बुधवार, २९ जुलै, २०२०

७७ समाजवाद

                                          ७७  समाजवाद 
      जरी आम्ही आमच्या कार्याला समाजवाद असे नाव दिले नाही, तरीसुद्धा मनुष्याला सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टीने परिपूर्ण मानव बनविण्यासाठी त्यांनी जे कार्य केले आहे ते आजपर्यंत समाजवादाच्या विवेचन यांनी कल्पिलेल्या सर्व सीमा ओलांडून पुढे गेले आहे.

         भौतिक उन्नती बरोबरच आध्यात्मिक प्रगतीची कल्पना केवळ हवेतील भराऱ्या नव्हेत. मानवी श्रेष्ठत्वाला अबाधित राखून समाजाच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आपल्याला पार पाडलीच पाहिजे. समाजवाद व लोकतंत्र हे दोन्ही मार्ग एकांगी आहेत. या भिन्न प्रवृत्तींचे योग्य प्रकारे सामंजस्य साधून व्यक्तीचा विकास साधण्याऐवजी एक भ्रममूलक स्थिती निर्माण करून विभिन्न (विविध) शक्तींना एक युद्धभूमी करून दिली आहे.   
                                                                                                          पं. दीनदयाळ उपाध्याय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा