विवेकानंद अमृत १३३
मनुष्याच्या ठिकाणी जे देवत्व आहे त्यावर श्रद्धा ठेवा . त्याच्या ठिकाणी दोष असतील, त्यांच्या हातून चुका होतील, तो कदाचित क्रूर आणि खुळ्या समजुतींना चिकटून बसलेला असेल . परंतु हे सारे काही त्याचा मूळ स्वभाव नव्हे . त्याच्यापुढे श्रेष्ठ आदर्श ठेवले गेले नाहीत म्हणून तो हीन राहिला आहे .
तुम्ही त्याला सत्यदर्शन घडवा . तेथेच तुमच्या कामाची परिसमाप्ती झाली . यापूर्वीच्या त्याच्या समजुती तो या सत्याच्या प्रकाशात पाहील आणि मग ते सारे हीण वितळून जाईल . प्रकाश झाल्यावर अंधार गेलाच पाहिजे आणि सत्याच्या दर्शनाने मनुष्यातील दिव्यत्व प्रकट झालेच पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा