बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

११५ एकता

                                ११५  एकता 
     एकता, एकता, प्रत्येकालाच एकतेची गरज असल्याचे अनुभवास येते . शेकडो व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने काम करतात तेव्हा त्याचा परिणाम होतो ' शून्य.  '  जोपर्यंत एकाच दिशेने प्रयत्न करणे किंवा एकच ध्येय निश्चित होत नाही, सर्वजण त्या एका विशिष्ट दिशेनेच प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या उन्नतीची आशा करणे व्यर्थ .  कल्याणामध्येच प्रत्येक व्यक्तीचे हित आहे ही गोष्ट सर्वांत अगोदर आपणांस समजली पाहिजे . 
                                                                                - स्वामी रामतीर्थ 

२ 
         प्रजाती आणि धर्ममते, भाषा आणि भूगोल ही अत्यंत गुंतागुंतीची आणि विभिन्नतामय असून सुद्धा, ज्या शक्तींनी आमच्या समाजास एक राष्ट्र म्हणून उभे केले आणि यापुढेही त्यास ऐक्यसूत्रात चिरस्थायी करू शकतात त्या शक्तींचे स्वरूप आता स्पष्ट होऊ लागले आहे. या शक्ती भौतिक क्षेत्राशी संबंधित नाहीत. आमची एकता भौगोलिक एकता नाही; तिचा संबंध आमच्या विचार-जगताशी आहे. जेव्हा जेव्हा केंद्रीय एकतेचा ऱ्हास झाला तेव्हा आमच्या देशाला त्याची कटू फळे भोगावी लागली. आमच्यातील फुटिरता हीच आमच्या पारतंत्र्यास कारणीभूत होती. म्हणूनच आम्हास भाषा, धर्ममते आणि प्रांतीयतेच्या नावावर फुटीरतेस जन्म देणाऱ्या प्रवृत्तीपासून स्वतःस पूर्ण अलिप्त ठेवावयाचे आहे. 
                                                                                                  - डॉ. राधाकृष्णन

३ 
         हे भारत, अध्यात्मिक ज्ञान और प्रकाश के देश ! जगत में अपने सच्चे कर्तव्य के प्रति सचेतन होवो और एकता तथा सामंजस्य का मार्ग दिखाओ |
                                                                                                - श्री मां
       या राष्ट्राचा गेली १३०० वर्षांचा इतिहास उध्वस्त जीवनाचे दृश्य प्रकट करीत आहे. हे जीवन उध्वस्त का झाले ? यासंबंधी इतिहास काय मार्गदर्शन करतो ? इतिहासाचे याबाबत स्पष्ट मत आहे की आम्ही आमच्या भौतिक एकतेच्या संस्कारांना आणि श्रद्धांनां विसरलो. त्याचा अनुभव येणे बंद झाले. म्हणून संपूर्ण समाजाला एकसूत्रात राखणारी चेतना बंद झाली. थांबली. समाज छिन्नविछिन्न म्हणजे शक्तिशून्य बनला. अनुशासन संपले आणि अवनतीचे मार्ग उघडे झाले आहेत.            प. पू.  श्रीगुरुजी

     आपल्याला संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करावयाचे आहे. यासाठी आपण रोज शाखेत एकत्र येतो. भारतमाता ही आपणा सर्वांची मातृभूमी आहे व आपण सर्वजण तिचे पुत्र आहोत. हजारो वर्षांपासून आपण याच भूमीत एकत्र राहत आहोत असे भावनात्मक आवाहन आपण करतो. परंतु हे पुरेसे नाही. याची व्यावहारिक बाजूही आहे. आपण एक आहोत ही भावनात्मक जाणीव जशी असायला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवहारातही एकतेचा अनुभव सहजपणे आला पाहिजे. रोजच्या व्यवहारात आपण सर्वजण समान आहोत असे सर्वांना अनुभवाला आल्याखेरीज हा एकतेचा पाया दृढ व चिरस्थायी होणार नाही. त्या दृष्टीने आपल्यात काय कमी आहे व आपण काय केले पाहिजे याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
                                                                              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा