बुधवार, २९ जुलै, २०२०

७७ समाजवाद

                                          ७७  समाजवाद 
      जरी आम्ही आमच्या कार्याला समाजवाद असे नाव दिले नाही, तरीसुद्धा मनुष्याला सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टीने परिपूर्ण मानव बनविण्यासाठी त्यांनी जे कार्य केले आहे ते आजपर्यंत समाजवादाच्या विवेचन यांनी कल्पिलेल्या सर्व सीमा ओलांडून पुढे गेले आहे.

         भौतिक उन्नती बरोबरच आध्यात्मिक प्रगतीची कल्पना केवळ हवेतील भराऱ्या नव्हेत. मानवी श्रेष्ठत्वाला अबाधित राखून समाजाच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आपल्याला पार पाडलीच पाहिजे. समाजवाद व लोकतंत्र हे दोन्ही मार्ग एकांगी आहेत. या भिन्न प्रवृत्तींचे योग्य प्रकारे सामंजस्य साधून व्यक्तीचा विकास साधण्याऐवजी एक भ्रममूलक स्थिती निर्माण करून विभिन्न (विविध) शक्तींना एक युद्धभूमी करून दिली आहे.   
                                                                                                          पं. दीनदयाळ उपाध्याय

सोमवार, २७ जुलै, २०२०

७६ आर्थिक उन्नती

                                         ७६ आर्थिक उन्नती 
        जोपर्यंत आर्थिक दृष्टीने दुसऱ्यावर अवलंबून राहणे आहे, तोपर्यंत भारतातील कोट्यावधी लोकांना आर्थिक उन्नतीची समान संधी नाही, जोपर्यंत त्यांच्याजवळ उन्नतीची साधने नाहीत, उन्नतीचे प्रवेशद्वार अजून उघडले नाही तोपर्यंत विश्वाच्या प्रगतीमध्ये भारत सहाय्यक होऊ होऊ शकत नाही. तो जीवनाच्या सत्याचा साक्षात्कार करू शकणार नाही आणि मानवाच्या स्वातंत्र्याचा साक्षात्कारही करू शकत नाही                    - दीनदयाळ उपाध्याय

 “जेव्हा सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील बदलाचा विषय येतो तेव्हा आपली दृष्टी काय असते?

"सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:

प्रत्येकाने सुखी आणि आनंदी असावे,प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे, सगळ्यांचे कल्याण व्हावे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या  सामाजिक व आर्थिक चिंतनाचा गाभा सांगणारे हे सुभाषित आहे. शोषण विरहित आणि समानता युक्त समाज व आर्थिक व्यवस्था आपल्याला अभिप्रेत आहे.”                मा.बाळासाहेब देवरस 


७५ प्रशिक्षण

                                          ७५  प्रशिक्षण

         सर्व स्वयंसेवकांना संघकार्याचे तत्वज्ञान व कार्यपद्धती याचे ज्ञान झाले पाहिजे. आपले संघाचे काम दिवसभर चालू असते. लोकांना भेटणे, आपली विचारधारा आणि कार्यपद्धती याचा परिचय करून देणे, आपल्या कार्यासाठी त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे, हे काम आपण रोज करतो. हे काम कौशल्याने करता यावे म्हणून, तसेच त्याच्या पूर्ततेसाठी दैनंदिन शाखा चालविण्याचे शिक्षण ग्रहण करण्यासाठी आपण येथे एकत्रित आलो आहोत. या वर्गात जे शिक्षण आम्हाला मिळेल त्यातील कोणताही भाग नगण्य किंवा कमी महत्त्वाचा न मानता, छोट्या मोठ्या सर्व बाबींकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे.                                                                                 श्रीगुरुजी
    

रविवार, २६ जुलै, २०२०

७४ संघटन शक्ती

                                             ७४ संघटन शक्ती 


       आपण शतकानुशतके गुलाम राहिलो, प्रथम मोगलांनी व नंतर ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, कारण आपण असंघटित व दुर्बल राहिलो. उलट जेव्हा जेव्हा आपण संघटित सामर्थ्याचीच पूजा केली तेव्हा तेव्हा आपण वैभवाच्या शिखरावर गेलो. आजही आपण सामर्थ्याचीच कास धरली पाहिजे, संघटित झाले पाहिजे.
                                                                                 - मोरोपंत पिंगळे  

२  
      एक व्यक्ती कितीही शक्तिमान असली तरी जगाच्या धकाधकीत ती टिकू शकत नाही. उलट अशा अनेक व्यक्ती एकत्रित आल्या, एकाच ध्येयाने बांधल्या गेल्या किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्या संघटित झाल्या तर त्यांची शक्ती शतपटीने वाढते व अशी शक्ती समाजहितासाठी कार्यक्षम ठरते.                 - पू. गुरुजी
            

७३ अन्य संप्रदाय

                    ७३ अन्य संप्रदाय 

         हिंदू धर्म समन्वयवादी है। जिन लोगों ने हिंदू आचार, व्यवहार तथा जीवनदर्शन को स्वीकार कर लिया, हिंदू धर्म की ' एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति ' की भावना को स्वीकार कर सह अस्तित्व के आधार पर हिंदू समाज की हित कामना लग गये, वे सब हिंदू हो गये। सामाजिक लचक हिंदू धर्म की विशेषता रही है । सनातन धर्म माननेका अर्थ स्थिर खडा हो जाना नही है, इसका अर्थ है, इसके महत्वपूर्ण सिद्धांतों को जान समझकर वर्तमान संदर्भ और देशकाल परिस्थितीयो के अनुसार इन पर अमल करना ।                                                          - डॉ. राधाकृष्णन

      ईसाई, मुसलमान व हिंदू हे सर्व एकत्र रहावेत असे केवळ हिंदूच म्हणतात. ख्रिस्ती व मुसलमान म्हणत नाहीत. आमचा कोणत्याही उपासनापद्धतीशी विरोध नाही. परंतु राष्ट्राच्या विरोधात जो उभा राहील तो जरी मुलगा असला तरी त्याच्याबरोबर आमचा व्यवहार कठोर राहील. अहिल्याबाई, शिवाजी महाराजांचा आदर्श व्यवहार आमच्यासमोर आहे. जर कोणी राष्ट्रविरोधी, अन्य मतावलंबी झाला तर त्याच्याबरोबरचा आमचा व्यवहार अहिल्याबाई व छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राहील, असे म्हणण्याची टाळाटाळ कोणी करू नये.
 

७२ आदर्श

                                                ७२  आदर्श 

           मानवी जीवन रूपांतरित करणे हाच साधनेचा अर्थ आहे.  जीवनाच्या रूपांतरासाठी केवळ बाह्य परिवर्तनाने भागणारे नाही.  त्यासाठी मानवी जीवन नवीन आदर्शांच्या आधारावर अनुप्रणित केले पाहिजे.  त्या आदर्शाचे अनुसरण करताना आपणास आहुती दिली पाहिजे.  आदर्श आदर्शाच्या बलीवेदीवर स्वतः बळी दिल्यानंतर माणसाचे विचार, उक्ती आणि कृती यात एकसूत्रता येते.  त्यांचे अंतर्बाह्य रुप एक होते.  संपूर्ण जीवन एका आदर्श सूत्रांत गुंफले जाते.  या क्षणी तो जीवनाचा नवीन रस, नवीन अर्थ, नवीन आनंद शोधू शकतो.  त्याच्या या समोर समग्र विश्व नव्या प्रकाशात प्रकट होते.                                                                               - नेताजी सुभाष चंद्र बॉस

       ज्याप्रमाणे हाडांच्या सांगाड्याविना शरीर उभे राहू शकत नाही त्याप्रमाणे कार्यकर्त्यांशिवाय संघटना टिकू शकत नाही व प्रगतीही करू शकत नाही. हाडांच्या सांगाड्यात पाठीचा कणाही असतो. हा कणाच संपूर्ण शरीराला मजबूती देत असतो. संघटनेतही आदर्शवादी कार्यकर्त्यांचा एक गट असा असतो की तो संघटनेला शक्ती देत असतो.                                                                                                                            एकनाथजी रानडे

शनिवार, २५ जुलै, २०२०

७१ शिक्षण

                                               ७१ शिक्षण 
           अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारत शिक्षण, ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात युरोपापेक्षा पुष्कळच पुढे गेला होता. लहान लहान खेड्यांपर्यंत पारंपारिक शिक्षणाची व्यवस्था होती. ' एक शिक्षक एक विद्यालय ' या तत्वानुसार लाखो पाठशाळा देशभरात चालू होत्या. त्यावेळी इंग्लंडात काही उच्चभ्रू वर्गापुरत्याच मर्यादित शाळा होत्या. भारतात केवळ ३५ % विद्यार्थी उच्चभ्रू होते. चर्मकार, डोम व अन्य सर्व जातीजमातींचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. इतकेच नव्हे तर त्या त्या जातीजमातींतील उत्तम शिक्षकही शिकवत असत. भारतात राजेमहाराजे, जमीनदार, श्रीमंत सर्वजण शिक्षणाचा प्रसार करणे हे आपले पवित्र कर्तव्य मानीत असत व म्हणून शिक्षणासाठी भरपूर पैसे देत असत. इंग्रजांनी या मंडळींकडून मिळणारे अनुदान बंद करून भारतातील शिक्षणाचा हा वृक्षच वठवून टाकला. 

         समाजात असलेल्या वाईट चालीरिती व अन्य दोष दूर करण्यासाठी समजावणे व शिक्षणाद्वारा संस्कार करून विकास करण्याचा मार्ग अवलंबणे यालाच आमच्या धर्माने सर्वश्रेष्ठ मानले आहे.                 भाऊसाहेब भुस्कुटे

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

७० मतांतर

                                                ७०  मतांतर 
           गांधारांनी दीडशे वर्षे आक्रमणांशी उग्र संघर्ष केला. परंतु अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला. इतिहासाचे म्हणणे असे आहे की इस्लामचा प्रसार त्याच्या श्रेष्ठ तत्वज्ञानामुळे झाला नसून तलवारीच्या बळावरच लोकांना धर्मांतरित करूनच झाला. अशा प्रकारे गांधाराचे बळजबरीने धर्मांतर केल्यानंतरच गांधाराचे अफगाणिस्थान झाले. १९४७ मध्ये अर्धा पंजाब, सिंध, बलुचिस्थान व अर्धा बंगाल आपल्यापासून तुटून अलग झाले. काय कारण ? त्याचे एकच कारण आहे. ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य झाले तो तो भाग हिंदुस्थानापासून तुटला.  

६९ आत्मियता

                                              ६९  आत्मियता
       धर्म किती का गूढ असेना , पण साधी गोष्ट अशी आहे की, दुसऱ्याला पीडा देणे हा अधर्म आहे आणि आनंद देणे हा धर्म आहे. आपण आपापसात एकमेकांना अनुकूल बनणे हा धर्म आहे. धारणाशक्ती हे धर्माचे मुख्य तत्व आहे. जो व्यवहार आपलेशी केला असता आपल्याला कष्टदायक वाटेल तो व्यवहार दुसऱ्याशी करू नका. वस्तुतः आत्मीयता हाच समष्टीमार्गाचा आधार आहे. संपूर्ण समाजाविषयी आपलेपणा निर्माण करणे, 

         आम्ही समतेच्या नव्हे तर आत्मियतेच्या आधारानेच विचार करण्यास प्रारंभ केला. परिवारातील लहान मूल व वृद्ध पैसे मिळवित नाहीत म्हणून ते समान होऊ शकत नाहीत. परंतु कर्तव्यबुद्धीने चालणाऱ्या कुटुंबातील सर्वांना आत्मियतेमुळे आपल्या आवश्यकता पूर्ण करून घेणे शक्य होते. म्हणून आम्ही कोणा एका विशिष्ट अंगाचा विचार न करता संपूर्णतेच्या व आत्मियतेच्या विचारावरच विश्वास ठेवतो.                         - पं. दीनदयाळ उपाध्याय

६८ युवक

                                           ६८  युवक 

१ 
       हे वीर आत्म्यांनो, ज्यांना बेड्यांनी जखडून टाकले आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी, जे दुःखाच्या भाराने लादले गेले आहेत त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि जे अज्ञानाच्या घनघोर अंधारात बुडून गेले आहेत अशांची हृदये प्रकाशित करण्यासाठी पुढे चला ! ऐका ! वेदांत डंका पिटून घोषणा करीत आहे ' अभिः ' निर्भय बना . ईश्वराची ही पवित्र वाणी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या हृदयाची तार छेडण्यास समर्थ होईल . 
                                                                                स्वामी विवेकानंद
          वेदांत म्हटले आहे ' अशिष्टो बलिष्टो दृढिष्टो मेधावी ' म्हणजेच ' दृढ, बलशाली, तीव्र बुद्धीची आणि चैतन्यशाली माणसेच ईश्वराजवळ पोहोचू शकतात. '  तुमचा भविष्यकाळ निश्चित करण्याची हीच वेळ आहे. म्हणून मी म्हणतो, आत्ताच या उसळत्या तारुण्यात, या नव्या उत्साहाचे वातावरण कार्य करा. काम करण्याची हीच वेळ आहे. आत्ताच आपल्या भाग्याचा निर्णय करा आणि कामाला लागा. कारण जे पुष्प अजून चुरगळलेले नाही, जे ताजे आहे, जे अद्याप हुंगले गेलेले नाही तेच ईश्वरचरणी अर्पण केले जाते. ईश्वर त्याचाच भुकेला असतो.                                         स्वामी विवेकानंद.

        कल्पना को कृती में आने के लिए हाथ पैरोंकी प्रमुखतः आवश्यकता होती है | ध्येयवादी कवि की कल्पना प्रत्यक्ष साकार करने के लिए तरुण आगे बढेंगे, तभी राष्ट्र का अभ्युदय होगा | एखाध कीर्तन का व्याख्यान कितना भी वीर रस प्रधान हो, वृद्ध जन उसकी प्रशंसा करके चुप बैठ जायेंगे | पर राष्ट्र का जीवन गरम रक्त के तरुणों पर ही अवलंबित होता है | छात्रवृत्ति के बगैर राष्ट्र जिंदा नही रह सकता | जो स्वयं का बचाव नहीं कर सकता, वह मनुष्य ही नहीं कायर है | इस कायरता से मुक्ती पाकर पौरुष का जो स्विकार करेगा उसी व्यक्ति अथवा उसी राष्ट्र को विश्व में प्रतिष्ठा प्राप्त होगी |                                                                                           लोकनायक बापूजी अणे

गुरुवार, २३ जुलै, २०२०

६७ सामर्थ्य

                                             ६७ सामर्थ्य
           आपण शतकानुशतके गुलाम राहिलो, प्रथम मोगलांनी व नंतर ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, कारण आपण असंघटित व दुर्बल राहिलो. उलट जेव्हा जेव्हा आपण संघटित सामर्थ्याचीच पूजा केली तेव्हा तेव्हा आपण वैभवाच्या शिखरावर गेलो. आजही आपण सामर्थ्याचीच कास धरली पाहिजे, संघटित झाले पाहिजे.
                                                                                                                                      - मोरोपंत पिंगळे
२          
           कल्पना को कृति में आने के लिए हाथ पैरोंकी प्रमुखतः आवश्यकता होती है। ध्येयवादी कवि की कल्पना प्रत्यक्ष साकार करने के लिए तरुण आगे बढ़ेंगे, तभी राष्ट्र का अभ्युदय होगा।  एकाध कीर्तन का व्याख्यान कितना कितना भी वीररस प्रधान हो, वृद्ध जन उसकी प्रशंसा करके चुप बैठे जायेंगे।  पर राष्ट्र का जीवन गरम रक्त के तरुणों पर ही अवलंबित होता है।  क्षात्रवृत्ती के बगैर राष्ट्र जिंदा नहीं रह सकता।  जो स्वयं का बचाव नहीं कर सकता, वह मनुष्य नहीं कायर है। इस कायरता से मुक्ति पाकर पौरुष का जो स्वीकार करेगा उसी व्यक्ती अथवा उसी राष्ट्र को विश्व में प्रतिष्ठा प्राप्त होगी।                                                                              - लोकनायक बापूजी अणे 

       आज आपल्या देशाच्या सीमांचा चारी बाजूंनी संकोच होत आहे. आता तर ' कैलास ' वासी होण्याची पण सोय राहिली नाही. कैलास समाविष्ट झाला आहे चीनमध्ये. देशाचा संकोच सुरू झाला याचे कारण म्हणजे आपण आपली दृढता सोडली. कुलूप केव्हा झाले ? जेव्हा चोरीची कल्पना आली तेव्हा !  आमच्यावर आक्रमणे केव्हा सुरू झाली ? ज्यावेळी आम्ही टणकपणा गमावला तेव्हा ! कणखर मनाची, ताठ मानेची, छाती पुढे काढून चालणारी, ठामपणे पाऊल उचलणारी,  प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणारी, हिंदुत्वाला थोडा देखील मारक विचार मनातही न येऊ देणारी अशी एक एक व्यक्ती आम्हाला घडवायची आहे.                                          बाबाराव भिडे

         स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर होण्यासाठी ' शक्ती ' आवश्यक आहे. शक्ती असेल तर सर्व प्रकारची प्रगती शक्य आहे,  संकटापासून मुक्ती आहे. आणि तरच सन्मान प्राप्ती आहे. शक्तीमुळेच समाज, परिश्रम व स्वावलंबन याद्वारा सारे वैभव खेचून आणू शकतो. स्वतःजवळ शक्ती नसेल तर दुसऱ्यासमोर याचना करावी लागते. आणि हे लज्जास्पद तर आहेच परंतु परिणामी घोर हानिकारक आहे.                                         प. पू. श्री गुरुजी

       भौतिकवाद, इस्लाम, ईसाईयत व जगातील अन्य कोणतेही तत्त्वज्ञान आम्ही त्यांना थारा दिला नसता तर यशस्वी झाले नसते. जोपर्यंत मनुष्य खराब अन्न, शरीराचे पाप यांनी दुबळा होत नाही तोपर्यंत कोणताही रोगजंतू त्याचेवर हल्ला करीत नाही. धडधाकट माणसावर विषाक्त रोगजंतूंचा काडीइतका परिणाम होत नाही. अजूनही वेळ गेली नाही, आपण आपले वागणे बदलू या.                                                            स्वामी विवेकानंद

६६ संघकार्य

                                       ६६  संघकार्य 
                      
      हिंदू शब्दाला विरोध करणारेही जेव्हा या देशाचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच असतो. गेल्या दोनशे वर्षांत सामाजिक सुधारणा करण्याचे दृष्टीने झालेल्या चळवळींचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येईल की सर्व समाजसुधारकांसमोर हिंदू समाज होता. सामाजिक दोषांसंबंधी चर्चा परिसंवाद होतात त्यावेळी हिंदू समाजातील दोषांसंबंधीच बोलले जाते. म्हणून हिंदू समाज बलवान झाला पाहिजे. गेली शेकडो वर्षे होणारे परकीय हल्ले, मध्यंतरीचा गुलामगिरीचा काळ आणि योग्य नेतृत्वाचा अभाव यामुळे आपले समाज जीवन विस्कळीत होऊन त्यात दोष शिरले. हे सामाजिक दोष मान्य करण्यात संकोच बाळगण्याचे कारण नाही. हे सारे दोष निपटून काढण्याचा संघाचा प्रयत्न आहे. संघाचा प्रभाव जसा वाढेल तसतसा समाजातही या दृष्टीने अनुकूल बदल होत जाईल. म्हणून सर्व दृष्टीने संघकार्य वाढले पाहिजे.

        वैयक्तिक सुखाचा विचार न करता तरुणांनी आपल्या सर्व शक्तीनिशी या राष्ट्रउभारणीच्या थोर कार्याला वाहून घेण्याची गरज आहे. आपल्याला आपली उज्वल परंपरा माहीत आहे. १९३७ ते १९४७ च्या काळात १८-२० वर्षांचे बुद्धिमान, गुणसंपन्न तरूण अपरिचित प्रांतात गेले. अपरिचित घरात राहिले. त्यांची वये विकारसुलभ होती. परंतु एकांतवासात वा अरण्यांत न जाता समाजात राहून आणि कर्तव्याभिमुख जीवन जगून आपल्या चारित्र्याचा एक मानदंड त्यांनी उभा केला. त्या त्या प्रांतात संघकार्याची मजबूत पायाभरणी केली. आज अशाच हजारो तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे. तसेच नोकरी व व्यवसाय यातून निवृत्त झालेल्या स्वयंसेवकांचा बराच मोठा वर्ग आहे. त्यांनी आपल्या घरादारांच्या जबाबदारीतून मोकळे होऊन एखाद्या प्रचारकासारखे विविध क्षेत्रातील सेवा कार्यांना वाहून घ्यावे.

        संघाचे कार्य परमेश्वरी आहे. जे चांगले ते परमेश्वर ! मंगलम् भगवान विष्णू: | हिंदू समाजाचे सर्वात चांगले उदात्त असेल त्याचे नाव संघ " यद् यद् विभूतीमत्सत्वं " तो परमेश्वराचा अंश असे गीतेत सांगितले आहे. जे उचित कार्य आहे ते परमेश्वरी कार्य होय. त्यात अहंकार, अविश्वास, अप्रामाणिपणा असावयाचा नाही. मानवाचे जीवन उदात्त करणे याचे नाव संघ. म्हणून संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करावयाचे. जीवनामध्ये माझी कोणती इच्छा असो संघाची सूचना, आज्ञा, विनंती काहीही म्हणा ते सर्वात प्रथम महत्त्वाचे शिरसावंद्य ! अशा मनोधारणेने काम करण्याचा निश्चय असला पाहिजे. प्रत्येकाने काम केले तरच संघ वाढणार. त्यासाठी आपले जीवन म्हणजे वेळ द्यावयाचा. - मा. बाबाराव भिडे

         जशी भगवान श्रीकृष्णाची दोन रूपे होती. एक लोणी खाणारा गोपाळकृष्ण, दुसरा जगाचा निर्माणकर्ता, पालनकर्ता व संहार करणारा विराटरुप कृष्ण परमात्मा. याच प्रकारे संघकार्याची ही दोन रुपे आहेत. एक संघस्थानावरील, जिथे स्वयंसेवकांवर संस्कार केले जातात, दुसरे विराट रूप, देशांतील कोणत्याही क्षेत्र असे नाही जेथे संघाचे वर्चस्व नाही. संघ म्हणजे समाज, या महान कल्पनेला साकार करण्यासाठी सर्व कामे आम्हास करावी लागतील.                                                                                    मा.  यादवराव जोशी

५  
       एकाच राष्ट्राच्या निरनिराळ्या पैलूंचे काम करणारे आपण परस्पर एक दुसऱ्यांशी जुळवून चालले पाहिजे. तसेच एक राष्ट्रीयत्वाची जाणीव आपल्या हृदयात जागृत ठेवली पाहिजे. भिन्न भिन्न कार्यक्रमातून आपल्याजवळ जे जे लोक येतात त्यांचेवर राष्ट्रभक्तीचा योग्य संस्कार करण्यासाठी त्यांना आपल्या संघकार्याकडे आकृष्ट करणे हा आपला धर्म आहे. लोकांचे मनात भावनेचा उद्रेक न होऊ देता कौशल्याने हळूहळू हे काम केले पाहिजे.            श्री गुरुजी

          आपण कर्मठ झाले पाहिजे. आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्या पवित्र कार्याच्या योगाने संपूर्ण समाजाचे संघटन होईल. एक दिव्य, शक्तिशाली, सर्वगुणसंपन्न असे वैभवशाली राष्ट्र निर्माण होईल. ज्याची ज्योत जगभर प्रकाश पसरवून सुख शांती देईल. अशा तऱ्हेचा श्रेष्ठ भावं अंत:करणामध्ये धारण करून आपली संपूर्ण शक्ती आपल्या कार्यावर केंद्रित करावी हीच सर्वांकडून अपेक्षा आहे.

६५ सात्विक शक्ती

                                     ६५  सात्विक शक्ती 
           मानवतेच्या विजयासाठी सात्विक शक्ती आवश्यक आहे. ' कृण्वन्तो विश्वमार्यम ' ही प्राचीन घोषणा आम्हांला पूर्ण करायची आहे. जगातील लोकांकडे जाऊन हात जोडून हे काम होणार नाही. आपल्या सात्विक शक्तिचा प्रभाव जगात उत्पन्न करावा लागेल. त्यामुळे जगाचे अकल्याण होण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. हि तर विश्वकल्याणाची शक्ती आहे. आपले संघटन यासाठीच आहे.                                  - बाबासाहेब आपटे 

         हम लोग सात्विक प्रवृत्ती के, राष्ट्रीयत्व के याने दैवी राष्ट्रवाद के उत्तराधिकारी है | अपने महान पूर्वजोंने चराचर के प्रारंभ मे ही निर्लेप वृत्तीसे चिंतन कर यह निश्चित किया है | इसी परंपरा के साकार रूप भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आदी ईश्वरी अवतार हुए हैं | चंद्रगुप्त मौर्य के राज्यपद पर बैठते ही किसी भी प्रकार की अभिलाषा न कर पुन:  वनकी और प्रस्थान करनेवाले आर्य चाणक्य, विजयनगर की संस्थापना के बाद संन्यासाश्रम स्वीकार करनेवाले माधवराय इसी परंपरा के श्रेष्ठ पुरुष हैं | इसी परंपरा के हम वारिस है | इसी कारण इस दैवी हिंदू राष्ट्रीयत्व की पुन: संस्थापना का निश्चय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने किया है |                             प.  पू. डॉ . हेडगेवार


६४ शक्तीस्रोत

                                         ६४  शक्तीस्रोत 
     क्षणभराकरिता दिपवून टाकणाऱ्या विजेपेक्षा अखंडपणे प्रकाश देत आमचा मार्ग सुगम करणारा दिवा अथवा एखादा छोटा कंदिल हातात असणे चांगले. विद्युल्लतेच्या तुलनेने दिव्याचा प्रकाश थोडा का असेना तो सतत व अखंड मिळत असल्याने अधिक उपयोगी आहे. क्षणभरासाठी जगाचे डोळे दिपवून टाकणारा शक्तीस्रोत आम्हास निर्माण करावयाचा नसून जगाला अखंड नंदादीपाप्रमाणे उजळून टाकणारा असा शक्तिस्रोत निर्माण करावयाचा आहे.                                - मा. बाबासाहेब आपटे  
         

बुधवार, २२ जुलै, २०२०

६३ विश्वगुरू

                                           ६३ विश्वगुरू
           विश्व की भलाई के लिए भारत की रक्षा करनी होगी, क्योंकि एकमात्र भारत ही विश्व को शांति और एक नवीन व्यवस्था प्राप्त करा सकता है। भारत का भविष्य एकदम स्पष्ट है।  भारत जगत का गुरु है।  विश्व का भावी संघटन भारत पर निर्भर है । भारत एक जिवंत आत्मा है।  भारत आध्यात्मिक ज्ञान को विश्व में मूर्तिमान कर रहा है।                                                                                            - श्री माँ 

जेंव्हा केंव्हा भारताच्या खऱ्या इतिहासाचा शोध घेतल्या जाईल, तेव्हा धर्माप्रमाणेच विज्ञान, तत्त्वज्ञान, संगीत, साहित्य, गणित, ललितकला इत्यादींमध्ये सुद्धा भारत हा संपूर्ण जगाचा मूळ गुरू आहे, हे नि:संशयपणे सिद्ध होईल.                                                               स्वामी विवेकानंद                                                                                                                                                                                                                                                                                                                 

“जगाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान-विज्ञानाचा प्रकाश पसरवल्यामुळे आणि जगाला समजून घेऊन राज्यकारभार आणि सत्ता स्थापन करण्याचे मार्ग सुचवल्यामुळे आणि असंस्कृत मानवांना संघटित जीवन शिकवल्यामुळे भारत जगाचा गुरू झाला.जगाला शिक्षण, वैद्यक, व्यवसाय, हस्तकला, ​​शेती, पशुपालन इत्यादीसाठी मार्गदर्शन आणि संसाधने प्रदान केल्यामुळे सुवर्ण संपत्तीचा स्वामी  बनला.                                                                                     आचार्य श्री राम शर्मा

६२ विजय

                                       ६२  विजय 

         आपले कार्य श्रेष्ठ आहे, महान आहे, ईश्वरी आहे. म्हणून उठा आणि नेटाने कामाला लागा.
 सत्य आपल्या बाजूला आहे. अन्याय सहन करीत झोपून राहणे हे पाप होय. 
त्यासाठी भारतमातेचे ध्यान करून तिच्या प्रेमाने प्रेरित होऊन उठा आणि कार्यविस्तार करा.
 विजय निश्चित आहे. कारण जिथे धर्म असतो तेथे भगवंत असतात. आणि जेथे भगवंत असतात तेथे विजय असतोच.                                         - श्रीगुरुजी

        हमारा निश्चय यह है कि, अपनी धरोहर को हम केवल संभालेगे ही नहीं, वरन् जो कुछ नवीन होगा उसे भी शनै: शनै: आत्मसात् करेंगे | हमने कितना बचा लिया - यह प्रश्न नहीं,  प्रत्युत हमने जीत कर कितना जोड लिया है | हमारी दृष्टि नव- दिग्विजय की है | हम मुमूर्ष अथवा जिजीविषु मात्र न होकर विजिगिषु हैं | अब खोने की बात न करें, अब अटक पार जाकर अपने झंडे गाडने, दुसरों के क्षेत्र में घुसकर सीमोल्लंघन कर विजयादशमी संपन्न करने का हमने निश्चय किया है | अब शरणागती का विचार स्वप्न में भी नहीं, समर आरंभ हो चुका है, खम ठोक कर हम खडे हैं, धनुष्य की प्रत्यंचा चढ चुकी है, अब वापसी कैसी ? अब तो विजय कितनी ही दूर क्यों न हो, उसकी प्राप्ती के बिना हमें विश्राम कहाॅं |.                                                                                             भगिनी निवेदिता

                                      

६१ आत्मविश्वास

                  ६१ आत्मविश्वास 
    समाजकार्याचे जूं आपल्या मानेवर घेऊन ते परिश्रमपूर्वक व यशस्वीपणे ओढू शकणारच समाजात आत्मविश्वास निर्माण करू शकतो. कोणाला शिव्याशाप देऊन, दोषारूप करून किंवा उपहास करून हे काम होणार नाही. सत्तेची अभिलाषा तर सोडाच पण तशा इच्छेचा स्पर्शही यांच्या मनास होऊ शकणार नाही, अशांची खरी सहानभूती, आत्मीयता आणि सदैव त्यागपूर्वक परिश्रमशीलता यातूनच हे कार्य यशस्वी होईल.                                         - स्व. भैय्याजी दाणी

    आत्मविश्वास व आत्मनिरीक्षण या दोन आधारावरच आपल्याला आपले कार्य उभे करावयाचे आहे. आमचे सर्वच बरोबर, चूक नाहीच हा आत्मविश्वास, व आमची प्रत्येक गोष्ट चूक आहे, मूर्खपणा आहे, ती नष्ट केली पाहिजे असे आत्मनिरीक्षण दोन्ही बरोबर नाहीत. दोन्हींचे संतुलन ठेवून विचार केला तर श्रेष्ठ तत्वज्ञानाचे आधारावर आजच्या साऱ्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता आपण आपल्या समाजात निर्माण करू शकतो हे लक्षात येईल.

मंगळवार, २१ जुलै, २०२०

६० सज्जनशक्ती

                                    ६० सज्जनशक्ती 
          संघ जनमानसात परिवर्तन घडवू इच्छितो.  जेव्हा ते घडून येईल तेव्हा त्या शक्तीचे वर्णन आमच्याकडे असे केले गेले आहे कि ' ज्ञानाय दानायच रक्षणाय ' अशी सज्जनशक्ती समाजात उभी ठाकेल. तिचे अस्तित्व सगळ्यांच्या कल्याणासाठी असते. आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांतून अशी शक्ती अतिशीघ्र उभी झाली पाहिजे. 

            मार्ग एकच ! जनतेला प्रचिती येऊ द्या की, स्वतःला वाचविणारी शक्ती तिच्या स्वतःजवळ आहे. यासाठी माणसे हवीत जी जनतेची दुःखे आपलीच दुःखे मानतील, जनतेच्या सर्व समस्या समजून घेऊन त्यांच्या निराकरणाचे मार्ग शोधून काढतील, त्या मार्गावरून जाणाऱ्या जनतेबरोबर स्वतः राहून निराशेच्या दाट काळोखात आशेचा किरण दिसेपर्यंतचा आत्मविश्वास निर्माण करीत राहतील ! अशी माणसे या देशात पुरेशा संख्येत उपलब्ध झाली पाहिजेत.                                     - भय्याजी दाणी 
        शाखा या दैनंदिन साधनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारीत जनशक्ती जागृत करण्याचे कार्य करीत आहे. संघाचे ध्येय शासन किंवा सत्ता हस्तगत करणे हे नसून जनशक्तीचे संघटन हे आहे. कारण राष्ट्राचा आधार सत्ता नसून जागृत जनशक्ती हाच आहे. म्हणून राजकारणापासून दूर राहून जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन प्रामाणिकपणे जनसेवा करणे हेच संघास अभिप्रेत आहे.

५९ प्रतिज्ञा

                                                ५९  प्रतिज्ञा 
         संस्कारामुळे मनुष्य व्दिज अर्थात दोन जन्मवाला होतो. आपल्या संघ दृष्टिकोनातून स्वयंसेवकांची प्रतिज्ञा झाली कि त्याचा दुसरा जन्म झाला असे मानले पाहिजे. प्रतिज्ञापूर्व काळात आमच्या मनात संसाराविषयी विशेष भाव होते. परंतु आज जीवनातील सर्व पवित्र वस्तु व भावनांना साक्षी ठेवून, खाणे-पिणे, मौजमजा करण्याचे पाशवी मार्ग सोडून मानवी जीवनात प्रवेश केला आहे व आपल्या कर्तव्याचे शिक्षण घेण्याचा संकल्प केला आहे.         
                                                                                                                                         - पू . श्रीगुरुजी
            समाजाबरोबर एकात्म होण्याची भूमिका व्यवहारात आणणे हाच प्रतिज्ञेचा उद्देश आहे.  चहुबाजूला निराशेचे वातावरण असूनही आम्हाला समर्थ, संघटीत आणि अवघ्या विश्वाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असणाऱ्या हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करावयाचे आहे. कर्तव्यविन्मुख होण्याचा प्रसंग आलाच तर स्वतःला सावरण्याचे एक साधन म्हणजे आपली प्रतिज्ञा होय.                                                                                          - बाबासाहेब आपटे
          आयुष्यात निर्माण होणाऱ्या एखाद्या कमकुवत क्षणी ध्येयापासून ढळू नये म्हणून प्रतिज्ञा घ्यावयाची. ती केवळ थोर लोकांनीच करावयाची गोष्ट नव्हे. संघकार्य हे समाजातील सध्याच्या प्रचलीत प्रवाहाविरुद्ध असल्याने ध्येयनिष्ठ जीवन जगणारा यशस्वी कार्यकर्ता होण्यासाठी प्रतिज्ञा करावयाची.               -  मा. दामुअण्णा दाते   

         जीवनात प्रतिज्ञा एकच असू शकते. म्हणून यावज्जीव, आमरणान्त त्या प्रतिज्ञाचे पालन करण्याची इच्छा व्यक्त करून आपण आपल्या कार्यात प्रवेश करतो. जेव्हा स्वयंसेवकाला असा विश्वास उत्पन्न होतो की, आपल्या सर्व भावभावना, विचार आचार संघाच्या विचारधारेशी अनुकूल बनविण्यात तो यशस्वी झाला आहे. तसेच भविष्यातही त्यात तो पूर्ण तया सफल होईल तेव्हाच तो यथार्थरित्या ' मी संघाचा स्वयंसेवक आहे ' अर्थात संघाचा घटक अवयव आहे असे आपल्या समग्र पवित्र स्मृतीना जागृत करून प्रकट रूपाने म्हणतो. यालाच आपण प्रतिज्ञा म्हटले आहे.

       कधी कधी स्वयंसेवकांच्या मनात संघाला काही दान करावे असा विचार येतो. पण दान करणारा तो कोण ? एकदा स्वयंसेवक झाला म्हणजे तो स्वतः संघाचा होत असतो. मग त्याच्याजवळ दान करण्यासाठी उरतेच काय ? आणि मग पैसे देऊन स्वयंसेवकाची आपल्या कर्तव्यातून सुटका होत नाही. कारण ' काया वाचा किंवा मनाने ' आहे असे आपण प्रतिज्ञात म्हटलेले नाही तर तिथे तन-मन-धनाचा एकत्रित उल्लेख आहे. आपली सर्व ऐच्छिक सुख संपत्ती संघ कार्यासाठी देईन अशीच भावना या एकत्रित उल्लेखात आहे. यालाच म्हणायचे समर्पण.                                                                                                                                परमपूजनीय श्रीगुरुजी

९० तात्कालिक समस्या

                                     ९०  तात्कालिक समस्या 
          
       तात्कालीक समस्यांच्या संदर्भात संघाची भूमिका हीच आहे की आपल्या नित्यसिद्ध शक्तीच्या आधारानेच स्वाभाविकरित्या साऱ्या समाजाला जेवढे जास्तीत जास्त बरोबर घेऊन जाणे शक्य होईल, त्या प्रमाणात त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जावा. जेव्हा केव्हा समस्या उत्पन्न होते, तेव्हा लोकांची मागणी असते की, संघाने आपली सारी शक्ती त्यासाठी पणास लावावी. त्यांना वाटते की नाही तरी ही संघटना तरी कशासाठी उभारली आहे ?  या बाबतीत आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे. ज्या प्रमाणात समस्येचे निराकरण करण्याची आपली शक्ती असेल, त्याच प्रमाणात समस्येची सोडवणूक होऊ शकते. समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन ही शक्ती आपण अधिक वाढवली पाहिजे.

५८ सेवाकार्य

                                           ५८  सेवाकार्य
१ 
जेव्हा फळाची आशा धरून आम्ही काम करतो तेव्हा आम्ही खरोखरच फलाशेच्या बंधनात असतो, स्वतंत्र नसतो. काही मिळण्याची आशा संपत्तीची, सत्तेची वा कीर्तीची असो-आपल्याला काम करण्यास प्रेरित करते. जर ते मिळाले नाही तर कार्य करण्याची आमची प्रेरणाच संपते. याचाच अर्थ असा झाला कि आम्ही लालसेचे दास झालो. कोणताही स्वार्थ मनात न धरता केवळ जग सुधारण्याच्याच इच्छेने कार्य करता येते, पण इथेही ' मी जगासाठी काहीतरी करीत आहे ' या अहंकाराची तृप्तीच कार्याची प्रेरणा बनते. जी सेवा ईश्वराचे चरणी पूर्ण समर्पणाच्या भावनेने केली जाते तीच खरोखरीची उदात्त सेवा होय.                                                          - एकनाथजी रानडे 

       आपण आपल्या समाजाचे विनम्र सेवक आहोत. अभावग्रस्त व संकटात सापडलेल्या लोकांना यथाशक्ती मदत करून, समाजसेवा करण्याच्या दृष्टीने आपण समाज उपयोगी होऊ. आम्ही समाजसेवेचे व्रत अंगिकारले पाहिजे. आम्ही लोकांशी सहानुभूतीने, प्रेमाने व्यवहार केला तर तेही आपल्याबरोबर तसाच व्यवहार करतील, नाहीतर ते आपल्याबद्धल उदासीन राहतील. आपली उपेक्षा करतील. समाजसेवेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपला स्वभाव आवश्यकतेनुसार बदलणे हे अपरिहार्य आहे असे समजले पाहिजे. 

३ 
        जी व्यक्ती दुसऱ्यांच्या सुखासाठी कष्ट सहन करतेजिला सेवेची आवश्यकता आहे तिची सेवा करतेदीन दुबळ्यांना परमेश्वर मानून त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करतेती व्यक्ती श्रेष्ठ आहेती पवित्र आहे.                           -वं. मावशी केळकर 
   ग्रामीण भागात राहणारे गलिच्छ, अशिक्षित आणि मूर्ख मानले गेलेले भारतवासी आमचे दैवत आहे. त्यांची पूजा करणे हाच आमचा धर्म आहे. पूजा म्हणजे त्यांची सेवा करणे होय. या बंधूंतील उणिवा दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास जागवून त्या सर्वांना स्वावलंबी बनविणे हीच त्यांची खरी सेवा होय.

     हमारे देश के महापुरुष सेवाभाव को सदा भगवान के प्रति भक्ती प्रकट करने का सर्वोत्तम प्रकार मानते आये हैं | ऐसा पुरुष सतत यही प्रार्थना करता है कि उसे सेवा करने के लिए अधिक शक्ती तथा क्षमता प्राप्त हो | वह जीवन की पूर्णता इस बात में मानता है कि उसने प्रभू का दिया हुआ सब कुछ उसके सेवार्थ समर्पित कर दिया है | वह कहता है " हे भगवान मैने आपके चरणों में अपने जीवन की झोली खाली कर दी है और इसी में मेरे जीवन की पूर्णता है | "           परमपूजनीय गुरुजी

५७ स्तुती

                                               ५७ स्तुती 

१  
      आजकाल आपली फार स्तुती होत आहे. पण त्यामुळे हुरळून जाऊन आपण फार मोठे काम केले असे समजू नका. व्यक्तिशः असा अभिमान तर वाईटच आहे, पण संघश: तसा अभिमान धरणेही योग्य नाही. कारण लोक स्तुती करतात म्हणजे त्यांना हे काम आवडते इतकाच त्याचा अर्थ समजावा व स्तुतीने हुरळून न जाता आपले कार्य अधिक जोमाने करू लागावे. प्रशंसेमळे मनाला आनंद होतो हे खरे आहे, पण त्याचबरोबरच आपली जबाबदारीही वाढते हे विसरून चालणार नाही.

५६ समरसता

                                            ५६  समरसता 

      हिंदू समाजात श्रेष्ठतम दार्शनिक सिद्धांत असूनही कार्याच्या प्रवाहात अशा अनेक वाईट प्रथा व शिथिलता आली ज्यामुळे शत्रुंनी आमचा पराभव केला . यामध्ये सर्वाधिक कष्टदायक म्हणजे जातीच्या नावावर हिंदू हिंदूंमध्ये भेदभाव व अस्पृश्यता होय . यापासून हिंदू समाजाला मुक्त करून एकरस, जागृत, सबल, समृद्ध तसेच स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले जीवन कष्टविले आहे. यामुळेच आज समाजात अनुकूलता दिसते आहे .                 - पू. कुप्प. सी. सुदर्शनजी

       आपल्या धर्मातील मूलभूत तत्वावर निष्ठा असेल तर मग कसल्याही उग्र परिवर्तनासाठी आपली सिद्धता राहू शकते. आपले शब्द आणि कृती यातील दरी नष्ट करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. ज्या सामाजिक दुष्ट रुढीमुळे लोक दुःखी कष्टी आहेत त्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी संपूर्ण देशभर व्यापक प्रचाराची सदैव अत्यंत आवश्यकता आहे. मानवनिर्मित सर्व प्रकारची असमानता आणि अन्याय दूर करून समाज शुद्ध केला पाहिजे. तसेच व्यक्तिगत कल्याण आणि सामाजिक विकास यासाठी सर्वांना समान संधी प्राप्त करून दिली पाहिजे.                                                                                                                                                       -डॉ. राधाकृष्णन 
          शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आमच्यात काही विकृती, उच्चनीचतेचे भेद, आर्थिक विषमता, मागासलेपणा, जातिवाद इत्यादी दोष उत्पन्न झाले असावेत. परंतु या दोषांचे हत्यार परजून कोणी विदेशी शक्ती आमच्या ' स्व  ' त्वाचेच अपहरण करू पाहतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांची ही आसुरी आकांक्षा आम्ही धुळीस मिळवू. आमच्या या घरगुती समस्या आहेत. आम्ही त्या परस्पर मिटवून टाकू. व्यक्तिगत लाभासाठी किंवा सामाजिक दृष्टीने अवनत स्थितीतून बाहेर येण्याच्या इच्छेपोटी आम्ही कोणत्याही विदेशीयांचे हस्तक बनणार नाही. आपल्यातूनच उत्पन्न होणाऱ्या ' जयचंदा ' पासून आम्हाला अत्यंत सावध राहिले पाहिजे. ज्या राष्ट्राचे तसेच समाजाचे आपण अवयव आहोत त्या समाजाचे हित आपण नीट ओळखले पाहिजे.
                                                                                                                              - बाबासाहेब आंबेडकर 
        आपल्या मातृभूमीला परमवैसंपन्न करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पण यासाठी सर्वप्रथम आपल्याला एकसंध समाज घडवायचा आहे. जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद यांना कायमची मूठमाती द्यायची आहे. अखिल हिंदू समाज स्नेहमही धाग्यांनी गुंफायचा आहे. आपल्या वत्सल, संवेदनशील, पवित्र वागणुकीने आम्ही सर्वांची हृदये जिंकू. सर्वांना एक नवा विश्वास आधार अन् दिव्यत्वाचा वसा देऊ. हे जर झाले तर भारत वैभवशाली बनण्यास कितीसा उशीर !

        आपल्या देशाच्या वैभवसंपन्न जीवनासाठी, विजयी जीवनासाठी आपण सर्व मिळून निश्चयाने म्हणूया " आम्ही हिंदू समाजाला परस्परांतील भेदभावनांतून मुक्त करू !  समाजांतील उच्चनीचतेच्या, प्रशासृश्याच्या विकृती पूर्णपणे नाहीशा करू ! आपल्या समाजाचे सामाजिक जीवन निर्दोष करू ! आत्मियतेच्या आधाराने शोषणमुक्त करू ! सारे हिंदू एक आहोत या एकत्वाच्या भावनेने त्याला समर्थ करू ! आपल्या भूमीच्या श्रेष्ठ विचारांची सांगड आधुनिक काळातील विज्ञानाशी घालून सामूहिक परिश्रमाने आपल्या समाजाला वैभवसंपन्न करू ! 

         अस्पृश्यता हा आपल्या समाजातील विषमतेचा एक अत्यंत दुःखद व दुर्दैवी प्रकार आहे. अगदी पूर्वीच्या काळी अस्पृश्यता अस्तित्वात नव्हती. ती काळाच्या ओघात आगंतुकपणे रूढ झाली असे अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे. काहीही असले तरी शेकडो वर्षे ही अनिष्ट रूढी चालत आली आहे. अस्पृश्यता चूक आहे व ती सर्वतोपरी गेली पाहिजे यासंबंधी आता कुठेही दुमत नाही. तेव्हा आपल्या सर्वांच्या मनात सामाजिक विषमतेच्या उच्चारणाचे ध्येय जरूर असले पाहिजे. विषमतेने आपल्या समाजात कशी विघटना व दुर्बलता आली हे लोकांसमोर स्पष्ट केले पाहिजे, ती दूर करण्याचे उपाय सांगितले पाहिजेत व सगळ्यांचा आपल्या परीने या प्रयत्नास हातभार लागला पाहिजे. यासाठी विषमतेवर टीका करताना संपूर्ण समाजासंबंधी आत्मीयतेची भावना सदैव अंतःकरणात असली पाहिजे.

         जणु काही आवश्यक असलेली जीवनशक्तीच लुप्त होऊन जावी अशी आपल्या समाजाची स्थिती अत्यंत विचित्र झाली आहे. या बाबतीत आम्ही योग्य प्रकारे चिंतन केले पाहिजे. भंगी समाजाने पिढ्यामागून पिढ्या समाजाचा मैला वाहण्याचे तेच ते काम करीत राहावे हे किंवा ' माझ्या दहा पिढ्या हेच काम करीत आल्या, कुणाला ना कुणाला हे करावेच लागणार आहे तेव्हा माझी पुढील पिढीही हेच काम आपोआप करीत राहील ' असे एखादा भंगी म्हणेल हे आज अगदी असंभव आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जगभर ज्या ज्या शक्ती क्रियाशील आहेत त्या सर्वांचे ज्ञान आणि भान आम्हास असले पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेऊन आम्हास कित्येक आमुलाग्र बदल घडवून आणावे लागतील.

        आमच्यात सद्बुद्धी उत्पन्न झाली असेल तर सर्वांना सामावून घेण्याची तपश्चर्या आम्हास करावीच लागेल. आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. मनुष्याच्या स्पर्शाने अपवित्रता उत्पन्न होते असा आरोप करून त्या स्पर्शाने देवतांचे पावित्र नष्ट होईल असे आपण समजतो तेव्हा आपण देवाच्या देवत्वाचीच हेटाळणी करतो आहोत हे देखील आमच्या लक्षात येत नाही. अशा प्रकारे आपण संप्रदायांच्या मंदिरात पूजा-साहित्य घेऊन प्रवेश करतो तेव्हा विश्वनाथाच्या मंदिराचे विश्वदार बंद करून त्याची अवहेलनाच करीत असतो. जे मनुष्याला कलंकित करते, त्यास क्षुद्र बनवते त्यास ' पुण्य ' कसे म्हणता येईल.                                                             रवींद्रनाथ ठाकूर

           जनतेमध्ये जनार्दन पाहण्याची श्रेष्ठ दृष्टी हीच आमचा राष्ट्र कल्पनेचे हृदय आहे. या दृष्टीमुळेच समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या दिव्य अश्या पूर्ण रूपाचा अंश पाहण्याची प्रेरणा आम्हास मिळते. त्यामुळे सर्व व्यक्ती सारख्याच पवित्र असून आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव पाहणे निंदनीय आहे. अशा प्रकारे समाजसेवेच्या भावनेला आमच्या संस्कृतीमध्ये ईश्वराच्या पूजेचे पवित्र रूप दिले आहे.                                                                                                                              प . पू. श्रीगुरुजी
१०
        हममें से प्रत्येक को सामाजिक असमानता को दूर करने का लक्ष्य सामने रखना चाहिए | हमें लोगों को स्पष्ट रूप से समझाना चाहिए की किस प्रकार इन सामाजिक विषमताओं के कारण हमारा समाज असंघठीत और कमजोर हो गया  | मुक्त होने का मार्ग भी हमें उन्हें बताना चाहिये | समाज के प्रबुद्ध वर्ग के ऊपर इसका विशेष दायित्व है | उन्हें इस प्रकार से विचार और व्यवहार करना चाहिए जिससे  सामाजिक समानता उत्पन्न हो सके और साथ ही साथ समाज में किसी प्रकार की कटूता जागृत न हो | हमे समानता इसीलिए चाहिए की समाज मे सद्भाव सामंजस्य एवं सहयोग का वातावरण स्थापित हो | जो लोग इस मूलभूत दृष्टिकोन को न समझ कर लिखते, बोलते या कार्य करते हैं वे उस उद्देश को ही क्षति पहुंचाते हैं जिसे वे साधना चाहते हैं |

११
       हमारा कार्य अखिल हिंदू समाज के लिए होने के कारण, उसके किसी भी अंग की उपेक्षा करने से काम नही चलेगा | सभी हिंदू भाईयों के साथ, फिर वे किसी भी उच्च या नीच श्रेणी के समझे जाते हों,  हमारा बर्ताव हर एक से प्रेम का होना चाहिये | किसी भी हिंदू भाई को दुत्कारना पाप है |                                    डॉ. हेडगेवार

५५ मानवता

                                       ५५  मानवता 
       अनंत काळापासून आमचा आदर्श सर्व प्रकारचे दैन्य व संघर्ष यापासून मुक्त आणि विश्वैक्याच्या कल्पनेने परिपूर्ण मानवाच्या एकतेचा आहे. युगानुयुगे आमची नेहमी एकच प्रार्थना होत आहे. ' सर्वे अपि सुखिन: संतु सर्वे संतु निरामया: | '
              

५४ नवनिर्माण

                                          ५४  नवनिर्माण 

        भारताच्या भूतकालात जेव्हा आम्ही डोकावतो तेव्हा या देशाची विलक्षण सृजनशक्ती व जीवनातील आनंदाची असीम शक्ती आम्हाला आकर्षित करते. नवनिर्माण चालूच आहे, चालू राहणार आहे. त्याला तृप्तता ठाऊक नाही, थकावट ठाऊक नाही.
                                                                                    - महर्षी अरविंद
     कृत्रिम व परकी विचारधारांबद्दल अर्थशून्य चर्चा करून व त्यांच्या कार्यपद्धतीचे सहसही अनुकरण करून राष्ट्राचे नवनिर्माण होत नाही. त्यासाठी जनजीवनाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करून, प्रदीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेतून निर्माण झालेली देशाची प्रकृती व स्थिती याचा सूक्ष्म अभ्यास करून, व्यक्तिगत व सामुदायिक व्यवहाराचे क्षेत्रात बहुविध व प्रदीर्घ प्रयोग करूनच पुढे जाणे अनिवार्य आहे. प्रत्यक्ष व्यवहाराच्या भट्टीत तापूनच नवनिर्माणाचा साचा तयार होऊ शकतो.

       हमें धर्मराज्य, लोकतंत्र, सामाजिक समानता और आर्थिक विकेंद्रीकरण को आपणा लक्ष्य बनाना होगा | इन सबका सम्मिलित निष्कर्ष ही हमें ऐसा जीवन-दर्शन उपलब्ध करा सकेगा, जो आज के समस्त झंजावात में हमें सुरक्षा प्रदान कर सके | आप इसे किसी भी नाम से पुकारे -हिंदुत्ववाद, मानवतावाद अथवा अन्य कोई नया वाद, किंतु यही एकमेव मार्ग भारत की आत्मा के अनुरूप होगा और जनता में नवीन उत्साह संचारित कर सकेगा | संभव है, विभ्रांति के चौराहे पर खडे विश्व के लिए भी यह मार्गदर्शक का काम कर सके |                                             पं. दीनदयाळ उपाध्याय

        नव्या आदर्शाना अनुरूप अशी जीवनरचना करावयाची असेल तर पारंपरिक (रूढींचा, समजुतींचा) परित्याग करावयास हवा. पश्चिमी राष्ट्रे रूढी सोडून नवनवीन संशोधनात मग्न झाली म्हणूनच ते आपली उन्नती करू शकली. परंतु आपण तर अकल्पिताच्या भयापोटी सदैव असतो. बाहेर पडण्यापेक्षा घरातच पडून राहणे प्रसंत करतो. त्यामुळे आपणात साहसी वृत्तीचा (spirit of adventure ) अभाव आहे. परंतु ही साहसी वृत्तीच कोणत्याही राष्ट्रीय समाजाच्या उन्नतीचा आधार असते.                                                                                                           नेताजी सुभाषचंद्र बोस

५३ समष्टी जीवन

                                        ५३  समष्टी जीवन 
       
१ 
         आपण आपले गुण आचरणातून प्रगट करून समष्टी जीवनाचे आदर्श स्वरूप निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी समाजाशी, परस्परांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. स्नेह, आदर, विश्वास यांनी ओतप्रोत असे व्यवहार आपल्या जीवनात साकार करून दाखवू या.  या कार्यात यश मिळावयास पाहिजेच. अशा पद्धतीने केलेल्या तेजस्वी कार्याच्या गतिमानतेतच बाह्य परिस्थिती अडथळे उत्पन्न करील हे सर्वस्वी अशक्य आहे. माझ्या अंतःकरणातील ही श्रद्धा आहे. हीच श्रद्धा आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात जागविली. कार्य यशस्वी होणारच. ते यशस्वी होईल तसेच ते मजबूतही होईल. कार्याचा जयजयकार सर्वत्र होईल आणि आपण भारताची जशी प्रतिमा उभी करू इच्छितो तशीच ती साकार होईल.
                                                                                                                       श्रीगुरुजी
२ 
       अहं विसरणारी व्यक्ती परिवार व समाजाशी एकरुप होते. तसेच मानवतेशी व संपूर्ण विश्वाशीही एकरूप होऊ शकते. अहम् चा संपूर्णपणे लोप करण्याचा संस्कार, दररोज एकत्र येऊन सामूहिक कार्यक्रमांतून, सामूहिक मनांच्या निर्मितीतून होत असतो. समष्टिगत कार्यक्रमांच्या माध्यमातून समष्टीगत भाव निर्माण होत असतो या मानसशास्त्रीय सिद्धांताचे आधारावरूनच आपल्या कार्यपद्धतीची रचना झाली आहे.

         परिवार के लिए अपने आराम को त्याग देना यह एक ऐसी अवस्था है, जिसे बहुत से मनुष्य प्राप्त कर चुके है, स्री के सन्मान या घरकी सुरक्षा के लिये अपने जीवन का उत्सर्ग कर देना, एक उच्चतर प्रकृति का कार्य है, जिस में मनुष्य व्यष्टी रूप में तथा विशेष वर्गों के रूप में भी समर्थ होता है; परंतु समष्टी रूप में नहीं | परिवार के बाद समाज या संघ आता है और इस प्रकार आत्मा के विस्तार में अगला कदम तब उठाया जाता है, जब शरीरस्थ आत्मा और परिवारनिष्ठ आत्मा के साथ का तादात्म्य, समाजवर्ती या संघवर्ती आत्मा के तादात्म्य के सामने झुक जाता है | यह स्वीकार करना की मनुष्य पर अपने परिवार के अपेक्षा अपने संघ का बडा दावा है, सामाजिक अवस्था की और प्रगती की सबसे पहली शर्त है |                                                              योगीराज अरविंद

        भंगलेले, श्रद्धाहीन, अव्यवस्थित व असंघटित समाजजीवनच आमच्या पारतंत्र्याचे व सर्वदूर झालेल्या दुर्दशेचे मूलभूत कारण आहे. या सर्व दोषांचे निर्मूलन करणे हे आपले परम कर्तव्य आहे.                प. पू.  श्रीगुरुजी

         प्रत्येक समाजाने आपल्या संरक्षणाची व्यवस्था आपणच करावयास हवी हे खरे असले तरी आपण हिंदू समाजाच्या संघटना विषयी बोलतो. त्याचा अर्थ फक्त संरक्षणापुरताच नाही. आपल्यामध्ये गेल्या हजार वर्षांत स्पृश्यास्पृश्य, श्रेष्ठकनिष्ठ, जात आणि वर्णावर आधारित द्वेष, तऱ्हेतऱ्हेच्या निंद्य चालिरीती,  अंधश्रद्धा आणि सामाजिक व आर्थिक बहिष्कार अशा वाईट गोष्टी शिरल्या आहेत. त्या सर्व गोष्टी दूर करून आपले समाज जीवन पुन्हा स्वच्छ व शांततापूर्ण बनवायचे, अन् राष्ट्रजीवन निरोगी व निर्भय बनवायचे हेच आपले ध्येय आहे.

        ज्यांतील सर्वसामान्य माणूस समाजाभिमुख तसेच सहजगत्या सामर्थ्यवान बनून स्वेच्छेने आपल्या समाजाचे पोषण सतत करीत राहील असे समाजजीवन निर्माण करण्याची संघाची कल्पना आहे. या कार्यात किती पिढ्या जातील यावर विचार करणे हा आमचा विषय नाही. आपल्याला तर सतत कार्य करीत रहायचे आहे. अन्य योजना पूरक आहेत. आपले कार्य मुख्य व आधारभूत आहे.

       आता आम्हाला आपल्या कार्यास सामाजिक बैठक देऊन समाजजीवनाच्या सर्व अंगोपांगांमध्ये जावे लागेल. म्हणून हे करताना वैयक्तिक वा कौटुंबिक अडचणी कितीही का येईनात, ही जबाबदारी उचलायचीच असा विचार आपण सर्व स्वयंसेवकांनी करावा.

      स्वहिताची चिंता करीत असतानाच समाज हिताचीही चिंता करणे ही स्वाभाविक अवस्था आहे. व्यक्तिचे हित व समाजाचे हित यात आम्ही कोठेही विरोध वा संघर्ष मानीत नाही. 
व्यक्तीशिवाय समाजाची कल्पना अशक्य आहे. आणि समाजाशिवाय व्यक्तीच्या जीवनाला काहीही मूल्य उरत नाही. म्हणून आम्ही या दोन्हीही घटकांमध्ये समन्वय साधू इच्छितो. 
व्यक्तीच्या विकासाची व समाजाच्या पूर्णतेची ही समन्वयात्मक विचार पद्धती म्हणजे भारताने जगाला दिलेली एक देणगीच होय.

       संपूर्ण व सुदृढ हिंदुसमाज हेच आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असले पाहिजे. जात, भाषा, पंथ किंवा पक्ष यासारख्या अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार या अनन्य समाज भक्तीच्या आड येता कामा नये. हिंदू समाजरूपी जागृत देवतेची भक्ती करताना आपण आपल्या मनातील सर्व फुटीर प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून आपल्या आंतरिक एकतेचा जीवनदायी संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सिद्ध होऊ या. आणि प्रत्येक हिंदू अंतरकरणांमध्ये जीवमान समाजदेवतेची तिच्या अनेकविध गौरवसंपन्न अविष्कारांनी तळपणारी तेजस्वी मूर्ती प्रस्थापित करूया.

१०
        संस्कृती व्यक्ती और समष्टि दोनों से संबंध रखती है, यद्यपि संस्कृति का भाव मूलतः समष्टिगत होता है | संस्कृति के माध्यम से जीवन के वैशिष्ट्य अर्थात् समाज की आत्मा की अभिव्यक्ती होती है | यह सत्य है कि जिस प्रकार ब्रह्म संपूर्ण सृष्टी के बाद भी दस अंगुल बचा रहता है, उसी प्रकार अनेक व्यक्तींयोंसे मिलकर बना होने के बाद भी समाज का अपना एक अलग अस्तित्व और वैशिष्ट्य होता है | इसके साथ यह भी उतना ही सत्य है कि जब समाज क्रियाशील होना चाहता है, तो उसे अपनी भावनाओंके प्रगटीकरण के लिए व्यक्तियों के पुरुषार्थ का ही सहारा लेना पडता है | समाज व्यक्तीयों के बिना काम नही कर सकता अंत:  संस्कृति मूलत: समाष्टिगत होते हुए भी उसका संबंध व्यक्ती हे  आये बिना नहीं रहता |                                               पं. दीनदयाळ उपाध्याय

११
           व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंधांचा आमचा दृष्टिकोन कधीही संघर्षाचा नव्हता, तर सर्व व्यक्तींमध्ये एक सत्य विराजमान आहे, या अनुभूतीतून निर्माण झालेल्या सामंजस्याचा आणि सहयोगाचा आहे. व्यक्ती आणि समाज एकमेकांना पूरक आहेत. परिणामतः दोघांनाही एकमेकांपासून शक्ती प्राप्त होऊन परस्परांचा लाभ होतो.

१२
          भाकरी जीवनासाठी आवश्यक आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की भाकरी खाणारे मरतच नाहीत. ' भाकरी खाणारे एक ना एक दिवस मरतातच म्हणून मी भाकरी खाणार नाही 'असा विचार करून जर कोणी उपवास करून लागेल तर त्याचा परिणाम काय बरे होईल ? निष्कर्ष हा कि भाकरी खाऊनही मृत्यूपासून सुटका नाही आणि भाकरी न खाऊ नही अमरता मिळत नाही. जिवंत राहण्यासाठी भाकरी खाणे आवश्यक आहे, परंतु अमर होण्यासाठी शरीराकडून सत्कार्य होणे आवश्यक आहे. व्यक्तीचे शरीर राखण्यासाठी पूजन आवश्यक असते परंतु व्यक्तीला अमर होण्यासाठी समष्टीचा आधार घेणे आवश्यक असते.                                 पं. दीनदयाळ उपाध्याय

५२ इतिहास

                          ५२ इतिहास 

          भारताचा इतिहास पराजयाचा नसून गौरवशाली संघर्षाचा आहे. जगातील कोणत्याही देशामध्ये धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एवढा दीर्घकालीन त्यागमय आणि यशस्वी संघर्ष झालेला नाही जेवढा भारतातील साधूसंत आणि वीरांगनांनी केलेला आहे. जगात अनेक संस्कृतींचा जन्म झाला आणि काळाच्या कराल आघातांनी शतकातच त्यांचा विनाश झाला, परंतु हिंदु संस्कृती हजारों वर्षांच्या भीषण आघातानंतरही जिवंत आहे.                                                                                                             - डॉ. नित्यानंद 
       आपल्या समाजजीवनात अनेक संकटे, अडचणी आल्या. काही काळ पारतंत्र्य आले. परंतु त्या कालखंडात आम्ही आमचे जीवन सुरक्षित ठेवून पुन्हा राष्ट्राचे उत्थान कसे केले या इतिहासाचे विस्मरण होता कामा नये. आपल्या गौरवशाली इतिहासाचे अध्ययन आपण केलेच पाहिजे.    - पू . श्रीगुरुजी 
            हमारा इतिहास ही हमारा सच्चा पथ-प्रदर्शक हो सकता है। इतिहास में हमारा जो गौरवमय स्वरूप अंकित है उसको अपना कर ही हम अपनी राष्ट्रीयता का परिचय दे सकते है और अन्य राष्ट्रोंके समक्ष सम्मानपूर्ण स्थान प्राप्त कर सकते है।  स्वाधीनता को स्व-तंत्रता के रूप में परिणत कर हम उसका अनुभव करने लगे, इसी में हमारे ऐतिहासिक ज्ञान की सार्थकता है।  यही हमारे इतिहास का सन्देश है ।                                - श्री राघवाचार्य 

     एखाद्या राष्ट्राचा संस्कृतीचा इतिहास म्हणजे त्या राष्ट्राच्या विचारांचा आचारांचा आणि संपादितांचा इतिहास होय. वाङ्मय आणि कला ही आपल्याला राष्ट्राचे विचार निवेदित करतात. इतिहास आणि समाज रचना यावरून राष्ट्राच्या कृत्यांची व त्याने संपादित केलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते.

     भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा. तुमच्या मागे जो अनंत जीवन प्रवाह आहे, त्याचे येथेच्छ प्राशन करा आणि पुढे पहा. पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा. आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा. आम्ही प्रथम त्या तत्त्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत. त्या रक्ताला समजले पाहिजे की जे आमच्या नसानसातून वाहत आहे. आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. भूतकालातील ती श्रेष्ठता व चेतना, त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे.                                                                                                            - स्वामी विवेकानंद
      इतिहास सांगतो की पहिल्यांदा फुट, त्या फुटीतून दुर्बलता व नंतर परकीयांना विजयाची संधी अशी परिणाम-परंपरा निर्माण होते. माणूस स्वभावत:च स्वार्थाकडे आकृष्ट होतो आणि या स्वार्थापुढे उत्तमोत्तम गुणही मातीमोल बनतात. वैयक्तिक मान-मरातब आणि गौरव यांच्या अभिलाषेने परकीयांशी हातमिळवणी करून आपल्याच देशबांधवांवर आघात करण्याची प्रवृत्ती आपल्या इतिहासात विपुल प्रमाणात आढळते. याचा परिणाम म्हणून आपल्याला दुःखद पराभव पहावे लागले.                                                     प . पू. श्रीगुरुजी
         

५१ व्यवहारकुशलता

                                       ५१  व्यवहारकुशलता 
१ 
            आपले चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वछ असले पाहिजे. त्याचबरोबर आपण व्यवहारनिपुण आणि कार्यकुशलही असले पाहिजे. विशुद्ध चारित्र्य, आकर्षक व्यक्तिमत्व आणि सर्वगामी बुद्धिमत्ता यांचा त्रिवेणी संगम जेथे असतो, तेथे कोणत्याही सत्कार्याची उत्तम भरभराट होते. एखादा मनुष्य कितीही चांगला असेल, पण त्याच्या ठिकाणी जर व्यवहारबुद्धी नसेल, तर त्याला यश मिळत नाही.                                       - पू . श्रीगुरुजी 
        संघस्थान हे संस्कारस्थान आहे, तेथे आपण जे संस्कार ग्रहण करतो त्या संस्कारांना अनुकूल असा आपला व्यवहारही असला पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांचा वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार संस्कारानुकूल आहे कि नाही हे बाहेरील लोक बारकाईने पाहतील. 

५० कार्यपद्धती

                                           ५० कार्यपद्धती
            आपण सर्वांनी राष्ट्रकार्याची फार मोठी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. आपल्या उच्च सिद्धांतांना आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखवू , असे आपले म्हणणे आहे. आपली हि कार्यपद्धती आपणाला आपल्या ध्येयाप्रत अवश्य पोहोचवील अशी आपली अढळ श्रद्धा आहे. त्यासाठी आपले विचार आपल्याला आपल्या वागणुकीतून प्रकट करता आले पाहिजेत.                                                                       - पू . श्रीगुरुजी  

           आज संघाच्या विचारांची लाटच सर्वत्र आलेली आहे. राष्ट्र विघातक धोरणे व संघटनांच्या विरोधात तसेच राष्ट्राला हितकारक असलेल्या गोष्टींचे समर्थन करणारे हिंदू मन सर्वत्र थोड्या अधिक प्रमाणात दिसू लागले आहे. संघाने मांडलेली राष्ट्र कल्पना आणि त्या बद्धलची कार्यपद्धती यांची सुरुवातीला टिंगलच करण्यात आली होती पण आज त्याच गोष्टी सर्वत्र सन्मानीत केल्या जात आहेत. अनेक नेतागण, पक्ष आणि संघटनांना संघासारखे संस्कारित आणि शिस्तबद्ध मनुष्यबळ त्यांचेकडे नाही याबद्धल त्यांना हेवा वाटतो. 

           कोणत्याही संस्था किंवा संघटनेची कार्यपद्धती तिच्या ध्येय व हेतू प्रमाणे ठरते. संघाची पण एक विशेष कार्यपद्धती आहे. संघाला जे करायचे त्यासाठी एक विशेष प्रकारचा स्वयंसेवक निर्माण करायचा आहे. तो चारित्र्यवान असेल, अनुशासित असेल, ज्याच्यामध्ये सामूहिक दायित्वाचा बोध असेल आणि सामाजिक जबाबदारीची पण जाणीव असेल अशा स्वयंसेवकांचे संपूर्ण भारतात एक संगठन उभे  राहील अशी कार्यपद्धती आम्ही विकसित केली आहे. 

        पद्धती, रचना, व्यवस्था याशिवाय कोणताही सिद्धांत हा फक्त कोरा सिद्धांतच राहील. त्याचा काही उपयोग नाही. श्रेष्ठ लक्ष्य हे केवळ उच्चारल्यामुळे सिद्ध होत नाही. त्याचप्रमाणे समाज संघटित करा म्हटल्यामुळे समाज संघटित होत नाही. प. पू.  डॉक्टरांचे वैशिष्ट्य हे की उच्च सिद्धांतांना व्यावहारिक रूप देण्यासाठी त्यानी एक कार्यपद्धती निर्माण केली.                                                                            प. पू. श्रीगुरुजी

        अपने चारों और हम जो अन्य कार्य-पद्धतीयां देखते हैं निश्चय ही वे शोर मचाने में विश्वास करती है | संघ के पास ऐसी कार्यपद्धती है जिसने पुनरुत्थानशील एवं पुन: संघठीत राष्ट्रजीवन के स्वप्न को साकार करने में अपनी उपादेयता सब दृष्टियों से प्रमाणित कर दी है |                                                परमपूजनीय गुरुजी


      आमची कार्यपद्धती एकमुखी आहे. सूर्यमालेत एकच सूर्य असतो. त्याच्या आसपास सर्व ग्रह फिरतात. सूर्याभोवती भ्रमण करण्यातच त्यांचे हित असते. ही निसर्गसिद्ध पद्धतीच आपण स्विकारली आहे. आपल्या आसेतुहिमाचल पसरलेल्या विस्तिर्ण समाजात एक सूर्यसदृश्य हृदयपिंड आपल्याला निर्माण करायचा आहे. एकात्मता साधण्यासाठी इतरत्र आढळणाऱ्या प्रणालींना दूर सारून आम्ही ही पद्धत स्विकारली आहे.





सोमवार, २० जुलै, २०२०

४९ प्रचारक

                                                  ४९ प्रचारक 
          विद्युतगृहात नुसती वीज उत्पन्न केल्याने काम संपत नाही. लहानमोठ्या तारांनी ती सर्वत्र पोहोचवावी लागते. म्हणजे मग सगळीकडे प्रकाश पसरतो. प्राचीन काळी साधुसंतजन सर्वत्र परिभ्रमण करून नामघोषाने आकाश दुमदुमवीत असत. श्रीसमर्थ रामदास स्वामींना महाराष्ट्रात अकराशे मठ चालविण्यासाठी जर पुरेसे कार्यकर्ते मिळू शकले तर आज आपणाला ते का बरे उपलब्ध होणार नाहीत ? आपल्याला हा संघटनेचा मंत्र देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. त्यासाठी हजारो व्रतधारी प्रचारकांची आणि सेवकांची आवश्यकता आहे. हि आज देशाची मागणी आहे. तिची पूर्ती व्हायलाच हवी.                                                                                              - पू . श्रीगुरुजी 

४८ स्वत्व

                                                ४८ स्वत्व
 
           एखाद्या राष्ट्राने युद्धामध्ये सोने, हिरे इत्यादी जडजवाहीर गमावले तरी ते कालांतराने पुन्हा प्राप्त केले जाऊ शकते. परंतु जे राष्ट्र आपले स्वत्व गमावते आणि आत्मगौरव विसरते, त्याला आपली भौतिक धनसंपत्ती मिळविणे अशक्य होते. कारण स्वत्व नाही म्हणजे नीतिमत्ता, आत्मविश्वास नाही; आणि राष्ट्रीय जीवनही नाही. स्वत्व आणि स्वाभिमान कोणत्याही राष्ट्रासाठी संजीवक औषधींचे कार्य करतात.                                                                                 - पू . श्रीगुरुजी 

४७ श्रीराम

                                           ४७  श्रीराम 
              प्रभू रामचंद्रांना भगवान का बरे म्हटले जाते ? कारण अगदी बालपणापासून त्यांनी आपल्या आदर्शासाठी आणि स्वधर्मनिष्ठेसाठी दुःखमय आणि कष्टमय जीवन व्यतीत केले म्हणून. अगदी लहान वयात ते विश्वामित्रांबरोबर गेले आणि त्यांनी ऋषीमुनींच्या यज्ञांचे संरक्षण केले. पुढे ते चौदा वर्षे वनात राहिले. तेथे त्यांनी फार मोठा राक्षससंहार केला आणि शेवटी दुष्टशिरोमणी राक्षसराज रावणालाही मारले. त्यांनी आजन्म धर्माचे संरक्षण आणि संवर्धन केले. म्हणूनच आमच्या धर्मानुसार ते अवतारी पुरुष मानले जातात. म्हणूनच आम्ही त्यांना भगवान मानतो.                                                                                                                       - पू . श्रीगुरुजी 

रविवार, १९ जुलै, २०२०

४६ संघटन

                                                ४६  संघटन 
१      
            संघटना ही राष्ट्राची  प्रमुख शक्ती आहे. जगात कोणतेही प्रश्न सोडवावयाचे असतील तर ते सामर्थ्याच्याच जोरावर सुटतात. ज्या राष्ट्रात सामर्थ्य नसते, त्या राष्ट्राच्या मनातील कोणतीही इच्छा सफल होत नाही. पण सामर्थ्यशाली राष्ट्राला वाटेल त्यावेळी वाटेल ती गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे करता येते.                  - पू . डॉक्टर 
             एका परंपरेने युक्त व समान संस्कारांनी सुविकसित झालेल्या समाजाचेच उत्तम संघटन बनते. स्वैर, स्वच्छंदी वर्तन न ठेवता अनुशासनबद्ध जीवन जगणारा व एकाच जीवनहेतूवर लक्ष केंद्रित करून चालणारा समाज सुसंघटित होतो. हजारो मने एकाच विशुद्ध प्रेमाने उत्स्फूर्त होतात तेथेच संघटना संभवते. लाभापेक्षा आणि भोगापेक्षा त्यागाकडे ज्याची प्रवृत्ती असते, ज्याचे सदस्य वज्रनिश्चयी आणि दृढव्रती असतात, तो समाजच खऱ्या अर्थाने सुसंघटित होतो. तो सगळ्या जगाचे मार्गदर्शन करतो.                                                                   पू . श्रीगुरुजी 
           आम्हाला आपला हा हिंदुसमाज इतका सुसंघटित आणि शक्तिशाली करायचा आहे की, इतर समाजांच्या मनात हिंदूंबद्धल अगदी पाहताक्षणीच आदर उत्पन्न झाला पाहिजे. येथे साध्य व साधन एकरूप आहेत. संघटन हेच साध्य व संघटन हेच साधन. संघटित असणे हीच प्रत्येक जिवंत समाजाची स्वाभाविक अवस्था असते. केवळ सुसंघटित समाजच आपल्या सगळ्या समस्या यशस्वी रितीने सोडवू शकतो हे आम्ही विसरता काम नये. 

४ 
    समान उन्मयकारी आदर्श रखनेवाले हम सबको संघटित होना होगा | इस संघटन में और इस संघटन द्वारा हम लोग अंध:कार और विनाश की समस्त विरोधी शक्तीयोंका सामना करेंगे | संघटनमें ही विजय की निश्चिती है |
                                                                                          श्री मां 
       सर्व प्रकारच्या शक्तीचा मूळ स्त्रोत असतो समाज. अन्य गोष्टी केवळ साधनमात्र असतात. म्हणून प्रथम समाजाला विशुद्ध व प्रबळ बनविणे आवश्यक आहे. समाजातील सूत्रबद्ध व राष्ट्रभक्तीने परिपूर्ण अशा व्यक्तींच्या संघटनेतच राष्ट्राची शक्ती विहित असते. संघटनेने समाजात आत्मविश्वास उत्पन्न होतो आणि बलशाली व आत्मविश्वाससंपन्न समाजच आपले जीवन व्यवस्थित रीतीने चालवू शकतो. म्हणून हिंदू समाजाचे संघटन हेच आमचे ध्येय आहे. त्याची निर्मिती हे आपले परमकर्तव्य आहे.

        प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये संपूर्ण समाजाबरोबरच एकात्मतेचा भाव जागृत करणे हा आमच्या संघटन या शब्दाचा अर्थ आहे. मी वेगळा नाही, निराळा नाही, स्वतंत्र नाही, तर या संपूर्ण समाजाचा मी एक घटक आहे. जसा शरीराचा एक एक अवयव हा शरीराचा घटक असतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षुद्र अहंकाराला मूठमाती देऊन उच्च अशा विचारांमध्ये समाविष्ट व्हावे. परंतु अहंकाराचा संपूर्ण लोप करण्यासाठी वरील संस्कार रोज एकत्रित येण्याने व सामुदायिक कार्यक्रमातून संघटित मनाच्या निर्मितीने होतात. सामूहिक कार्यक्रमातून सामूहिक मनांची निर्मिती होते या मनोविज्ञानाच्या सिद्धांतावर संघाची कार्यपद्धती उभी आहे.

७ 
          संघटन शास्त्रात अहंकार, आत्मस्तुती, बलप्रयोग किंवा व्यक्तिगत प्रतिष्ठा यांना किंचितही स्थान असू शकत नाही. ' संघटन '  या शब्दातच हा अर्थ ध्वनित होतो की संघटनेत व्यक्तिगत अभिमानाचे अस्तित्वच असंभव आहे. परंतु त्याचबरोबरच संघटनेसाठी आदर्श व्यक्तित्वाच्या गुणांचीही अत्यंत आवश्यकता आहे. अन्य क्षेत्रातही आपल्या गुणांचा अनेक प्रकारांनी आदर होईल आणि त्या गुणांमुळे आपण किर्तिमान बनू शकू यात संशय नाही. परंतु आपण आपले सर्वस्व संघटनेच्या कार्यात झोकून देऊ शकू तेव्हाच या गुणांचे सार्थक होईल.            प. पू. डॉ . हेडगेवार

      संघटनेचा पाया अधिक बळकट व मजबूत झाल्याखेरीज त्यावर संघटनेची वास्तू स्थिर होणार नाही. कच्च्या पायावर उभी असलेली वास्तू प्रारंभी मनोहरी व सुंदर अवश्यमेव दिसते परंतु झंजावातात ती क्षणार्धात जमीनदोस्त होते. म्हणून जितकी भव्य व विशाल वास्तू उभी करण्याचा आपला संकल्प असेल तितक्या अनुपातात त्या वास्तूचा पाया विस्तृत व मजबूत असण्याची आवश्यकता असते.                                               डॉ. हेडगेवार

         ज्या कार्याची सर्वप्रथम व नेहमीसाठी आवश्यकता असते ते करणे हे आमचे कर्तव्य आहे. बाकीच्या गोष्टी जीवनाच्या सुखदुःखात महासागराच्या लाटांप्रमाणे येत जात राहतील. राष्ट्रीय चेतनायुक्त, सुसंघटित सुसूत्र असे सामर्थ्य निर्माण करण्यावाचून अन्य काहीही आपल्याला करायचे नाही.                             प. पू. श्रीगुरुजी

१०
        हमारे संघटन का कार्य जो समाज के प्रति आत्यंतिक भक्ती के कारण उत्पन्न होता है, स्व-प्रेरित तथा स्व-आधारित है | अपने स्वीकृत ध्येयपथपर हमारी पूर्ण एकाग्रता ने ही जो की शाश्वत, शक्तिशाली, आत्मनिर्भर राष्ट्रजीवन के मूलाधार रूप सिद्धांतों के परिपूर्ण ज्ञान से उत्पन्न होती है, हमारे इस संघटन को सतत विकासशील और अजेय बनाया है |                                                          श्रीगुरुजी

११
     आपण दीनदुबळे राहिल्यामुळे अत्याचाऱ्यांना अत्याचार करण्याची दुर्बुद्धी व इच्छा सहज होते. जो स्वतःला मदत करू शकत नाही त्याला कोणीच मदत करीत नाही. इतकेच काय प्रत्यक्ष परमेश्वर देखील त्याला पाठमोरा होतो. ' अजापुत्रं बलि दद्यात देवो दुर्बल घातक: ' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून या अत्याचाऱ्यांना पायबंध घालण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे एकत्वाची भावना निर्माण करून हा हिंदू समाज संघटित व प्रभावशाली करावयाचा.

४५ एकत्रीकरण

                                           ४५ एकत्रीकरण 
            एवढी गोष्ट आपण सर्वांनी नेहमी लक्षात बाळगावी की, हे सामर्थ्य आपणां सर्वांच्या दररोज एके ठिकाणी जमण्यात आहे. जोपर्यंत आपण दररोज एके ठिकाणी जमून अंतःकरण मोकळे करून एकमेकांशी विचारविनिमय करीत रहाल तोपर्यंतच हे सामर्थ्य आपल्यात दृग्गोचर होईल.                                                                                            - पू . डॉक्टर 

४४ तत्व

                                        ४४  तत्व 
           तत्वे हि आचरण्यात आणण्यासाठीच असतात, हे आपल्याला लोकांना पटवून द्यायचे आहे. संघाने उचललेली कार्यपद्धती हीच आम्हाला आमच्या ध्येयाप्रत पोचविणारी आहे, हे जनतेच्या निदर्शनास प्रत्यक्ष उदाहरणाने आणून द्यायचे आहे.                                                                         पू . डॉक्टर 

४३ आचरण

                                          ४३  आचरण 
           ह्या भारतवर्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदूंशी आपली वागणूक बंधुप्रेमाची असली पाहिजे. लोक कसे वागतात आणि काय बोलतात हा प्रश्न नाही. आपले आचरण जर सर्वस्वी दोषरहित असेल, तर आपले सर्व हिंदू बांधव आपल्याकडे आकर्षित झालेच पाहिजेत.                                                  - पू . डॉक्टर 
         आपण सर्वांनी राष्ट्रकार्याची फार मोठी जबाबदारी शिरावर घेतली आहे. आपल्या उच्च सिद्धांतांना आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखवू असे आपले म्हणणे आहे. आपली हि कार्यपद्धती आपणाला आपल्या ध्येयाप्रत अवश्य पोहोचविल अशी अटळ श्रद्धा आहे. त्यासाठी आपले विचार आपल्याला आपल्या वागणुकीतून प्रकट करता आले पाहिजेत.                                                                  - पू . डॉक्टर
         संघाचे तत्वज्ञान उच्च आहे. संघाची कार्यपद्धती चांगली आहे. पण समाजावर संघाचा प्रभाव पडणार असेल, तर तो स्वयंसेवकांच्या माध्यमातून ! कंदील आहे. त्यात तेल आहे. वात आहे पण कंदिलाच्या काचेला काजळी आली असेल, ती जर स्वच्छ नसेल तर प्रकाश चांगला पडणार नाही. म्हणून आपल्या स्वयंसेवकांची ही मोठी जबाबदारी आहे की आपल्या वागणुकीमुळे संघाला कोणत्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही.               - मोरोपंत पिंगळे 

        जब कार्यकर्ता अपने चरित्र की शक्ती के साथ वाणी एवं व्यवहार के माधुर्य का संयोग कर देता है तभी वह दुसरों को एकत्रित करके सभी प्रकार की परीक्षाओं एवं कष्ट में साहचर्य-भावना के साथ खडा कर सकता हैं |.                                                                                                                परमपूजनीय गुरुजी