शनिवार, २५ जुलै, २०२०

७१ शिक्षण

                                               ७१ शिक्षण 
           अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारत शिक्षण, ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात युरोपापेक्षा पुष्कळच पुढे गेला होता. लहान लहान खेड्यांपर्यंत पारंपारिक शिक्षणाची व्यवस्था होती. ' एक शिक्षक एक विद्यालय ' या तत्वानुसार लाखो पाठशाळा देशभरात चालू होत्या. त्यावेळी इंग्लंडात काही उच्चभ्रू वर्गापुरत्याच मर्यादित शाळा होत्या. भारतात केवळ ३५ % विद्यार्थी उच्चभ्रू होते. चर्मकार, डोम व अन्य सर्व जातीजमातींचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. इतकेच नव्हे तर त्या त्या जातीजमातींतील उत्तम शिक्षकही शिकवत असत. भारतात राजेमहाराजे, जमीनदार, श्रीमंत सर्वजण शिक्षणाचा प्रसार करणे हे आपले पवित्र कर्तव्य मानीत असत व म्हणून शिक्षणासाठी भरपूर पैसे देत असत. इंग्रजांनी या मंडळींकडून मिळणारे अनुदान बंद करून भारतातील शिक्षणाचा हा वृक्षच वठवून टाकला. 

         समाजात असलेल्या वाईट चालीरिती व अन्य दोष दूर करण्यासाठी समजावणे व शिक्षणाद्वारा संस्कार करून विकास करण्याचा मार्ग अवलंबणे यालाच आमच्या धर्माने सर्वश्रेष्ठ मानले आहे.                 भाऊसाहेब भुस्कुटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा