१२१ व्यवस्था
१
एक सार्वजनिक कार्यकर्ता केवळ व्यवस्थित व अनुशासित असून चालणार नाही तर अव्यवस्था व कमतरता शोधून ती दूर करण्याची त्यांच्यात क्षमता असले पाहिजे. त्यासाठी समतोलबुद्धी असली पाहिजे. त्याला योग्य वेळी योग्य व्यक्तीचा उपयोग करून घेता आला पाहिजे व अव्यवस्था होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही समूहात, समाजात किंवा राष्ट्रांत अव्यवस्था निर्माण झाली की त्याचा ऱ्हास होतो. श्री. एकनाथजी रानडे
२
ज्याप्रमाणे एखादा वैद्य शरीरात उत्पन्न झालेल्या विकाराचा शोध घेतो किंवा एखादा यंत्रज्ञ यंत्रात निर्माण झालेला दोष शोधून काढतो त्याप्रमाणे संघटकानेही इतके दक्ष व जागरूक असायला हवे की संघटनेतील दोष तो शोधू शकेल. त्याचे डोळे व कान इतके तयार झालेले असावे की संघटनेतील दोष ताबडतोब त्याच्या ध्यानात यावेत व त्याने ते अविलंब दूर करून संघटना पुन्हा सुव्यवस्थित करावी. परंतु हे कार्य तोच करू शकेल जो स्वतः सुव्यवस्थित आहे. एखादा अव्यस्थित माणूस संघटना उभी करू शकत नाही. त्यातील दोष जाणू शकत नाही किंवा ते दूरही करू शकत नाही. एकनाथजी रानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा