हास असले पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेऊन आम्हास कित्येक आमुलाग्र बदल घडवून आणावे लागतील.

        आमच्यात सद्बुद्धी उत्पन्न झाली असेल तर सर्वांना सामावून घेण्याची तपश्चर्या आम्हास करावीच लागेल. आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. मनुष्याच्या स्पर्शाने अपवित्रता उत्पन्न होते असा आरोप करून त्या स्पर्शाने देवतांचे पावित्र नष्ट होईल असे आपण समजतो तेव्हा आपण देवाच्या देवत्वाचीच हेटाळणी करतो आहोत हे देखील आमच्या लक्षात येत नाही. अशा प्रकारे आपण संप्रदायांच्या मंदिरात पूजा-साहित्य घेऊन प्रवेश करतो तेव्हा विश्वनाथाच्या मंदिराचे विश्वदार बंद करून त्याची अवहेलनाच करीत असतो. जे मनुष्याला कलंकित करते, त्यास क्षुद्र बनवते त्यास ' पुण्य ' कसे म्हणता येईल.                                                             रवींद्रनाथ ठाकूर

           जनतेमध्ये जनार्दन पाहण्याची श्रेष्ठ दृष्टी हीच आमचा राष्ट्र कल्पनेचे हृदय आहे. या दृष्टीमुळेच समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या दिव्य अश्या पूर्ण रूपाचा अंश पाहण्याची प्रेरणा आम्हास मिळते. त्यामुळे सर्व व्यक्ती सारख्याच पवित्र असून आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव पाहणे निंदनीय आहे. अशा प्रकारे समाजसेवेच्या भावनेला आमच्या संस्कृतीमध्ये ईश्वराच्या पूजेचे पवित्र रूप दिले आहे.                                                                                                                              प . पू. श्रीगुरुजी
१०
        हममें से प्रत्येक को सामाजिक असमानता को दूर करने का लक्ष्य सामने रखना चाहिए | हमें लोगों को स्पष्ट रूप से समझाना चाहिए की किस प्रकार इन सामाजिक विषमताओं के कारण हमारा समाज असंघठीत और कमजोर हो गया  | मुक्त होने का मार्ग भी हमें उन्हें बताना चाहिये | समाज के प्रबुद्ध वर्ग के ऊपर इसका विशेष दायित्व है | उन्हें इस प्रकार से विचार और व्यवहार करना चाहिए जिससे  सामाजिक समानता उत्पन्न हो सके और साथ ही साथ समाज में किसी प्रकार की कटूता जागृत न हो | हमे समानता इसीलिए चाहिए की समाज मे सद्भाव सामंजस्य एवं सहयोग का वातावरण स्थापित हो | जो लोग इस मूलभूत दृष्टिकोन को न समझ कर लिखते, बोलते या कार्य करते हैं वे उस उद्देश को ही क्षति पहुंचाते हैं जिसे वे साधना चाहते हैं |

११
       हमारा कार्य अखिल हिंदू समाज के लिए होने के कारण, उसके किसी भी अंग की उपेक्षा करने से काम नही चलेगा | सभी हिंदू भाईयों के साथ, फिर वे किसी भी उच्च या नीच श्रेणी के समझे जाते हों,  हमारा बर्ताव हर एक से प्रेम का होना चाहिये | किसी भी हिंदू भाई को दुत्कारना पाप है |                                    डॉ. हेडगेवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा