मंगळवार, २१ जुलै, २०२०

५२ इतिहास

                          ५२ इतिहास 

          भारताचा इतिहास पराजयाचा नसून गौरवशाली संघर्षाचा आहे. जगातील कोणत्याही देशामध्ये धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एवढा दीर्घकालीन त्यागमय आणि यशस्वी संघर्ष झालेला नाही जेवढा भारतातील साधूसंत आणि वीरांगनांनी केलेला आहे. जगात अनेक संस्कृतींचा जन्म झाला आणि काळाच्या कराल आघातांनी शतकातच त्यांचा विनाश झाला, परंतु हिंदु संस्कृती हजारों वर्षांच्या भीषण आघातानंतरही जिवंत आहे.                                                                                                             - डॉ. नित्यानंद 
       आपल्या समाजजीवनात अनेक संकटे, अडचणी आल्या. काही काळ पारतंत्र्य आले. परंतु त्या कालखंडात आम्ही आमचे जीवन सुरक्षित ठेवून पुन्हा राष्ट्राचे उत्थान कसे केले या इतिहासाचे विस्मरण होता कामा नये. आपल्या गौरवशाली इतिहासाचे अध्ययन आपण केलेच पाहिजे.    - पू . श्रीगुरुजी 
            हमारा इतिहास ही हमारा सच्चा पथ-प्रदर्शक हो सकता है। इतिहास में हमारा जो गौरवमय स्वरूप अंकित है उसको अपना कर ही हम अपनी राष्ट्रीयता का परिचय दे सकते है और अन्य राष्ट्रोंके समक्ष सम्मानपूर्ण स्थान प्राप्त कर सकते है।  स्वाधीनता को स्व-तंत्रता के रूप में परिणत कर हम उसका अनुभव करने लगे, इसी में हमारे ऐतिहासिक ज्ञान की सार्थकता है।  यही हमारे इतिहास का सन्देश है ।                                - श्री राघवाचार्य 

     एखाद्या राष्ट्राचा संस्कृतीचा इतिहास म्हणजे त्या राष्ट्राच्या विचारांचा आचारांचा आणि संपादितांचा इतिहास होय. वाङ्मय आणि कला ही आपल्याला राष्ट्राचे विचार निवेदित करतात. इतिहास आणि समाज रचना यावरून राष्ट्राच्या कृत्यांची व त्याने संपादित केलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते.

     भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा. तुमच्या मागे जो अनंत जीवन प्रवाह आहे, त्याचे येथेच्छ प्राशन करा आणि पुढे पहा. पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा. आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा. आम्ही प्रथम त्या तत्त्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत. त्या रक्ताला समजले पाहिजे की जे आमच्या नसानसातून वाहत आहे. आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. भूतकालातील ती श्रेष्ठता व चेतना, त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे.                                                                                                            - स्वामी विवेकानंद
      इतिहास सांगतो की पहिल्यांदा फुट, त्या फुटीतून दुर्बलता व नंतर परकीयांना विजयाची संधी अशी परिणाम-परंपरा निर्माण होते. माणूस स्वभावत:च स्वार्थाकडे आकृष्ट होतो आणि या स्वार्थापुढे उत्तमोत्तम गुणही मातीमोल बनतात. वैयक्तिक मान-मरातब आणि गौरव यांच्या अभिलाषेने परकीयांशी हातमिळवणी करून आपल्याच देशबांधवांवर आघात करण्याची प्रवृत्ती आपल्या इतिहासात विपुल प्रमाणात आढळते. याचा परिणाम म्हणून आपल्याला दुःखद पराभव पहावे लागले.                                       प . पू. श्रीगुरुजी
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा