विवेकानंद अमृत १३४
एखाद्या खोलीत शतकानुशतके अंधार आहे . तिथे आपण गेलो आणि रडत बसलो, ' किती बरे अंधार हा, किती बरे अंधार हा ! ' असे रडल्याने अंधार जाईल का ? प्रकाश आणा नि तत्क्षणी अंधार नाहीसा होईल ! हेच तत्व मनुष्य-सुधारणेमागे आहे .
या देशाचे आध्यात्मिक पुनरुत्थान करण्याचा हाच मार्ग आहे . परस्परांशी भांडण करणे वा लोक जे करीत आहेत त्यावर टीकास्त्र सोडणे यातून काहीच साधणार नाही . त्यांच्यापुढे चांगले तेवढे ठेवा . पहा किती उत्सुकतेने ते त्याचा स्वीकार करतील ! सर्व वंश जागृत होऊन उभा राहील आणि बाहु उभारून जे श्रेष्ठ आहे - तेजस्वी आहे त्याचा स्वीकार करील !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा