विवेकानंद अमृत २३९
मूर्तीपूजेचा ज्याने निषेध केला त्याने स्वतः च्या दैवताखेरीज अन्य सर्वांच्या दैवतांना निषिद्ध मानले . परमेश्वर एखाद्या प्रतीकाच्या रुपात, सुंदर रुपात प्रकट झाला तर ती भयंकर गोष्ट आहे, असे ज्या ज्यू पुरुषाने म्हटले. त्याची पूजा करणे पाप आहे असेही त्याने घोषित केले . पण देवदूत एक पेटी घेऊन चालले आहेत, त्यांच्यावर एक ढग तरंगत आहे असे जर परमेश्वराचे रूप असले तर मात्र ते पवित्र-पवित्रतम आहे ! कबुतराच्या रूपातला परमेश्वर पवित्र आणि गायीच्या रूपातला अत्यंत अपवित्र - त्याचा त्याग करा ! धिक्कार करा ! हा कोणता न्याय ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा