१
विद्युतगृहात नुसती वीज उत्पन्न केल्याने काम संपत नाही. लहानमोठ्या तारांनी ती सर्वत्र पोहोचवावी लागते. म्हणजे मग सगळीकडे प्रकाश पसरतो. प्राचीन काळी साधुसंतजन सर्वत्र परिभ्रमण करून नामघोषाने आकाश दुमदुमवीत असत. श्रीसमर्थ रामदास स्वामींना महाराष्ट्रात अकराशे मठ चालविण्यासाठी जर पुरेसे कार्यकर्ते मिळू शकले तर आज आपणाला ते का बरे उपलब्ध होणार नाहीत ? आपल्याला हा संघटनेचा मंत्र देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. त्यासाठी हजारो व्रतधारी प्रचारकांची आणि सेवकांची आवश्यकता आहे. हि आज देशाची मागणी आहे. तिची पूर्ती व्हायलाच हवी. - पू . श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा