शनिवार, ४ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३०

                         विवेकानंद अमृत ३३०

     एके काळी ग्रीक योद्ध्यांच्या सामर्थ्यवान पदाघाताखाली सारे जग थरथरत होते . पण तो ग्रीकांचा प्राचीन देश या भूमितलावरून पार पुसला गेला आहे . आता त्याविषयी सांगण्यासारख्या कथासुद्धा उरलेल्या नाहीत . एके काळी तीक्ष्ण दृष्टीचे रोमन गरुड जगात जे जे वांछनीय आहे त्यावर नजर ठेवीत होते . त्यावर घिरट्या घालीत होते . मनुष्यजातीच्या उरावर रोमनसत्ता स्वार झाली होती. रोमच्या नावानेही अवघे भूमंडळ थरकापत असे . पण जेथून सीझर राज्य चालवीत असे त्या केपिटल ह्या टेकडीवर आता केवळ केविलवाणे अवशेष आणि कोळीष्टके शिल्लक आहेत .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा