१
आपण शतकानुशतके गुलाम राहिलो, प्रथम मोगलांनी व नंतर ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, कारण आपण असंघटित व दुर्बल राहिलो. उलट जेव्हा जेव्हा आपण संघटित सामर्थ्याचीच पूजा केली तेव्हा तेव्हा आपण वैभवाच्या शिखरावर गेलो. आजही आपण सामर्थ्याचीच कास धरली पाहिजे, संघटित झाले पाहिजे.
- मोरोपंत पिंगळे
२
कल्पना को कृति में आने के लिए हाथ पैरोंकी प्रमुखतः आवश्यकता होती है। ध्येयवादी कवि की कल्पना प्रत्यक्ष साकार करने के लिए तरुण आगे बढ़ेंगे, तभी राष्ट्र का अभ्युदय होगा। एकाध कीर्तन का व्याख्यान कितना कितना भी वीररस प्रधान हो, वृद्ध जन उसकी प्रशंसा करके चुप बैठे जायेंगे। पर राष्ट्र का जीवन गरम रक्त के तरुणों पर ही अवलंबित होता है। क्षात्रवृत्ती के बगैर राष्ट्र जिंदा नहीं रह सकता। जो स्वयं का बचाव नहीं कर सकता, वह मनुष्य नहीं कायर है। इस कायरता से मुक्ति पाकर पौरुष का जो स्वीकार करेगा उसी व्यक्ती अथवा उसी राष्ट्र को विश्व में प्रतिष्ठा प्राप्त होगी। - लोकनायक बापूजी अणे
३
आज आपल्या देशाच्या सीमांचा चारी बाजूंनी संकोच होत आहे. आता तर ' कैलास ' वासी होण्याची पण सोय राहिली नाही. कैलास समाविष्ट झाला आहे चीनमध्ये. देशाचा संकोच सुरू झाला याचे कारण म्हणजे आपण आपली दृढता सोडली. कुलूप केव्हा झाले ? जेव्हा चोरीची कल्पना आली तेव्हा ! आमच्यावर आक्रमणे केव्हा सुरू झाली ? ज्यावेळी आम्ही टणकपणा गमावला तेव्हा ! कणखर मनाची, ताठ मानेची, छाती पुढे काढून चालणारी, ठामपणे पाऊल उचलणारी, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणारी, हिंदुत्वाला थोडा देखील मारक विचार मनातही न येऊ देणारी अशी एक एक व्यक्ती आम्हाला घडवायची आहे. बाबाराव भिडे
४
स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर होण्यासाठी ' शक्ती ' आवश्यक आहे. शक्ती असेल तर सर्व प्रकारची प्रगती शक्य आहे, संकटापासून मुक्ती आहे. आणि तरच सन्मान प्राप्ती आहे. शक्तीमुळेच समाज, परिश्रम व स्वावलंबन याद्वारा सारे वैभव खेचून आणू शकतो. स्वतःजवळ शक्ती नसेल तर दुसऱ्यासमोर याचना करावी लागते. आणि हे लज्जास्पद तर आहेच परंतु परिणामी घोर हानिकारक आहे. प. पू. श्री गुरुजी
५
भौतिकवाद, इस्लाम, ईसाईयत व जगातील अन्य कोणतेही तत्त्वज्ञान आम्ही त्यांना थारा दिला नसता तर यशस्वी झाले नसते. जोपर्यंत मनुष्य खराब अन्न, शरीराचे पाप यांनी दुबळा होत नाही तोपर्यंत कोणताही रोगजंतू त्याचेवर हल्ला करीत नाही. धडधाकट माणसावर विषाक्त रोगजंतूंचा काडीइतका परिणाम होत नाही. अजूनही वेळ गेली नाही, आपण आपले वागणे बदलू या. स्वामी विवेकानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा