बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

११४ राष्ट्रीय एकात्मता

                             ११४ राष्ट्रीय एकात्मता 

        राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ? जिला आपण अनादिकालापासून मातृभूमी मानत आलो आहोत, तिच्याविषयी ज्वलंत निष्ठा आपण या थोर मातेची लेकरे आहोत या जाणिवेतून निर्माण झालेला स्नेहभाव, भातृभाव. समान संस्कृती व वारसा, समान इतिहास व परंपरा आणि समान आदर्श व आकांक्षा यामधून निर्माण झालेली समान राष्ट्रीय जीवनाची उत्कट जाणीव. अर्थात हिंदू राष्ट्रीयत्व, हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा भक्कम आधार आहे.     पू. श्री गुरुजी

        जोपर्यंत समाजात आपल्या स्वतःचा अभिमान जागृत होता व त्यामुळे भूमि, धर्म, संस्कृती आणि राष्ट्राची एकात्मतेची भावना विद्यमान होती तोपर्यंत या समाजाकडे डोळे वाकडे करून पाहण्याचे साहस कोणाचे झाले नाही. असा इतिहासातून आपल्याला धडा मिळतो. परंतु एकात्म जीवनाचे विस्मरण झाल्याबरोबर लहान मोठे स्वार्थ आपल्यात घुसले,  सत्तालोभामुळे राज्ये एकमेकांशी भांडू लागली. त्यामुळे आपण निर्बल झालो आणि गुलामी बरोबरच अनेक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागले.                                                              श्रीगुरुजी

        परस्परांचा द्वेष व तिरस्कार करण्याच्या भावनेमुळेच गेली हजार वर्षे आमच्या राष्ट्रीय जीवनाचे रूपांतर कत्तलखान्यात झाले होते. आजही प्रांत, भाषा, पक्ष, पंथ, संप्रदाय इ. नवीन रूपांमध्ये ही भावना मृत्यूचे तांडव करीत आहे. आजही राष्ट्रीय भावनेच्या त्याच घातक रोगामुळे आमचे शत्रू कोण व मित्र कोण हे ओळखण्याची पात्रताच आम्ही गमावून बसलो आहोत. आजही तसेच सुरू आहे.                                      प. पू.  श्रीगुरुजी

         माझी दृढ श्रद्धा आहे की भारत एक आणि अविभाज्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे. समान मातृभूमी, समान हित आणि समान प्रेम जी शक्ती वेद आणि उपनिषदे यांच्या वचनात, उपासना पंथ आणि साम्राज्ये यांच्या निर्मितीत, विद्वानांच्या विद्वत्तेत आणि संतांच्या चिंतनात प्रकट झाली, तीच शक्ती पुन्हा आमच्यात अवतीर्ण झाली आहे आणि आज तिचे नाव आहे राष्ट्रीयता ! माझा विश्वास आहे की भारताच्या वर्तमान काळाची मुळे त्याच्या भूतकाळात खोलवर रुजलेली आहेत व त्याच्यापुढे एका उज्वल भविष्यकाळाचा प्रकाश पसरू लागला आहे.                                                                                                                      भगिनी निवेदिता
         ज्या असामजिक व असंघटीत किटाणूंच्या प्रादुर्भावामुळे भूतकाळात आमच्या देशाची दुर्दश झाली होती, त्याच रोगाची कीड आजही आमच्या राष्ट्रीय मर्मस्थळांना लागलेली दिसत आहे. त्यामुळे ही शंका नक्कीच आहे, की तोच रोग पुन्हा आमचे स्वातंत्र्य नष्ट तर नाही करणार ?या परिस्थितीत, राष्ट्रीय चेतना आणि सामाजिक एकात्मता पुन्हा जागृत करून एक मजबूत, सुसंघटित राष्ट्रीय जीवन तयार केले पाहिजे.”                      पू.श्रीगुरुजी 
                                                                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा