मंगळवार, २१ जुलै, २०२०

९० तात्कालिक समस्या

                                     ९०  तात्कालिक समस्या 
          
       तात्कालीक समस्यांच्या संदर्भात संघाची भूमिका हीच आहे की आपल्या नित्यसिद्ध शक्तीच्या आधारानेच स्वाभाविकरित्या साऱ्या समाजाला जेवढे जास्तीत जास्त बरोबर घेऊन जाणे शक्य होईल, त्या प्रमाणात त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जावा. जेव्हा केव्हा समस्या उत्पन्न होते, तेव्हा लोकांची मागणी असते की, संघाने आपली सारी शक्ती त्यासाठी पणास लावावी. त्यांना वाटते की नाही तरी ही संघटना तरी कशासाठी उभारली आहे ?  या बाबतीत आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे. ज्या प्रमाणात समस्येचे निराकरण करण्याची आपली शक्ती असेल, त्याच प्रमाणात समस्येची सोडवणूक होऊ शकते. समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन ही शक्ती आपण अधिक वाढवली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा