१
आपले चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वछ असले पाहिजे. त्याचबरोबर आपण व्यवहारनिपुण आणि कार्यकुशलही असले पाहिजे. विशुद्ध चारित्र्य, आकर्षक व्यक्तिमत्व आणि सर्वगामी बुद्धिमत्ता यांचा त्रिवेणी संगम जेथे असतो, तेथे कोणत्याही सत्कार्याची उत्तम भरभराट होते. एखादा मनुष्य कितीही चांगला असेल, पण त्याच्या ठिकाणी जर व्यवहारबुद्धी नसेल, तर त्याला यश मिळत नाही. - पू . श्रीगुरुजी
२
संघस्थान हे संस्कारस्थान आहे, तेथे आपण जे संस्कार ग्रहण करतो त्या संस्कारांना अनुकूल असा आपला व्यवहारही असला पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांचा वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार संस्कारानुकूल आहे कि नाही हे बाहेरील लोक बारकाईने पाहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा