१
मनुने एका मासळीचा जीव वाचविला व त्याला वाढविले . पुढे हा मासा एवढा वाढला, मोठा झाला कि प्रलयकाळी त्याने मनुच्या नौकेचे रक्षण केले .त्यामुळे सर्व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका टळला .राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्या माशाप्रमाणे भारतीय संस्कृतीच्या बीजाचे रक्षण करून संपूर्ण विश्वात या संस्कृतीचा भव्य, तेजस्वी अविष्कार घडवून आणेल, याच दृष्टीने आपण संघाकडे पाहिले पाहिजे .
२
मातृभूमीवरील उत्कट, सक्रिय निरपवाद आणि ज्वलंत निष्ठा हा स्वतंत्र विकासोन्मुख व गौरवसंपन्न राष्ट्रजीवनाचा प्राण आहे . आपण हिंदू तर मातृभूमीवरील अत्यंत उदात्त व दैवी प्रेमाचे वारस आहोत . प्रत्येक हिंदुच्या अतःकरणातील तो प्राचीन परंतु आज सुप्त असलेला स्फुल्लिंग प्रज्वलित होऊ दे . त्या सर्व ज्वाला एकत्र होऊन एक प्रचंड यज्ञकुंड रसरसू दे . मातृभूमीवर आजवर झालेली सर्व आक्रमणे, तिचे झालेले अपमान त्या यज्ञीय ज्वालेत जळून खाक होतील आणि भारतमातेला तिच्या मूळच्या अखंड स्वरुपात सुप्रतिष्ठित करण्याचे आपले स्वप्न साकार झालेले दिसेल .
३
वनवासी भागात, गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्या बांधवांजवळ जाऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे, त्यांना निरनिराळी साधने उपलब्ध करून देणे, त्यांचे ऐहिक जीवन अधिक सुखी होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या अतःकरणात परमेश्वराच्या शुद्ध भक्तीच्या आधारावर हिंदू धर्माचा अभिमान जागृत करून एकात्मतेचा बोध निर्माण करणे यासाठी आपण प्रत्यक्ष परिश्रम करण्याची आवश्यकता आहे . दुसरा कोणी करील असे म्हणून चालणार नाही .
४
समाज संघटित करण्यासाठी संघशाखांच्या भक्कम आधारावर निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या विविध गुणांचा उपयोग करीन हा विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात पक्का रुजविणे व त्याला कार्यासाठी उत्साह देणे आवश्यक आहे .
५
एका परंपरेने युक्त व समान संस्कारांनी सुविकसित झालेल्या समाजाचेच उत्तम संघटन बनते. स्वैर, स्वच्छंदी वर्तन न ठेवता अनुशासनबद्ध जीवन जगणारा व एकाच जीवनहेतूवर लक्ष केंद्रित करून चालणारा समाज सुसंघटित होतो. हजारो मने एकाच विशुद्ध प्रेमाने उत्स्फूर्त होतात तेथेच संघटना संभवते. लाभापेक्षा आणि भोगापेक्षा त्यागाकडे ज्याची प्रवृत्ती असते, ज्याचे सदस्य वज्रनिश्चयी आणि दृढव्रती असतात, तो समाजच खऱ्या अर्थाने सुसंघटित होतो. तो सगळ्या जगाचे मार्गदर्शन करतो.
६
आमच्या मनात हिंदुमात्रासाठी प्रेम असले पाहिजे. सगळ्या हिंदुसमाजात आपल्याला परका म्हणून कोणीही नाही, अशी आपली धारणा असली पाहिजे. ही भावना ठेवून, आम्ही प्रत्येक हिंदूंशी मैत्री केली पाहिजे. केवळ स्वयंसेवकांचाच नव्हे तर सर्व वयाच्या आणि सर्व स्तराच्या हिंदूंचा आम्ही परिचय करून घेतला पाहिजे. अखिल हिंदुसमाजाला आम्ही आपलेपणात गोवले पाहिजे.
७
कोणतेही गुलाम राष्ट्र क्रमशः उन्नती करीत स्वातंत्र्य प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होत नसते. प्रथम स्वातंत्र्यप्राप्ती करून ते उन्नतीचे सर्व मार्ग मोकळे करते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समाजात राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना आणि स्वातंत्र्याची आकांक्षा हि केवळ एकच उन्नती आवश्यक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी मार्गक्रमण करीत असता आवश्यक त्यावेळी बलिदानाचीही प्रेरणा निर्माण होऊ शकेल.
८
एखाद्या राष्ट्राने युद्धामध्ये सोने, हिरे इत्यादी जडजवाहीर गमावले तरी ते कालांतराने पुन्हा प्राप्त केले जाऊ शकते. परंतु जे राष्ट्र आपले स्वत्व गमावते आणि आत्मगौरव विसरते, त्याला आपली भौतिक धनसंपत्ती मिळविणे अशक्य होते. कारण स्वत्व नाही म्हणजे नीतिमत्ता, आत्मविश्वास नाही; आणि राष्ट्रीय जीवनही नाही. स्वत्व आणि स्वाभिमान कोणत्याही राष्ट्रासाठी संजीवक औषधींचे कार्य करतात.
९
प्रभू रामचंद्रांना भगवान का बरे म्हटले जाते ? कारण अगदी बालपणापासून त्यांनी आपल्या आदर्शासाठी आणि स्वधर्मनिष्ठेसाठी दुःखमय आणि कष्टमय जीवन व्यतीत केले म्हणून. अगदी लहान वयात ते विश्वामित्रांबरोबर गेले आणि त्यांनी ऋषीमुनींच्या यज्ञांचे संरक्षण केले. पुढे ते चौदा वर्षे वनात राहिले. तेथे त्यांनी फार मोठा राक्षससंहार केला आणि शेवटी दुष्टशिरोमणी राक्षसराज रावणालाही मारले. त्यांनी आजन्म धर्माचे संरक्षण आणि संवर्धन केले. म्हणूनच आमच्या धर्मानुसार ते अवतारी पुरुष मानले जातात. म्हणूनच आम्ही त्यांना भगवान मानतो.
१०
विद्युतगृहात नुसती वीज उत्पन्न केल्याने काम संपत नाही. लहानमोठ्या तारांनी ती सर्वत्र पोहचवावी लागते. म्हणजे मग सगळीकडे प्रकाश पसरतो. प्राचीन काळी साधुसंतजन सर्वत्र परिभ्रमण करून नामघोषाने आकाश दुमदुमवीत असत. श्रीसमर्थ रामदास स्वामींना महाराष्ट्रात अकराशे मठ चालविण्यासाठी जर पुरेसे कार्यकर्ते मिळू शकले तर आज आपणाला ते का बरे उपलब्ध होणार नाहीत ? आपल्याला हा संघटनेचा मंत्र देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. त्यासाठी हजारो व्रतधारी प्रचारकांची आणि सेवकांची आवश्यकता आहे. हि आज देशाची मागणी आहे. तिची पूर्ती व्हायलाच हवी.
११
आपण सर्वांनी राष्ट्रकार्याची फार मोठी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. आपल्या उच्च सिद्धांतांना आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखवू , असे आपले म्हणणे आहे. आपली हि कार्यपद्धती आपणाला आपल्या ध्येयाप्रत अवश्य पोहोचवील अशी आपली अढळ श्रद्धा आहे. त्यासाठी आपले विचार आपल्याला आपल्या वागणुकीतून प्रकट करता आले पाहिजेत.
१२
कार्यकर्ता म्हटला कि तो एक आकर्षण-केंद्रच बनला पाहिजे. पाच पन्नास लोकांना आपल्याकडे ओढून ठेवण्याची कुशलता त्याच्याठायी असली पाहिजे. एखादातरी गुण त्याच्या अंगी भरपूर प्रमाणात असला पाहिजे. ज्याच्या वाणीतून अमृत वाहत असेल, ज्याला देशकाल परिस्थितीचे उत्तम आकलन असेल, कोणाला कोणते काम सांगावे हे ओळखण्याची व ते काम त्याच्याकडून करवून घेण्याची कुशलता ज्याच्याजवळ असेल तोच संघटना निर्माण करू शकेल.
१३
आपले चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वछ असले पाहिजे. त्याचबरोबर आपण व्यवहारनिपुण आणि कार्यकुशलही असले पाहिजे. विशुद्ध चारित्र्य, आकर्षक व्यक्तिमत्व आणि सर्वगामी बुद्धिमत्ता यांचा त्रिवेणी संगम जेथे असतो, तेथे कोणत्याही सत्कार्याची उत्तम भरभराट होते. एखादा मनुष्य कितीही चांगला असेल, पण त्याच्या ठिकाणी जर व्यवहारबुद्धी नसेल, तर त्याला यश मिळत नाही.
१४
हे
राष्ट्र हजारो वर्षांपासून हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र बनवायचे नाही, यांची स्थापनाही
करायची नाही. याची घोषणा करायची नसून हिंदू राष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा
आहे.
१५
प्रतिदिन सुसंस्कारांची देवाण घेवाण करणे, स्वतः अनुकूल वातावरण निर्माण करून इतर लोकांनाही संस्कार देणे यामधून शाखेचे स्वरूप निश्चित झाले . नेहमी एकत्र राहाणे, स्नेहमय भावनांची हृदयात खोलवर लावणी होईल असे आवाहन, संघटनेच्या दृष्टीने असे नेहमी करीत राहण्याची योजना नित्य चालवणे आवश्यक अशी रचना डॉक्टरांनी केली.
१६
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ हिंदू समाजाचे राष्ट्रीय स्वरूप ओळखून प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ज्वलंत
भारत भक्ती जागविण्याचे, राष्ट्रसेवेसाठी
सर्वस्वार्पण युक्त, शील
चारित्र्य संपन्न जीवन स्वीकारण्याचे तसेच त्यादृष्टीने एकरस एकात्म समाज जीवन
असेतु हिमालय पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा निश्चय पूर्वक प्रयत्न करीत असतो.
१७
आपली मातृभूमी भारतमाता हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा आधार आहे. भूमी, आकाश आणि पाणी देऊन ज्याप्रमाणे तिने आपले पोषण केलेले आहे, तसेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांना तिने डोंगरकपारीत आश्रय दिलेला आहे. अनेक संत, सम्राट, वीर यांना जन्म देऊन तिने आपल्या पुत्रांचे पित्याप्रमाणे रक्षण केलेले आहे; शिवाय ज्ञान देऊन आपल्यालाच नव्हे तर जगालाही मार्ग दाखविलेला आहे. थोडक्यात, आपली मातृभूमी माता, पिता आणि गुरु यांची त्रिवेणी मूर्ती आहे. - पू . श्रीगुरुजी
१८
भगवा ध्वज आमच्या महान संस्कृतीचा पूर्ण परिचय करून देणारे प्रतीक स्वरूप आहे. आमच्यासाठी तो परमेश्वरस्वरूप आहे. म्हणून आम्ही त्याला आपल्या गुरुस्थानी ठेवणे अत्यंत योग्य समजत आहोत. त्याची सोनेरी भगवी कांती पवित्र यज्ञवेदींच्या पावन ज्वालांसमान आहे. भोगलालसेला मातीमोल करणाऱ्या संन्याशाच्या त्यागवृत्तीची द्योतक आहे. त्यागमय जनसेवा करण्याचे संकेतचिन्ह आहे.
१९
आपल्या समाजजीवनात अनेक संकटे, अडचणी आल्या. काही काळ पारतंत्र्य आले. परंतु त्या कालखंडात आम्ही आमचे जीवन सुरक्षित ठेवून पुन्हा राष्ट्राचे उत्थान कसे केले या इतिहासाचे विस्मरण होता कामा नये. आपल्या गौरवशाली इतिहासाचे अध्ययन आपण केलेच पाहिजे.
२०
प्रार्थना एक प्रकार का मन्त्र है। हमें केवल उसके शब्दोंका उच्चारण ही नहीं करना है। तो साथ ही प्रत्येक शब्द के उच्चारण के साथ अपने अंदर यह महान आदर्श, अंगीकृत इस महान कार्य के सफलता के लिए कार्य के अनुरूप अपने जीवन को ढालने का यह श्रेष्ठ विचार जागृत करना है ।
२१
संस्कारामुळे मनुष्य व्दिज अर्थात दोन जन्मवाला होतो. आपल्या संघ दृष्टिकोनातून स्वयंसेवकांची प्रतिज्ञा झाली कि त्याचा दुसरा जन्म झाला असे मानले पाहिजे. प्रतिज्ञापूर्व काळात आमच्या मनात संसाराविषयी विशेष भाव होते. परंतु आज जीवनातील सर्व पवित्र वस्तु व भावनांना साक्षी ठेवून, खाणे-पिणे, मौजमजा करण्याचे पाशवी मार्ग सोडून मानवी जीवनात प्रवेश केला आहे व आपल्या कर्तव्याचे शिक्षण घेण्याचा संकल्प केला आहे.
२२
आमचा प्रत्येक स्वयंसेवक अन्य सर्व लोकांना अनुकरणीय आणि आदर्श असला पाहिजे.संघ स्वयंसेवक हि एक अशी व्यक्ती आहे की जी देशासाठी समर्पित आहे, म्हणून याची प्रत्येक कृती निष्कलंक राहील असे सर्वांना वाटले पाहिजे. जेव्हा असे आदर्श स्वयंसेवक सुसंघटित आणि अनुशासनापूर्ण रूपात एकत्र येतील तेव्हा संपूर्ण देशाचे वातावरण बदलून जाईल. आम्हाला हे घडवायचे आहे.
२३
आपले कार्य श्रेष्ठ आहे,महान आहे, ईश्वरी आहे म्हणून उठा आणि नेटाने कामाला लागा. सत्य आपल्या बाजूला आहे. अन्याय सहन करीत झोपून राहाणे हे पाप होय. त्यासाठी भारतमातेचे ध्यान करून तिच्या प्रेमाने प्रेरित होऊन उठा आणि कार्यविस्तार करा. विजय निश्चित आहे. कारण जेथे धर्म असतो तेथे भगवंत असतात. आणि जेथे भगवंत असतात तेथे विजय असतोच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा