मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४२

                          विवेकानंद अमृत २४२

     हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमुलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत . त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत . पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्च्यात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्यांना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही . अशांना परकीय कल्पना आपल्या धर्मात आणण्याविषयी फार उत्साह असतो . मूर्तीपूजेविरुद्ध एकाच धोशा त्यांनी लावलेला असतो . हिंदू धर्मात मूर्तीपूजा असल्याने हिंदुत्व सत्य नाही असा प्रचार ते करीत असतात . पण या तथाकथित ' मूर्तीपुजे ' मागे तत्व तरी काय याचा विचार ते करीत नाहीत . उगाच दुसरे लोक म्हणतात म्हणून ते हिंदुत्वावर खोटेपणाचा आरोप करतात . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा