विवेकानंद अमृत १६३
व्यापक होणे - विस्तारणे ही चैतन्याची खूण आहे . आपल्याला चैतन्यपूर्ण रहायचे असेल तर जगात सर्वत्र गेले पाहिजे . ज्या क्षणी ही विस्ताराची उर्मी थिजेल त्या क्षणी मृत्यू ठरलेलाच आहे . मी युरोप - अमेरिकेस प्रयाण केले कारण ती काळाची गरज होती . आपले राष्ट्रीय चैतन्य व्यापक होत आहे याचे ते पहिले शुभचिन्ह होते . त्या स्फुरणाऱ्या राष्ट्रीय चैतन्याने जणू मला बाहेर फेकले, आणि सहस्रांना ते बाहेर फेकील . माझे हे शब्द स्मरणात ठेवा . जोवर हे राष्ट्र जिवंत आहे तोवर हे घडणारच . आपण असे बाहेर जाऊ तरच जगाच्या ज्ञानसंचायात आपण काही मोलाची भर घालू शकू .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा