मंगळवार, २१ जुलै, २०२०

५० कार्यपद्धती

                                           ५० कार्यपद्धती
            आपण सर्वांनी राष्ट्रकार्याची फार मोठी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. आपल्या उच्च सिद्धांतांना आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखवू , असे आपले म्हणणे आहे. आपली हि कार्यपद्धती आपणाला आपल्या ध्येयाप्रत अवश्य पोहोचवील अशी आपली अढळ श्रद्धा आहे. त्यासाठी आपले विचार आपल्याला आपल्या वागणुकीतून प्रकट करता आले पाहिजेत.                                                                       - पू . श्रीगुरुजी  

           आज संघाच्या विचारांची लाटच सर्वत्र आलेली आहे. राष्ट्र विघातक धोरणे व संघटनांच्या विरोधात तसेच राष्ट्राला हितकारक असलेल्या गोष्टींचे समर्थन करणारे हिंदू मन सर्वत्र थोड्या अधिक प्रमाणात दिसू लागले आहे. संघाने मांडलेली राष्ट्र कल्पना आणि त्या बद्धलची कार्यपद्धती यांची सुरुवातीला टिंगलच करण्यात आली होती पण आज त्याच गोष्टी सर्वत्र सन्मानीत केल्या जात आहेत. अनेक नेतागण, पक्ष आणि संघटनांना संघासारखे संस्कारित आणि शिस्तबद्ध मनुष्यबळ त्यांचेकडे नाही याबद्धल त्यांना हेवा वाटतो. 

           कोणत्याही संस्था किंवा संघटनेची कार्यपद्धती तिच्या ध्येय व हेतू प्रमाणे ठरते. संघाची पण एक विशेष कार्यपद्धती आहे. संघाला जे करायचे त्यासाठी एक विशेष प्रकारचा स्वयंसेवक निर्माण करायचा आहे. तो चारित्र्यवान असेल, अनुशासित असेल, ज्याच्यामध्ये सामूहिक दायित्वाचा बोध असेल आणि सामाजिक जबाबदारीची पण जाणीव असेल अशा स्वयंसेवकांचे संपूर्ण भारतात एक संगठन उभे  राहील अशी कार्यपद्धती आम्ही विकसित केली आहे. 

        पद्धती, रचना, व्यवस्था याशिवाय कोणताही सिद्धांत हा फक्त कोरा सिद्धांतच राहील. त्याचा काही उपयोग नाही. श्रेष्ठ लक्ष्य हे केवळ उच्चारल्यामुळे सिद्ध होत नाही. त्याचप्रमाणे समाज संघटित करा म्हटल्यामुळे समाज संघटित होत नाही. प. पू.  डॉक्टरांचे वैशिष्ट्य हे की उच्च सिद्धांतांना व्यावहारिक रूप देण्यासाठी त्यानी एक कार्यपद्धती निर्माण केली.                                                                            प. पू. श्रीगुरुजी

        अपने चारों और हम जो अन्य कार्य-पद्धतीयां देखते हैं निश्चय ही वे शोर मचाने में विश्वास करती है | संघ के पास ऐसी कार्यपद्धती है जिसने पुनरुत्थानशील एवं पुन: संघठीत राष्ट्रजीवन के स्वप्न को साकार करने में अपनी उपादेयता सब दृष्टियों से प्रमाणित कर दी है |                                                परमपूजनीय गुरुजी


      आमची कार्यपद्धती एकमुखी आहे. सूर्यमालेत एकच सूर्य असतो. त्याच्या आसपास सर्व ग्रह फिरतात. सूर्याभोवती भ्रमण करण्यातच त्यांचे हित असते. ही निसर्गसिद्ध पद्धतीच आपण स्विकारली आहे. आपल्या आसेतुहिमाचल पसरलेल्या विस्तिर्ण समाजात एक सूर्यसदृश्य हृदयपिंड आपल्याला निर्माण करायचा आहे. एकात्मता साधण्यासाठी इतरत्र आढळणाऱ्या प्रणालींना दूर सारून आम्ही ही पद्धत स्विकारली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा