शनिवार, १८ जुलै, २०२०

३९ समन्वयी संस्था

                                    ३९ समन्वयी संस्था 
            संघ पावरहाऊस प्रमाणे आहे. त्यामध्ये वीज निर्माण होते. हि वीज पावरहाऊस मध्येच राहील हे शक्य नाही. त्यामध्ये निर्माण झालेली वीज बाहेर जाऊन सर्व प्रकारचे कार्य करील. त्या विजेने दिवे लागतील, यंत्रे चालतील, पंखे फिरतील, कारखाने वाढतील. अगदी त्याप्रमाणेच संघाच्या पावरहाऊसमध्ये वीज निर्माण होईल व ती समाजाला प्रभावित करील. त्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांचे सर्व क्षेत्रात प्रवेश करणे सुरु झाले आहे.  

           संघाचे कार्य, सिद्धांत, अनुशासन, सुव्यवस्था, ध्येयवाद इत्यादी श्रेष्ठ गुणांची भिन्न भिन्न क्षेत्रात अभिव्यक्ती होत रहावी अशी आपली अपेक्षा आहे. आपण स्वयंसेवकांना हेच सांगत असतो कि ते ज्या कोणत्या कामात असतील तेथील जीवनात संघाचा आदर्श प्रस्थापित करावा, संघाच्या दृष्टीने ते क्षेत्र प्रभावयुक्त क्षेत्रात परिवर्तित करावे व त्याचा संघकार्याच्या पोषणासाठी व वाढीसाठी उपयोग करावा.  

     संघाचे काम सर्वव्यापी आहे. परंतु सर्वव्यापी कशाप्रकारे आहे? जसा प्रकाश सर्वव्यापी आहे. पण तो सर्व कार्य करीत नाही. अंधार दूर करून सर्वांना तो मार्ग दाखवितो. हे योग्य प्रकारे समजले   तर   काही   गडबड होणार नाही.राष्ट्रजीवनात विविध प्रकारे काम करणाऱ्यांना आयता शिजलेला माल आपण देणार नाही. हे आपले काम नाही. सिद्धांतांवर अटळ राहून, त्याचा व्यवहारात प्रत्यक्ष अविष्कार करण्याचा विचार विविध क्षेत्रांत मग्न झालेल्यांनी केला पाहिजे हेच योग्य आहे.

    अर्ध्या शतकाहून अधिक वर्षे रा. स्व. संघ हिंदू संघटनेचे कार्य करतो आहे. कशासाठी ? तर हिंदू समाज संघटित नाही म्हणून. हे हिंदू संघटनेचे कार्य केवळ संघानेच करावे व इतरानी स्वस्थ रहावे अशी या मागे अपेक्षा नाही. तर या देशातील प्रत्येकाने हे आपले कार्य आहे असेच मानून करीत राहिले पाहिजे. संघटना कितीही निर्माण झाल्या तरी उद्दिष्ट हिंदूसंघटनेचे एकच रहावे. संघाने हे काम ५० वर्षांपूर्वीच काळाची गरज ओळखून सुरू केले आहे. ते सर्वांनीच करणे या राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. याची जाणीव आता समाजातील सर्व स्तरांमध्ये उत्पन्न होत आहे.

५ 

      समाजाच्या सर्व अंगातून व क्षेत्रांतून आवश्यक ते परिवर्तन घडवून आणण्यासाठीच संघाचा जन्म झाला आहे. यासाठीच संघाच्या स्वयंसेवकांनी सर्व क्षेत्रे व्यापून टाकली पाहिजेत. सर्वत्र त्यांचा प्रभाव असला पाहिजे. केवळ संघ स्थानावर दक्ष-आराम करीत राहण्यासाठी संघाचा जन्म झालेला नाही. आता संघ केवळ संघशाखेपुरता राहिलेला नाही. संघस्थान, संघशाखा या आधाररूप आहेत. पण याच आधारावर सारा समाज व्यापून टाकावयाचा आहे.

     अशाप्रकारे यापुढे आपल्याला दोन प्रकारांनी काम करायचे आहे. संघकार्य वाढावे, प्रभावी व्हावे, मोठ्या प्रमाणात संघात स्वयंसेवक यावेत, त्यांनी संस्कार ग्रहण करावेत. संस्कार ग्रहण केलेल्या स्वयंसेवकांमधील काही संघकार्यात राहावेत आणि काही सामाजिक जीवनाच्या अंगोपांगांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कामाला लागावेत.

  सामाजिक जीवनाच्या सर्व अंगोपांगात प्रवेश करून त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तसेच एकाच्या जागी दहा कार्यकर्ते देण्याची क्षमता संघापाशी आहे हेही सिद्ध करावे लागेल. आता संघाची ही अवस्था आली आहे.

    संघाचे कार्य सिद्धांत, अनुशासन, सुव्यवस्था, ध्येयवाद इत्यादी श्रेष्ठ गुणांची भिन्न भिन्न क्षेत्रात अभिव्यक्ती होत रहावी अशी आपली अपेक्षा आहे. आपण स्वयंसेवकांना हेच सांगत असतो की ते ज्या कोणत्या कामात असतील तेथील जीवनात संघाचा आदर्श प्रस्थापित करावा, संघाच्या दृष्टीने ते क्षेत्र प्रभावयुक्त क्षेत्रात परिवर्तित करावे व त्याचा संघकार्याच्या पोषणासाठी व वाढीसाठी उपयोग करावा.

    एक ही राष्ट्र के लिए परंतु विभिन्न क्षेत्र में काम करने वाले हम लोगों को एक-दूसरे के साथ मेल करके चलना है तथा एक राष्ट्रत्व का बोध अपने हृदय में जागृत रखना है | अपने विभिन्न कार्यक्रमों द्वारा अपने साथ जो-जो लोग आते हैं उनको राष्ट्रभक्ती का योग्य संस्कार देने के लिए अपने संघ-कार्य की  ओर आकृष्ट करना अपना धर्म है |                     परमपूजनीय गुरुजी

१०

      आता आम्हाला आपल्या कार्यास सामाजिक बैठक देऊन समाज जीवनाच्या सर्व अंगोपांगांमध्ये जावे लागेल. म्हणून हे करताना वैयक्तिक व कौटुंबिक अडचणी कितीही का येवोनात ही जबाबदारी उचलावयाचीच असा विचार आपण सर्व स्वयंसेवकांनी करावा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा