१
ज्या मानवसमूहाची जीवनप्रणाली, भविष्यकालीन आकांक्षा, इतिहास, परंपरा आणि वंदनीय महापुरुष एकच असतात, त्या भूमिबद्धल श्रद्धा ठेऊन, तिला आपली माता मानून, स्वतःला तिचा पुत्र मानतात, अशा विशिष्ट जीवन जगणाऱ्या समुदायाचेच राष्ट्र बनते, या दृष्टीने हे आपले हिंदुराष्ट्र आहे. हे एक ऐतिहासिक निर्विवादसत्य आहे .
२
संघाला फक्त हिंदूंचा हिंदुस्थान हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवायचे आहे. हिंदुस्थान हा देश हिंदूंचाच आहे. इतर राष्ट्रांप्रमाणे हे हिंदू लोकांचे राष्ट्र असून, या हिंदू राष्ट्रात हिंदू म्हणतील ती पूर्व दिशा असली पाहिजे. हेच संघ ओळखतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इतर गोष्टी जाणून घेण्याची जरुरी नाही. - पू . डॉक्टर
३
हे राष्ट्र हजारो वर्षांपासून हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र बनवायचे नाही, यांची स्थापनाही करायची नाही. याची घोषणा करायची नसून हिंदू राष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. - पू. श्रीगुरुजी
हे राष्ट्र हजारो वर्षांपासून हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र बनवायचे नाही, यांची स्थापनाही करायची नाही. याची घोषणा करायची नसून हिंदू राष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. - पू. श्रीगुरुजी
४
केवळ जमिनीच्या कोणत्याही तुकड्याला राष्ट्र म्हणत नाहीत. एक विचार, एक आचार, एक संस्कृती तसेच एक परंपरेत जे लोक प्राचीन काळापासून राहत आहेत त्या लोकांचेच राष्ट्र बनते. या देशाला आमच्यामुळेच " हिंदुस्थान " हे नाव मिळालेले आहे. दुसरे लोक सामोपचाराने येथे राहू इच्छित असतील तर त्यांनी खुशाल रहावे आम्ही त्यांना कधीही मज्जाव केलेला नाही, करणार नाही. पारशी समाजाच्या उदाहरणामुळे हिंदू समाजाच्या उदात्ततेचा पुरेपूर परिचय होतो. आमचे संघटन यासाठीच आहे की, आपण आपल्या घरात सन्मानाने जीवन कंठू शकू. - पू . डॉक्टर
५
हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान. आपली भूमी आणि तीवर राहणारा समाज यांनी मिळून बनलेले हे नाव आहे. या जनसमुदायास ' भारतीय राष्ट्र ' असेही म्हणतात.
गंगेस येऊन मिळणारे सारे प्रवाह गंगाजल बनवून जातात तसेच पिढ्यान् पिढ्या इथे राहणारे लोकही येथील राष्ट्र जीवनाची समरस होऊन गेले आहेत. ईसाई, पारशी मुसलमान त्यांचा उद्गम काही का असेना, कोणतीही उपास्य देवता ते मानीत असोत, या या भूमीत जन्मल्यामुळे तसेच येथे पालन-पोषण झाल्यामुळे या भूमीलाच जो सर्वतोपरी पूजनीय मानतो अशी प्रत्येक व्यक्ती या या भारतीय राष्ट्राचा घटक मानला जाणे योग्य होईल. हा हा देश एक आहे अविभाज्य आहे अनंत आहे.
- श्री सुब्रह्मण्य भारती
६
यह ईश्वर ही जानता है कि तुम्हारे रक्त के बिंदू-बिंदू में कितने सहस्र वर्षोंका संस्कार जमा है, कितने सहस्र वर्षों से यह प्रबल राष्ट्रीय जीवनस्त्रोत एक विशेष दिशा की और प्रवाहित हो रहा है | और क्या यह समझते हो कि वह प्रबलधारा, जो प्राय: समुद्र के समीप बहुत चुकी है, पुन: उलटकर हिमालय की हिमाच्छादित चोटियों पर वापस जा सकती है ? यह असंभव है | यदि ऐसी चेष्टा करोगे तो स्वयं ही नष्ट हो जाओगे | इस जातीय जीवनस्त्रोत को पूर्ववत् प्रवाहित होने दो | हां, जो बांध इसके रास्ते मे रुकावट डाल रहे हैं, उन्हें काट दो, इसका रास्ता साफ करके प्रवाह को मुक्त कर दो, देखोगे, यह राष्ट्रीय जीवनस्त्रोत अपनी स्वाभाविक गति हे फूट कर आगे बढ निकलेगा और यह राष्ट्र अपनी सर्वांगीण उन्नति करते करते अपने चरम लक्ष्य की ओर अग्रेसर होता जायेगा | स्वामी विवेकानंद
७
हमारे हिंदुराष्ट्र का मूल ही है - स्वयंशासित, आत्माभिमुख समाज जीवन | हम कभी शासनाभिमुख, शासनावलंबी या शासन केंद्रित नहीं रहे | सत्ताभिमुख होकर प्राचीन सभ्यताऍं नष्ट होती है | आत्माभिमुख रहकर हमारी सभ्यता अनादी अनंत बनी है | तो आवश्यकता यह है की, वर्तमान भौतिकवादी और कुछ हद तक सत्तोन्मुख समाज जीवन को आत्माभिमुख मनस्वी बनाया जाय | हिंदू राष्ट्र के पुनर्निर्माण की हमारी यही कल्पना है | हमारा समाज जीवन स्वयंभू ,स्वयं अपने सामर्थ्य से स्वायत्त, स्वयंशासित और सुसंगठीत होकर खडा होगा तभी हमारा यह चिरंतनत्व टिक सकता है |
८
या भूमिमध्ये प्राचीन काळापासून हिंदू-समाजाचे एक राष्ट्रजीवन अस्तित्वात आहे. अंतर्बाह्य अशी पूर्ण एकात्मता येथे आहे. जीवनाचा उद्देश एक आहे. धर्म, सद्गुण, परंपरा व सत्संस्कारयुक्त संस्कृती एक आहे. हे सर्व साक्षात् जाणणारे व मार्गदर्शन करणारे महापुरुष पण एक आहेत. स्वार्थ-हितसंबंध पण एक आहेत. असा अंतर्बाह्य एकता असलेला आपला हिंदु-समाज अतिप्राचीन काळापासून एक राष्ट्र म्हणून येथे आहे, हे सत्य आहे. प. पू. श्रीगुरुजी
९
राष्ट्र ही जीवमान संकल्पना आहे. शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात याचा विकास होत असतो. एखाद्या विशिष्ट भूमीवर राहणारा मानव समुदाय जेव्हा त्या भूमीबरोबर तादात्म्य असल्याचा अनुभव करतो, जीवनामध्ये विशिष्ट गुणांचे आचरण करीत समान परंपरा आणि महत्त्वाकांक्षा यांनी युक्त होतो, सुख-दुःखाच्या समान स्मृती आणि समान शत्रू-मित्रत्वाचे अनुभव घेत परस्पर हितसंबंधात परिणत होतो, संघटित होऊन आपल्या श्रेष्ठ जीवनमूल्यांच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील होतो, आणि या परंपरेप्रमाणे जीवन आचरण करीत आणि ती परंपरा अधिकाधिक तेजस्वी करण्यासाठी महान तपश्चर्या , त्याग, परिश्रम करणाऱ्या महापुरुषांची शृंखला निर्माण होते तेव्हा पृथ्वीवर अन्य मानव समुदायांपासून भिन्न असे सांस्कृतिक जीवन प्रगट होते. या भावनात्मक स्वरूपालाच ' राष्ट्र ' असे संबोधिले जाते. पं. दीनदयाळ उपाध्याय
१०
हे हिंदुराष्ट्र आहे, या राष्ट्राची जबाबदारी हिंदू समाजावरच आहे. जगामध्ये भारताचा सन्मान व अपमान हिंदू वरच अवलंबून आहे. हिंदू समाजाचे जीवन वैभवशाली होण्यानेच या राष्ट्राचा गौरव वाढणार आहे, हे सत्य निश्चयपूर्वक समजून संघाने पुन्हा सर्वांसमोर मांडले आहे. इतकी वर्षे आम्ही हे करीत आलो आहोत व कोणाच्याही मनात याविषयी संभ्रम राहण्याचे काहीच कारण नाही. प. पू. श्रीगुरुजी
११
यह
राष्ट्र हजारों वर्षों से हिंदू राष्ट्र हैं ।हिंदू राष्ट्र बनाना नहीं है, इसे
स्थापित नहीं करना है।इसकी घोषणा भी नही करनी है अपितु हिंदू राष्ट्र का सर्वांगीण
विकास करना है । प. पू.श्री गुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा