११६ राष्ट्रहित
आपल्या समाजाकडे मनुष्यबळ होते, धनभांडार होते, शस्त्रे होती, परंतु मी या राष्ट्राचा घटक आहे म्हणून जीवनात राष्ट्रहिताला अग्रस्थान द्यावयास हवे . आणि जरूर पडल्यास आपले सर्वस्व राष्ट्रहितासाठी समर्पित करावयास हवे याची जाणीव नव्हती . म्हणून सर्व प्रकारे बलशाही असूनही आपला समाज परास्त झाला . म्हणून सर्वात आधी हिंदू समाजामध्ये ही राष्ट्रीय वृत्ती जागृत करून संघटीत करण्याची आवश्यकता आहे .

- लक्ष्मणराव इनामदार
२
शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यांमुळेच आमच्यात काही विकृती, उच्चनीचतेचे भेद, आर्थिक विषमता, मागासलेपणा, जातिवाद इत्यादी दोष उत्पन्न झाले असावेत. परंतु या दोषांचेच हत्यार परजून कोणी विदेशी शक्ती आमच्या ' स्व ' त्वाचेच अपहरण करून पाहतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांची ही असुरी आकांक्षा आम्ही धुळीस मिळवू . या आमच्या घरगुती समस्या आहेत. आम्ही त्या परस्पर मिटवून टाकू. व्यक्तिगत लाभासाठी किंवा सामाजिक दृष्टीने अवनत स्थितीतून बाहेर येण्याच्या इच्छेपोटी आम्ही कोणत्याही विदेशियांचे हस्तक बदलणार नाही. आपल्यातूनच उत्पन्न होणाऱ्या ' जयचंदां 'पासून आम्हास अत्यंत सावध राहिले पाहिजे. ज्या राष्ट्राचे तसेच समाजाचे आपण अवयव आहोत त्या समाजाचे हित आपण नीट ओळखले पाहिजे. डॉ . बाबासाहेब आंबेडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा