११३ आधुनिकता
१
काही लोक आधुनिकतेच्या बेटावर राहतात . भूतकाळ हा दिवाळखोरीचा असून त्यातून घेण्याजोगे काही नाही अशी त्यांची समजूत असते . आघाडीवर पराक्रम करणारे सैनिक पिछाडीवरील शिदोरीच्या आधारावरच लढत असतात यावर त्यांचा विश्वास नसतो . त्यांना हे आवर्जून सांगितले पाहिजे की जेव्हा एखाद्या समाजाला त्यांच्या विचारांची बीजे त्या समाजाच्या समृध्द परंपरेत सापडतात तेव्हाच त्या समाजाच्या गौरवशाली पुनरुत्थानाच्या कालखंडाला प्रारंभ होतो .
ज्या दुर्दैवी लोकांनी आपली समृद्ध परंपरा हरवली आहे, त्यांनी वर्तमानकाळही गमावला आहे . समृद्धतेचे बीजारोपण करण्याची जमीन त्यांच्यापासून दुरावली असून आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार भटकत आहेत . जगातील अशा लोकांमध्ये आम्हीही एक आहोत असा गैरसमज आपण करून घेता कामा नये .
- रविंद्रनाथ टागोर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा