१
भगवंताचा आम्हाला आशीर्वाद आहे अशी आमची खात्री आहे. आमचे कार्य आक्रमणाचे नसून शांततेचे व संघटनेचे आहे. हिंदू धर्म व हिंदू संस्कृती याकरिता हे पवित्र कार्य केले पाहिजे व आपली उज्ज्वल संस्कृती राखली पाहिजे व वृद्धिंगत केली पाहिजे. तरच या सुधारलेल्या जगात आपला व आपल्या समाजाचा निभाव लागेल.
- पू . डॉक्टर
२
आपला संघ परमेश्वराच्या कृपादृष्टीला सदैव पात्र झाला आहे व होत राहील असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आपल्या अंतःकरणातील भावना परमेश्वराला कळतात. आपले अंतःकरण पवित्र व शुद्ध आहे. त्यात पापाचा अंशदेखील नाही. - पू . डॉक्टर
३
आमच्या सर्व व्यवहाराला संघनिष्ठेचे पवित्र अधिष्ठान लाभले असेल तर या सर्व व्यवहारांना देखील पावित्र्य व उदात्तता प्राप्त होईल. आमचे वैशिष्ट्य यातच आहे की आमचे प्रत्येक कार्य संघाच्या ईश्वरी प्रेरणेने केले जाते. ही प्रेरणा नसेल तर आमच्यात व इतर प्राणिमात्रात काहीच फरक राहणार नाही. इतक्या उच्च मनोभूमिकेतून आचरण करण्याची सवय लावायला हवी. प. पू. डॉ. हेडगेवार
४
हे वीर आत्म्यांनो, ज्यांना बेड्यांनी जखडून टाकले आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी, जे दुःखाच्या भाराने लादले गेले आहेत त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि जे अज्ञानाच्या घनघोर अंधारात बुडून गेले आहेत अशांची हृदये प्रकाशित करण्यासाठी पुढे चला ! ऐका ! वेदांत डंका पिटून घोषणा करीत आहे ' अभि: ' निर्भय बना, ईश्वराची ही पवित्र वाणी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या हृदयाची तार छेडण्यास समर्थ होईल. स्वामी विवेकानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा