९९ कर्नल टॉड
' राजस्थान ' चे लेखक
१
ज्या देशातील दार्शनिक ग्रीस देशातील सिद्धांतांचे जनक आहेत आणि ज्यांच्या ग्रंथांपासून प्लेटो, थेल्स आणि पायथागोरस यांनी विद्या ग्रहण केली असे महर्षी आपल्या देशाखेरीज अन्यत्र कुठे मिळतील ? ज्यांचे खगोलशास्त्रीय ज्ञान पाहून आज देखील युरोपचे लोक आश्चर्यचकित होतात असे ज्योतिर्विद आणखी कुठे असतील ? ज्यांचे वास्तुशिल्प आणि ज्यांनी बनविलेल्या मूर्ती आजही आम्हाला भावमुग्ध करतात . ज्यांचे संगीत आजही आमच्या मनात आनंदाच्या लहरी उठवून सगळे दुःख डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावरील हास्य निर्माण करतात असे श्रेष्ठ पुरुष या देशाखेरीज अन्यत्र कुठे असतील बरे ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा