शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६६

                        विवेकानंद अमृत २६६

     इतर समाजामध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना मी नवे ठेवीत नाही . त्यांच्यापुरत्या त्या चांगल्या असतील, पण आपल्या दृष्टीने नाहीत . त्याच्या दृष्टीने जे अमृत आहे ते आपल्या दृष्टीने विष असू शकेल हे सर्वात प्रारंभी ध्यानात ठेवले पाहिजे . त्यांची शास्त्रे, त्यांच्या संस्था, त्यांच्या परंपरा या सर्वांतून त्यांची आजची समाजव्यवस्था घडली आहे . आपल्या पाठीशी आपली सहस्रो वर्षांची परंपरा, सहस्रो वर्षांचे संचित आहे . ते आपल्या नसानसांतून वाहात आहे . त्यातूनच आपला स्वभाव घडला आहे व त्याच मार्गाने जाणे आपणास हितावह होय . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा