गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४१

                       विवेकानंद अमृत ३४१

     मनुष्यमात्राचे सत्यस्वरूप कोणते याविषयीचे गहन चिंतन प्रथम येथेच उदेजले . अंतःसृष्टीचा शोध सुरु झाला . आत्म्याचे अमृतत्व, सर्वसाक्षी परमेश्वराचे अस्तित्व, मनुष्यमात्रात आणि निसर्गात भरून राहिलेली ईश्वरी सत्ता याविषयीचे तत्वज्ञान येथेच निर्माण झाले . धर्म, तत्वज्ञान यातील चिंतनाने येथेच परिपक्वतेचे शिखर प्राप्त केले . अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्या चैतन्यलहरी येथून पुनःपुन्हा उसळत निघाल्या आणि त्यात संपूर्ण जग पुनःपुन्हा सुस्नात झाले .  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा