विवेकानंद अमृत १४१
एकूण आशियात आणि विशेषतः हिंदुस्थानात भिन्न वंश, भिन्न भाषा, भिन्न सामाजिक रचना, राष्ट्रीयत्वाच्या भिन्न भिन्न कल्पना यामुळे ज्या अडचणी निर्माण होतात त्या वितळवून टाकण्याचे सामर्थ्य केवळ धर्मात आहे . भारतीय मनाला आध्यात्मिक आदर्शांइतके दुसरे काहीही श्रेष्ठ वाटत नाही . भारतीय जीवनाचा तो प्राणस्वर आहे आणि तीच कार्याची सर्वात सुलभ दिशा आहे . हिंदुस्थानांत धर्म हेच अंतिम गंतव्य आहे, इतकेच नव्हे तर कार्याचे साधन सुद्धा तेच आहे . म्हणून मुळात धर्मात चैतन्य आणल्याखेरीज इतर काहीही करणे व्यर्थ होय . युगानुयुगे येथे अस्तित्वात असलेल्या धर्मशक्तींचे ऐक्य हीच भावी हिंदुस्थानचा निर्मितीची आधारशीला होय .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा