१
समाजकार्याचे जूं आपल्या मानेवर घेऊन ते परिश्रमपूर्वक व यशस्वीपणे ओढू शकणारच समाजात आत्मविश्वास निर्माण करू शकतो. कोणाला शिव्याशाप देऊन, दोषारूप करून किंवा उपहास करून हे काम होणार नाही. सत्तेची अभिलाषा तर सोडाच पण तशा इच्छेचा स्पर्शही यांच्या मनास होऊ शकणार नाही, अशांची खरी सहानभूती, आत्मीयता आणि सदैव त्यागपूर्वक परिश्रमशीलता यातूनच हे कार्य यशस्वी होईल. - स्व. भैय्याजी दाणी
२
आत्मविश्वास व आत्मनिरीक्षण या दोन आधारावरच आपल्याला आपले कार्य उभे करावयाचे आहे. आमचे सर्वच बरोबर, चूक नाहीच हा आत्मविश्वास, व आमची प्रत्येक गोष्ट चूक आहे, मूर्खपणा आहे, ती नष्ट केली पाहिजे असे आत्मनिरीक्षण दोन्ही बरोबर नाहीत. दोन्हींचे संतुलन ठेवून विचार केला तर श्रेष्ठ तत्वज्ञानाचे आधारावर आजच्या साऱ्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता आपण आपल्या समाजात निर्माण करू शकतो हे लक्षात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा