गुरुवार, २ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३२८

                        विवेकानंद अमृत ३२८

    आपण अजून चैतन्यशाली आहोत . मनू  जर आजच्या काळात परतून आला तर तो बिलकुल गोंधळून जाणार नाही . आपण कुठल्यातरी परक्या प्रदेशात आलो आहो असे त्याला वाटणार नाही . सहस्रो सहस्रो वर्षे विचार करून जे नीतीनियम येथे बसविलेले आहेत ते शतकानुशतकांच्या संचित अनुभवातून दृढमूल झालेले सामाजिक नियम कशानेही बदलत नाहीत . आघातामागून आघात होतात . त्यांचा परिणाम एवढाच होतो की हे नियम आणि चालीरीती अधिकच बलवत्तर होतात . अधिकच स्थिर होतात . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा