समाज संघटित करण्यासाठी संघशाखांच्या
भक्कम आधारावर निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या विविध गुणांचा उपयोग करीन हा
विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात पक्का रुजविणे व त्याला कार्यासाठी
उत्साह देणे आवश्यक आहे . -पू . श्रीगुरुजी
२
जर आपल्याला हि जबाबदारी पूर्ण करावयाची असेल तर आपल्या संघशाखेचे स्वरूप उत्कृष्ट असावयास पाहिजे. प्रत्येक ठिकाणी संघाची शाखा हवी आणि त्या संघशाखेवर चांगली उपस्थिती हवी. तिथे चांगले कार्यक्रम व्हावेत आणि संघाच्या संस्कारासाठी योग्य वातावरण हवे. संपूर्ण वायुमंडळ संस्कारयुक्त असावे जेणेकरून शाखेतून संस्कारित झालेले स्वयंसेवक दाही दिशांना जाऊन यशस्वी कार्य करू शकतील आणि समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास संपादन करू शकतील.
३
डॉक्टर
कोरे चिंतक नव्हते त्यांनी व्यक्ती निर्माणासाठी करतात व्यक्तीच्या सुधारण्यासाठी
दैनिक शाखा या आगळ्या वेगळ्या पद्धतीचा विकास केला आणि स्वतःच्या उदाहरणाने हजारो
अंत: करणामध्ये ' हिंदू संघटन ' या स्वप्नाला साकार
करण्याचा संकल्प जागृत केला. -पू. बाळासाहेब देवरस
४
प्रतिदिन
सुसंस्कारांची देवाण घेवाण करणे, स्वतः अनुकूल वातावरण
निर्माण करून इतर लोकांनाही संस्कार देणे यामधून शाखेचे स्वरूप निश्चित झाले .
नेहमी एकत्र राहाणे, स्नेहमय भावनांची
हृदयात खोलवर लावणी होईल असे आवाहन, संघटनेच्या दृष्टीने
असे नेहमी करीत राहण्याची योजना नित्य चालवणे आवश्यक अशी रचना डॉक्टरांनी केली. - पू. श्रीगुरुजी
५
आपल्यासमोर एक श्रेष्ठ अत्यंत भव्य दिव्य ध्येय आहे. अत्यंत सुदृढ, संघटित व अनुशासित जीवनाच्या निर्मितीद्वारेच ह्या ध्येयाची प्राप्ती होऊ शकते. व अशा अनुशासनपूर्ण जीवनाची निर्मिती आपल्या दैनंदिन शाखेवरील संस्कार ग्रहण करण्यातूनच होऊ शकते. म्हणून आपल्या पूर्ण शक्तीनिशी संपूर्ण समाजाला दैनंदिन शाखेकडे आकृष्ट करण्यासाठी आपला वेळ देणे, यापेक्षा आपले अन्य कोणतेही श्रेष्ठतर कर्तव्य असू शकत नाही.
६
शाखा हे केवळ खेळ खेळण्याचे अथवा कवायत करण्याचे स्थान नाही तर सज्जनांच्या सुरक्षेचे मूक अभिवचन आहे. तरुणांना व्यसनमुक्त ठेवणारे संस्कारपीठ आहे. समाजावर अकस्मात येणाऱ्या संकटात त्वरित व निरपेक्ष मदतीचे आशाकेंद्र आहे. महिलांसाठी निर्भयतेचे व सभ्य आचरणाचे आश्वासन आहे. दुष्ट व राष्ट्रद्रोही शक्तींसाठी धाक निर्माण करणारी शक्ती आहे. आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे-समाजजीवनातील विभिन्न क्षेत्रात सुयोग्य कार्यकर्ते उपलब्ध करून त्यांना प्रशिक्षण देणारे विद्यापीठ आहे. - बाळासाहेब देवरस
७
जेथे आपल्या महान मातृभूमीचे पुत्र चांगल्या संख्येत एकत्र येऊन खेळतात, आपल्या देवतास्वरूप असलेल्या भारतमातेचे यशोगान गातात. तिचा गौरव वाढावा म्हणून प्रार्थना करतात, अशा आपल्या संघस्थानावरील पवित्र धुळीमध्येच वास्तविक राष्ट्र निर्माणाची सुप्त शक्ती आहे. ' वॉटर्लुचे युद्ध हे इटन व हॅरोच्या मैदानावर जिंकले ' हे ड्यूक ऑफ वेलिग्टनने काढलेले उद्गार ज्या भावनेतून निघाले तीच हि भावना आहे. - पू. श्रीगुरुजी
८
समाजामध्ये जे भव्य आणि प्रचंड परिवर्तन संघाला घडवून आणावयाचे आहे ते एका तासाच्या या छोट्या कार्यक्रमातून घडून येणार याचे अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. नेहमीचा अनुभव असा आहे की लोक चालत्या-बोलत्या आदर्शाचेच अनुकरण करतात, केवळ कोरड्या उपदेशाचे नव्हे. संघाच्या दैनंदिन कार्यक्रमांतून असे चालते बोलते आदर्श निर्माण होत असतात. त्यांच्यामध्ये लोकांना आपल्या कार्याकडे आकृष्ट करण्याची असाधारण कर्तृत्वशक्ती निर्माण होते. मा. स. गोळवलकर
९
आपल्या संपूर्ण समाजाला संघटित करायचे आहे तर केवळ आत्मीयतेने ते काम पुरे होणारे नाही. त्याच्या जोडीला आपण व्यक्तिगत अभिमान सोडून, परस्परांना समजावून घेऊन, सूत्रबद्धतेने साऱ्या समाजाच्या कल्याणासाठी आम्हा सदैव कार्यमग्न राहिले पाहिजे. अर्थातच आपले जीवन समाजाविषयीच्या आत्मीयतेने भरलेले असावे, समाज समर्पित असावे, तसेच ते परस्परांशी सुसंवाद राखणारे, अनुशासनाच्या सूत्रात बांधलेले राहावे, याची खरी आवश्यकता आहे. या आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी अनुशासनाचे सूत्र आत्मसात करण्यासाठी आम्हास दिनप्रतिदिन त्याचे शिक्षण घेणे अनिवार्य आहे. प. पू. श्री गुरुजी
१०
दिसायला आपली दैनिक शाखा लहानशी गोष्ट दिसते. परंतु आपल्या २४ तासांच्या जीवनक्रमाची अशी व्यवस्था करायची की, रोज एक तास मी संघाकरिता, समाजाकरिता, देशाकरिता देईन. हा एक मोठा संस्कार आहे.
या संस्कारामुळे मनाची घडण होते. समाजासंबंधी आत्मीयता निर्माण होते. मनामध्ये सामर्थ्य निर्माण होते व त्यामुळे कोणतीही अवघड कामे करावी लागली तरी ती करण्याची धडाडी स्वयंसेवक दाखवू शकतो.
प्रत्येक स्वयंसेवकाने निश्चय केला पाहिजे की मी शाखेत रोज जाईनच. मी शाखेत गेलो तर संख्या चांगली राहील, कार्यक्रम चांगले होतील. अन्य स्वयंसेवकांना हुरूप येईल.
११
भीषण वादळातही आपण अविचल राहिलो. याचे एकमेव कारण म्हणजे आमची दैनंदिन शाखा. म्हणून शाखेचा संख्यात्मक व गुणात्मक विकास कसा होईल याकडे आपले लक्ष असले पाहिजे.
१२
शाखेत नित्यनियमाने अगदी रोज जे शिक्षण दिले जाते त्यातूनच संपूर्ण समाजाशी एकरूप होण्याचे आणि सुसंघटित कार्यशक्तीचे संस्कार होत असतात. स्वभावाचे कंगोरे, कानेकोपरे घासून टाकण्याची, समाजातील इतर बांधवांशी एकत्वाच्या भावनेने व्यवहार करण्याची, इतरांचे भिन्न दृष्टिकोन समजून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेण्याची प्रेरणा त्यातूनच मिळत असते. एकाच आज्ञेचे सामूहिकरित्या पालन करण्याचे संस्कार येथे होत असतात. त्यामुळे हळूहळू स्वयंसेवकांच्या रक्तातच अनुशासन भिनते.
१३
लोक समझते है कि रेडियो पर प्रभावी भाषण आ जाने या समाचार पत्रोंमें छप जाने से उनका मन पर प्रभाव पडता है | परंतु लेखों या भाषणों से मन पर संस्कार नही होते है | यदि मन पर संस्कार करना है तो प्रतिदिन एक पवित्र वायुमंडल में मन को रखने की आवश्यकता हुआ करती है | इस दृष्टी से संघने एक अपनी कार्यपद्धती-दैनंदिन संघशाखा-का विकास किया है |
१४
संघाच्या कार्यपद्धतीतून राष्ट्रसेवेसाठी संस्कारित व्यक्ती निर्माण होते हा विश्वास संपूर्ण समाजात निर्माण झाला आहे. आमच्या शाखा वाढणे त्यात अधिक संख्या असणे व तेथे होणारे कार्यक्रम अधिक संस्कारक्षम होणे ही आजची फार मोठी गरज आहे. अशा संघशक्तीला समाज सहयोग करण्यास तयार होईल, देश पुन्हा सुख, समृद्ध व सन्मानाचे जीवन जगेल. असा पावन दिवस लवकर उगवावा यासाठी ही सर्वसाधारण चालली आहे. प. पू. राज्जुभैय्या
१५
हमारी ऐसी धरणा है कि, किसी भी समाज की स्वाभाविक अवस्था संघठन की ही अवस्था होनी चाहिये | संघटन से हमारा मतलब है की समाज के प्रत्येक व्यक्ती के हृदय में समाज के साथ एकात्मता का, समाज के प्रति समर्पण का संस्कार अंकित करना | हर व्यक्ति को यह प्रतीत हो की मैं अलग नहीं, पृथक नहीं, स्वतंत्र नहीं, संपूर्ण समाज का अवयव मात्र हूं, समाज के सुख में मेरा सुख, समाज के दुख में मेरा दुःख, समाज के सम्मान में मेरा सम्मान और समाज के अपमान में मेरा अपमान है | यह संस्कार हर व्यक्ती के हृदय पर अंकित करने के लिए ऐसा संस्कार अंकित करने वाली दिन-प्रतिदिन एकत्रिकरण की कार्यपद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपनाई है |
१६
भगवान श्रीकृष्ण यांनी प्राचीन काळात ईश्वर-साक्षात्कार करण्याचा अत्यंत सोपा, आचरण करण्यास सरळ व योग्य असा मार्ग मानवाला दाखविला. आजच्या काळात परमेश्वर-प्राप्तीचा सुगम व सोपा मार्ग स्वामी रामकृष्णांनी दाखविला. तर आजच्या युगात राष्ट्रस्वरूप परमेश्वराशी तादात्म्य होण्याचा अति सोपा व सरळ मार्ग डॉक्टरजींनी दाखविला. हा मार्ग सोपा व सरळ असून, राष्ट्र अमर करणारा आहे.
१७
संघ प्रत्येक लढाई जिंकत आहे, अनेक कामे पार पाडीत आहे. याचे संपूर्ण श्रेय दैनंदिन शाखेला आहे. प्रतिदिन सतत कार्य करणे, कार्य करीत असताना आपल्या मनावर दृढ संस्कार करीत राहणे, ते मंद किंवा दुर्बल होऊ न देणे आणि आपल्या समाजाला एकमेकांच्या निकट सहवासातून उत्पन्न झालेल्या नित्यसिद्ध शक्तीनिशी उभे करणे आवश्यक आहे. आपली दैनंदिन शाखा व तिचे कार्यक्रम यांचा हा सुस्पष्ट हेतू आहे.
१८
संघाचा स्वयंसेवक हा इतर संघटनांतील सेवकांसारखा नसतो, तर तो एक चारित्र्यसंपन्न, लोकसंग्रही, राष्ट्रसमर्पित व्यक्ती असतो. तो निर्हेतुक प्रेम करणारा आणि आपल्या व्यवहाराने लोकांची मनी जिंकणारा असतो. अशा व्यक्ती निर्माण करणे हे शाखेचे काम आहे.
१९
संघस्थान हे संस्कार स्थान आहे, तेथे आपण जे संस्कार ग्रहण करतो त्या संस्कारांना अनुकूल असा आपला व्यवहारही असला पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांचा वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार संस्कारानुकूल आहे की नाही हे बाहेरील लोक बारकाईने पाहतील.
२०
हमें ध्यान में रखना चाहिए की शाखा के बिना हम भिन्न-भिन्न कार्य नही कर पायेंगे | जहां अपनी शाखा अच्छी चलती है वहां कोई भी कार्य आया तो उसे हम निश्चयपूर्वक सफल कर सकते हैं | अंत: संघ शाखा के कार्यक्रम, उसकी आचारपद्धती, स्वयंसेवक का व्यवहार, स्वयंसेवक का स्वभाव आदी की और हम ध्यान दे और शाखाओं का प्रसार तथा दृढीकरण करने का एकाग्रचित्त से प्रयत्न करें इतना यदि हम करेंगे तो सब क्षेत्रों में हम लोग विजय प्राप्त करेंगे | श्री गुरुजी
२१
संघ केवळ शब्दोंका खेल न होकर एक आचरणीय जीवनपद्धती है तथा मन और तन को उस पद्धती की आदत लगाने के लिए संघ के दिन प्रतिदिन के कार्यक्रम अत्यंत प्रभावी साधन है | डॉ .हेडगेवार
२२
“दररोज आदर्श मूल्यांची देवाण-घेवाण करणे, स्वतःसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि इतरांवर
संस्कार करणे, यातूनच शाखेचे स्वरूप
ठरले.डॉक्टरजींनी दैनंदिन जीवन एकत्रितपणे जगण्यासाठी,प्रेमळ अंतःकरणात भावनांचे खोलवर रोपण होण्यासाठी, दैनंदिन आधारावर,सातत्याने करण्याची एक अभिनव
कार्यपद्धती निर्माण केली, जी संगठनेच्या दृष्टिकोनातून उद्देश पुर्तीकरिता आवश्यक आहे. श्रीगुरुजी