रविवार, १९ जुलै, २०२०

४६ संघटन

                                                ४६  संघटन 
१      
            संघटना ही राष्ट्राची  प्रमुख शक्ती आहे. जगात कोणतेही प्रश्न सोडवावयाचे असतील तर ते सामर्थ्याच्याच जोरावर सुटतात. ज्या राष्ट्रात सामर्थ्य नसते, त्या राष्ट्राच्या मनातील कोणतीही इच्छा सफल होत नाही. पण सामर्थ्यशाली राष्ट्राला वाटेल त्यावेळी वाटेल ती गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे करता येते.                  - पू . डॉक्टर 
             एका परंपरेने युक्त व समान संस्कारांनी सुविकसित झालेल्या समाजाचेच उत्तम संघटन बनते. स्वैर, स्वच्छंदी वर्तन न ठेवता अनुशासनबद्ध जीवन जगणारा व एकाच जीवनहेतूवर लक्ष केंद्रित करून चालणारा समाज सुसंघटित होतो. हजारो मने एकाच विशुद्ध प्रेमाने उत्स्फूर्त होतात तेथेच संघटना संभवते. लाभापेक्षा आणि भोगापेक्षा त्यागाकडे ज्याची प्रवृत्ती असते, ज्याचे सदस्य वज्रनिश्चयी आणि दृढव्रती असतात, तो समाजच खऱ्या अर्थाने सुसंघटित होतो. तो सगळ्या जगाचे मार्गदर्शन करतो.                                                                   पू . श्रीगुरुजी 
           आम्हाला आपला हा हिंदुसमाज इतका सुसंघटित आणि शक्तिशाली करायचा आहे की, इतर समाजांच्या मनात हिंदूंबद्धल अगदी पाहताक्षणीच आदर उत्पन्न झाला पाहिजे. येथे साध्य व साधन एकरूप आहेत. संघटन हेच साध्य व संघटन हेच साधन. संघटित असणे हीच प्रत्येक जिवंत समाजाची स्वाभाविक अवस्था असते. केवळ सुसंघटित समाजच आपल्या सगळ्या समस्या यशस्वी रितीने सोडवू शकतो हे आम्ही विसरता काम नये. 

४ 
    समान उन्मयकारी आदर्श रखनेवाले हम सबको संघटित होना होगा | इस संघटन में और इस संघटन द्वारा हम लोग अंध:कार और विनाश की समस्त विरोधी शक्तीयोंका सामना करेंगे | संघटनमें ही विजय की निश्चिती है |
                                                                                          श्री मां 
       सर्व प्रकारच्या शक्तीचा मूळ स्त्रोत असतो समाज. अन्य गोष्टी केवळ साधनमात्र असतात. म्हणून प्रथम समाजाला विशुद्ध व प्रबळ बनविणे आवश्यक आहे. समाजातील सूत्रबद्ध व राष्ट्रभक्तीने परिपूर्ण अशा व्यक्तींच्या संघटनेतच राष्ट्राची शक्ती विहित असते. संघटनेने समाजात आत्मविश्वास उत्पन्न होतो आणि बलशाली व आत्मविश्वाससंपन्न समाजच आपले जीवन व्यवस्थित रीतीने चालवू शकतो. म्हणून हिंदू समाजाचे संघटन हेच आमचे ध्येय आहे. त्याची निर्मिती हे आपले परमकर्तव्य आहे.

        प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये संपूर्ण समाजाबरोबरच एकात्मतेचा भाव जागृत करणे हा आमच्या संघटन या शब्दाचा अर्थ आहे. मी वेगळा नाही, निराळा नाही, स्वतंत्र नाही, तर या संपूर्ण समाजाचा मी एक घटक आहे. जसा शरीराचा एक एक अवयव हा शरीराचा घटक असतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षुद्र अहंकाराला मूठमाती देऊन उच्च अशा विचारांमध्ये समाविष्ट व्हावे. परंतु अहंकाराचा संपूर्ण लोप करण्यासाठी वरील संस्कार रोज एकत्रित येण्याने व सामुदायिक कार्यक्रमातून संघटित मनाच्या निर्मितीने होतात. सामूहिक कार्यक्रमातून सामूहिक मनांची निर्मिती होते या मनोविज्ञानाच्या सिद्धांतावर संघाची कार्यपद्धती उभी आहे.

७ 
          संघटन शास्त्रात अहंकार, आत्मस्तुती, बलप्रयोग किंवा व्यक्तिगत प्रतिष्ठा यांना किंचितही स्थान असू शकत नाही. ' संघटन '  या शब्दातच हा अर्थ ध्वनित होतो की संघटनेत व्यक्तिगत अभिमानाचे अस्तित्वच असंभव आहे. परंतु त्याचबरोबरच संघटनेसाठी आदर्श व्यक्तित्वाच्या गुणांचीही अत्यंत आवश्यकता आहे. अन्य क्षेत्रातही आपल्या गुणांचा अनेक प्रकारांनी आदर होईल आणि त्या गुणांमुळे आपण किर्तिमान बनू शकू यात संशय नाही. परंतु आपण आपले सर्वस्व संघटनेच्या कार्यात झोकून देऊ शकू तेव्हाच या गुणांचे सार्थक होईल.            प. पू. डॉ . हेडगेवार

      संघटनेचा पाया अधिक बळकट व मजबूत झाल्याखेरीज त्यावर संघटनेची वास्तू स्थिर होणार नाही. कच्च्या पायावर उभी असलेली वास्तू प्रारंभी मनोहरी व सुंदर अवश्यमेव दिसते परंतु झंजावातात ती क्षणार्धात जमीनदोस्त होते. म्हणून जितकी भव्य व विशाल वास्तू उभी करण्याचा आपला संकल्प असेल तितक्या अनुपातात त्या वास्तूचा पाया विस्तृत व मजबूत असण्याची आवश्यकता असते.                                               डॉ. हेडगेवार

         ज्या कार्याची सर्वप्रथम व नेहमीसाठी आवश्यकता असते ते करणे हे आमचे कर्तव्य आहे. बाकीच्या गोष्टी जीवनाच्या सुखदुःखात महासागराच्या लाटांप्रमाणे येत जात राहतील. राष्ट्रीय चेतनायुक्त, सुसंघटित सुसूत्र असे सामर्थ्य निर्माण करण्यावाचून अन्य काहीही आपल्याला करायचे नाही.                             प. पू. श्रीगुरुजी

१०
        हमारे संघटन का कार्य जो समाज के प्रति आत्यंतिक भक्ती के कारण उत्पन्न होता है, स्व-प्रेरित तथा स्व-आधारित है | अपने स्वीकृत ध्येयपथपर हमारी पूर्ण एकाग्रता ने ही जो की शाश्वत, शक्तिशाली, आत्मनिर्भर राष्ट्रजीवन के मूलाधार रूप सिद्धांतों के परिपूर्ण ज्ञान से उत्पन्न होती है, हमारे इस संघटन को सतत विकासशील और अजेय बनाया है |                                                          श्रीगुरुजी

११
     आपण दीनदुबळे राहिल्यामुळे अत्याचाऱ्यांना अत्याचार करण्याची दुर्बुद्धी व इच्छा सहज होते. जो स्वतःला मदत करू शकत नाही त्याला कोणीच मदत करीत नाही. इतकेच काय प्रत्यक्ष परमेश्वर देखील त्याला पाठमोरा होतो. ' अजापुत्रं बलि दद्यात देवो दुर्बल घातक: ' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून या अत्याचाऱ्यांना पायबंध घालण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे एकत्वाची भावना निर्माण करून हा हिंदू समाज संघटित व प्रभावशाली करावयाचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा