बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

१२२ कृतिशीलता

                                   १२२ कृतिशीलता  
१ 
         ज्याच्या जीवनातील प्रत्येक पाऊल त्यांनी स्वीकारलेल्या सिद्धांतांनुरुप पडत असते तोच पुरुष वंदनीय आणि अनुकरणीय मानला जातो. कृतीशिवाय सिद्धांतनिष्ठा पांगळी असते. अशा निरर्थक गप्पा किंवा कृतीहीन सिद्धांतांनी कोणतेही कार्य कधी होऊ शकले नाही; भविष्यात कधी होणारही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघास जर प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यावयाची असेल, जनतेच्या मनात संघाच्या कार्यासंबंधी आदरभावना निर्माण करायची असेल आणि जर संघाचे कार्य व्यवस्थितपणे प्रगतीपथावर नेण्याची आपली आकांक्षा असेल तर संघाचे सिद्धांत आणि स्वयंसेवकांचा व्यवहार याचा मेळ घातला गेला पाहिजे.                                                                          प. पू. डॉ . हेडगेवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा