रविवार, १९ जुलै, २०२०

४२ हिंदू

                                             ४२  हिंदू 
          आमच्या मनात हिंदुमात्रासाठी प्रेम असले पाहिजे. सगळ्या हिंदुसमाजात आपल्याला परका म्हणून कोणीही नाही, अशी आपली धारणा असली पाहिजे. ही भावना ठेवून, आम्ही प्रत्येक हिंदूंशी मैत्री केली पाहिजे. केवळ स्वयंसेवकांचाच नव्हे तर सर्व वयाच्या आणि सर्व स्तराच्या हिंदूंचा आम्ही परिचय करून घेतला पाहिजे. अखिल हिंदुसमाजाला आम्ही आपलेपणात गोवले पाहिजे.                              पू . श्रीगुरुजी

        ज्यास आर्य किंवा हिंदू या नावाने संबोधले जाऊ शकते तोच हा भारतीय संस्कृतीचा मूल धागा आहे, हे निर्विवादपणे स्पष्ट आहे. या वस्त्राचे धागे इकडून-तिकडून (अन्याय स्थानाहून)आलेले आहेत. पण ते सर्व या वस्त्राशीच निगडित आहेत. लहान मोठ्या नद्या गंगेस येऊन मिळाल्या आहेत. परंतु मूळ प्रवाहाबरोबर गतिमान झाल्यानंतरही त्यांना गंगाच म्हटले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाची चर्चा करणाऱ्यांना ज्याप्रमाणे सांख्य, योग, वेदांत इत्यादी आर्य दर्शनेच अभिप्रेत असतात. त्याप्रमाणे भारताबाहेरील लोक भारतीय संस्कृतीचा नामोच्चार करतात तेव्हा त्यानांही या संस्कृतीचा मूळ प्रवाह अभिप्रेत असतो.                 डॉ. संपूर्णानंद

          हिंदू शब्दाचा सर्वसंग्राहक अर्थ आम्हास जर अखंड ठेवावयाचा असेल तर त्याचा कोणत्याही धर्मामताचा निदर्शक अशा अर्थाने वापर करता कामा नये. याबाबतीत आज खरी चूक घडते ते आपल्याच बांधवांकडून ! हे स्वतःला सनातनी म्हणवितात आणि श्रुतीस्मृतिपुराणोक्त सनातन धर्माचे पालन करीत असल्याचा दावा करतात. ते हिंदू धर्मास केवळ वैदिक किंवा पौराणिक धर्मापर्यंतच मर्यादित मानतात. एवढेच नव्हे तर ' हिंदू आणि शीख ', ' हिंदू आणि जैन ',' हिंदू आणि ब्राह्म ' असा भ्रामक शब्दप्रयोग दररोज करता करता आपण स्वतःच जैन, शीख, ब्राह्मण इत्यादी हिंदू नाहीत असा तथ्यशून्य संस्कार त्या त्या जनसमूहावर करीत असतात. आणि शिवाय सांगत असतात की त्यानी आपल्या नावाची नोंद हिंदू म्हणून करावी ! न कळत का होईना ! आपल्या हातून घडणारी हे आत्मघातकी चूक आम्ही त्वरित सुधारली पाहिजे.                                                                    स्वातंत्र्यवीर सावरकर

         ' मी हिंदू आहे ' याचा अर्थ माझ्यामध्ये असामान्य गुणसंपदा आहे. माझी स्वतंत्र परंपरा आहे. हिंदूत्वानरूप माझे जीवनध्येय आहे. अशा प्रकारची आपली धारणा भावात्मक, रचनात्मक व क्रियात्मक असायला हवी. प्रतिक्रियात्मक केव्हाच नको.                                                                         प. पू. श्री गुरुजी

          हिंदुस्तान का उद्धार मुसलमानों पर उतना अवलंबित नहीं, इसाईयों पर उतना अवलंबित नहीं, जितना इस बात पर अवलंबित है, की हिंदू अपने धर्म की रक्षा किस प्रकार करते हैं; क्योंकि मुसलमानोंका काशी-विश्वनाथ यहाॅं नहीं, मक्का में है और इसाईयोंका जेरुसलेम में है | पर आप तो हिंदुस्तान में ही रहकर मोक्ष प्राप्त कर सकते हैं | यह युधिष्ठिर की भूमि है, यह रामचंद्र की भूमि है | ऋषी-मुनीयोंने हमसे कहा रखा है कि, यह कर्मभूमि है, भोगभूमि नहीं है |                                                                                                                      महात्मा गांधी

     आत्मानं उद्दिश्य भव्यस्य श्रेष्ठस्य हिन्दु इति शब्दस्य प्रयोगतः पूर्व वयं चिन्तयेम् एतस्य शब्दस्य प्रयोगार्थं वयं अधिकारं प्रप्तवतः वा इति | देशस्य धर्मस्य च नाम्नः आत्मनः कृते उपयोगः न विनोदस्य विषयः | गम्भीरः विषयः एवः | हिन्दु इति अभिधानं अस्माकं गुणवत्तां प्रकटयति | अस्माकं जगद्गुरु स्थान प्राप्तियोग्यतां प्रकटयति | हिन्दुः इति कथनं नाम प्रेमपूर्वकं निष्ठापूर्वकं च देशस्य धर्मस्य च सेवाव्रतस्य अन्गिकारः इति | अस्याः पुण्यभूमेः पुण्यधर्मस्य च नामकरणं नाम नूतनस्य स्वयं स्वीकृतस्य कण्टकाकीर्ण मार्गस्य दीक्षापूर्वकं अनुकरणं इति |                                      - भगिनी निवेदिता 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा