१०२ हेन्री डेव्हिड थोरो
अमेरिकन विचारवंत
१
जेव्हा जेव्हा वेदातील एखाद्या भागाचे मी वाचन केले तेव्हा तेव्हा मला माझ्या अंतरात एक अद्भुत ज्योत प्रकाशित झाल्याची जाणीव होत असे. वेद विचारात संकुचितपणा वा एकांगीपणा यांचा लवलेशही आढळत नाही. त्याला स्थल, काल वा क्षेत्राचे बंधन नाही, ज्ञान प्राप्तीचा महामार्गच वेदांनी प्रशस्त केला आहे. ज्या ज्या वेळी मी वेदांच्या सान्निध्यात असतो त्या त्या वेळी वसंत ऋतूच्या रात्री एका चमकदार प्रकाशाच्या छत्राखाली आहे, असे मला वाटत राहते.

२
एखाद्या उंच घाटमाथ्यावर आपण मुक्त विहार करीत आहोत अशा
अनुभूतीखेरीज दुसरी कोणतीच भावना हिंदू तत्वज्ञानातील कोणत्याही ग्रंथाचे कुठलेही वाक्य वाचताना माझ्या मनात जागृत होत नाही. कधी हे तत्त्वज्ञान वाळवंटाच्या रखरखाटातील थंड पाण्याची झुळूक वाटते, कधी गंगेतील प्रवाहासारखे भासते तर कधी विशेषतः टीकाकारांसमोर उत्तुंग माथ्याने उभ्या राहिलेल्या हिमालय पर्वताच्या शिखरासारखे वाटते. आजच्या काळातही आपल्या परंपरागत आणि विशुद्ध देशी समृद्धीची झळाळी जशीच्या तशी टिकवून ठेवीत (हे तत्त्वज्ञान) संस्कृत इतक्याचसहजपणे इंग्रजी भाषेलाही आत्मसात करते.
३
ज्यांना चांगल्या ग्रंथाचे वाचन करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनीं चार्लस विल्कीन्स याने भाषांतरित केलेली भगवद्गीता जरूर वाचावी. विशेषतः इंग्रजी लोकांनी तर त्याचे श्रद्धापूर्वक वाचन करायलाच हवे... भगवदगीते समोरकधी कधी मला शेक्सपिअरही तरुण वा किशोरवयीन विचारवंतच भासतो. पूर्वेकडील ज्ञानभांडाराची साधना (पश्चिमी) विद्वानांनी अजूनही चालू ठेवायला हवी, कारण पौर्वात्य भांडारातून जितके ज्ञान पश्चिमेने प्राप्त करायचे आहे त्यातील अनेक पैलू अद्याप आपणास (पश्चिमेला) मिळवायचे बाकी आहेत.
४
प्रातः काल मैं अपनी बुद्धिमत्ता को अपूर्व और ब्रह्माण्डव्यापी गीताके तत्वज्ञान से स्नान करता हूँ, जिसकी तुलना में हमारा आधुनिक विश्व और उसका साहित्य अत्यंत क्षुद्र और तुच्छ जान पड़ता है |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा