मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८७

                        विवेकानंद अमृत ८७ 

     युरोपियन लोकांनो ! मला असे सांगा की, कोणत्या देशाला तुम्ही उन्नतीसाठी हात दिलात ? तुमच्याहून दुर्बल वंश तुम्हाला जिथे जिथे आढळले  तिथे तिथे तुम्ही त्यांचा समूळ उच्छेद केलात . तुम्ही त्यांची भूमी बळकावलीत . हे आजतागायत चाललेले आहे . अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पेसिफिक बेटे आणि दक्षिण आफ्रिका यांचा इतिहास काय सांगतो ? तिथल्या मूळ जमाती आता कोठे आहेत ? पशूंची कत्तल करावी तशी तुम्ही त्यांची निर्घृण कत्तल केली आहे .  

सोमवार, २९ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८६

                          विवेकानंद अमृत ८६ 

     आर्य हे सहृदय, उदार होते . त्यांची हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उत्तुंग होती . त्यात पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते .  

शनिवार, २७ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८५

             विवेकानंद अमृत ८५
     स्वतः जगण्याकरिता इतरांच्या मुंड्या मुरगाळाव्यात हे पाश्चात्यांचे ध्येय आहे . आर्यांचे ध्येय सर्वांनाच उन्नत करणे, सुसंस्कृत करणे, आर्य करणे हे आहे .  

विवेकानंद अमृत ८४

               विवेकानंद अमृत ८४ 
     युरोपात दिसते की, सबलांनी दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे . भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे . म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत . 

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८३

                      विवेकानंद अमृत ८३

     कुठल्यातरी ऐतिहासिक कथेभोवती आपल्या प्रत्येक पुरणाची गुंफण झाली आहे . पुराणांचा हेतू हा की, उदात्त सत्यांचे विविध रूपांत मानवांना दर्शन घडवावे . त्यांच्यात ऐतिहासिक वास्तवाचा अंश असेल किंवा नसेलही . पण फार श्रेष्ठ अशा सत्याचा अविष्कार त्यांच्यात झाला आहे हे निर्विवाद . रामायणचेच उदाहरण घ्या . राम प्रत्यक्ष होऊन गेला की नाही हे महत्वाचे नाही . चारित्र्याचे जे उत्तुंग आदर्श रामायणाने निर्माण केले ते महत्वाचे . 

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८२

              विवेकानंद अमृत ८२ 
     आपले तत्वज्ञान हे कोणा प्रेषिताच्या सापेक्ष नाही . भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काही नवीन सांगितलेले नाही . श्रुती व अन्य धर्मग्रंथात नाही असे रामायणात काहीच नाही . ख्रिस्तपंथ ख्रिस्ताशिवाय अस्तित्वातच असूच शकत नाही . मुस्लिम संप्रदाय महंमदाशिवाय असूच शकत नाही . बौद्धपंथ हाही संपूर्णतया बुद्धकेंद्रित आहे . पण हिंदुत्व हे कोणाही विशिष्ट व्यक्तीच्या आधाराशिवायच उन्नत माथ्याने उभे आहे . 

बुधवार, २४ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८१

             विवेकानंद अमृत ८१

    मुसलमानांनी दक्षिण भारतावर स्वामित्व मिळविण्याचा शतकानुशतके प्रयत्न केला . पण त्यांचा जम कधीच बसू शकला नाही . जेव्हा मोगल साम्राज्य विजयाच्या शिखरावर होते तेव्हा दक्षिणेतील दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांनी, शिलेदारांनी त्याला जबर हादरे दिले . रामदासांनी ' धर्मकारणे मरावे ' न्हाणून सांगितले होते . तुकाराम निकराने उभे राहून म्हणत होते : ' देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो . ' या संतपरंपरेच्या पाईकांनी मुघल साम्राज्य नेस्तनाबूत करून टाकले .  

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ८०

          विवेकानंद अमृत ८० 
     प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मुक्तीचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो . राष्ट्रांचेही तसेच आहे . प्रत्येक राष्ट्रातील सामाजिक व्यवस्था या त्या राष्ट्राला प्राणभूत असतात . आणि इतरत्र असलेल्या व्यवस्थांच्या चौकटीत या राष्ट्रातील समाजाला बसवू म्हटले तर ते घातक ठरेल . त्या देशाला अनुरूप अशा नव्या सामाजिक व्यवस्था घडल्याशिवाय जुन्या फेकून देणे हेही हिताचे नाही . प्रगती , विकास हे सावकाशच होतात . 

सोमवार, २२ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७९

             विवेकानंद अमृत ७९ 
     
     दुष्ट चालीरीती आणि लिखित कायदेकानू यांच्याकडे शहाणी माणसे दुर्लक्ष करतात . प्रेम, सद्भाव आणि नीती यांच्या अलिखित नियमांचे ती पालन करीत असतात . ज्या देशात कायदे कमीत कमी आहेत, आणि ही सामाजिक व्यवस्था चांगली की ती यावर काथ्याकूट करावा लागत नाही तो देश भाग्यवान होय . श्रेष्ठ पुरुष नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्या बांधवांच्या उन्नतीला सहाय्यकारी होतात .  

रविवार, २१ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७८

            विवेकानंद अमृत ७८

     धर्म ही खरे म्हणजे अगदी व्यक्तिगत गोष्ट आहे . धर्माविषयी माझी स्वतःची अशी काही धारणा असते; ती मला पवित्र आणि गोपनीय असते . कारण माझी धारणा जशी आहे, तशीच काही तुमची असणार नाही हे मला ठाऊक आहे . आणि दुसरे म्हणजे माझ्या धारणा इतरांना सांगून त्यांच्या मनात खळबळ का उडवून द्यावी ? ते लोक येउन माझ्याशी भांडू लागतील . पण मी माझी धारणा माझ्यापाशी ठेवली तर भांडण्याचे कारण उद्भवणार नाही . म्हणून ' इष्ट ' हे नेहमी गुप्त ठेवले पाहिजे . तुमचा आणि ईश्वराचा संवाद हा अगदी एकांतातच व्हायला हवा . 

शनिवार, २० एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७७

          विवेकानंद अमृत ७७
     धर्माचा जो तत्वज्ञानात्मक भाग आहे तो विराट लोकसमुदायांना एकाच वेळी शिकविता येईल. पण धर्माची जी साधना आहे ती एकेकट्यानेच करावी लागेल . तुम्ही सांगाल त्या क्षणी माझे मन भगवतभक्तीने भरून कसे बरे येईल ? अशा अट्टाहासपूर्वक केलेल्या प्रार्थना म्हणजे खऱ्या प्रार्थनांची विडंबने होत .ती धर्माची थट्टा होईल . ती ईश्वराची निंदानालस्ती होईल .  

विवेकानंद अमृत ७६

              विवेकानंद अमृत ७६ 

     एक श्रेष्ठ प्रेषित उत्तरेत जन्मला . तो म्हणजे सिक्खांचे गुरु गोविंदसिंह ! त्यांच्याजवळ कल्पक प्रतिभा होती .आपल्या तपोबलाने ते सिक्खांची मजबूत संघटना आपल्या पाठीशी उभी करू शकले . भारताच्या इतिहासात हे पुनः-पुन्हा आपण पहिले आहे की, धर्मजागरणाच्या पाठोपाठ ऐहिक वैभव येते . राजकीय ऐक्य घडते . आणि देशाच्या विराट भागाचे राजकीय ऐक्य हे पुनश्च आध्यात्मिक प्रेरणा बलशाली करते .      

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७५

          विवेकानंद अमृत ७५ 
     धर्म, तत्वज्ञान, शास्त्र यासंबंधी चर्चेसना जो काही उपदेश करायचा आहे तो पोटभर करूद्या . पण जेव्हा धर्माच्या व्यवहाराचा प्रश्न येईल, भक्तीचा प्रश्न येईल तेव्हा जीझसचे ते वचन स्मरणात असू द्या . ' प्रार्थना करावीशी वाटेल तेव्हा एकांतवासात जा, दार लाऊन घे आणि तिथे त्या एकांतात परमपित्याची आळवणी कर. '

बुधवार, १७ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७४

            विवेकानंद अमृत ७४

     योगी लोक सांगतात की, मन एका उच्च अवस्थेला - बुद्धीपलीकडच्या अवस्थेला जाऊन पोचले, उन्मन झाले की, तर्कापलीकडचे ज्ञान चित्तात येउन स्थिर होते . हे ज्ञान अतींद्रिय असते . मन-बुद्धीपलीकडच्या या समाधी-अवस्थेचे रहस्य न कळताही एखादी व्यक्ती अवचित या अवस्थेत जाऊन आदळते . 
     पण अशा रीतीने समाधी अवस्था प्राप्त होण्यात फार मोठा धोका आहे असे योगी म्हणतात .  

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७३

               विवेकानंद अमृत ७३

     महंमदाच्या हातून जगाचे जे काही भले झाले त्याचा विचार करा आणि त्याच्या धर्मवेडाने किती प्रचंड, अपरिमित नुकसान झाले याचाही विचार करा ! त्याच्या शिकवणुकीमुळे लक्षावधी लोकांच्या कत्तली झाल्या. माता आपल्या बछड्यांना मुकल्या, लाखो मुले पोरकी झाली. देशच्या देश बेचिराख झाले; कोटी-कोटी लोक जीवानिशी मारले गेले !

सोमवार, १५ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७२

            विवेकानंद अमृत ७२

     महंमद आणि इतर काही धर्मनेत्यांची चरित्रे वाचली की , हा धोका जाणवतो . तरीही त्या सर्वांमध्ये काही स्फुरण होते असेही दिसते . आपले भावविश्व संपन्न करीत एखादा प्रेषित जेव्हा भावावस्थेत जातो तेव्हा तो केवळ काही सत्ये प्राप्त करतो असे नव्हे तर काही भ्रम, धर्मपिसाटपणाही त्याच्या ठायी निर्माण होतो. अशा धर्मपिसाटपणामुळे जगाचे फार मोठे नुकसान झाले आहे . मनुष्य जीवनातील विसंगती पाहिल्यावर कळते की, मन हे बुद्धीच्या पलीकडे गेले पाहिजे - पण ते शास्त्रीय पद्धतीने, सावकाश, साधना करीत गेले पाहिजे . आणि सर्व भ्रम टाकून देऊन शुद्ध ज्ञानच हृदयात प्रकाशित झाले पाहिजे . 

शनिवार, १३ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ७१

            विवेकानंद अमृत ७१ 

     पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत नखशिखांत साहेबी बनलेल्या, साहेबी कल्पनांचे अनुकरण करणाऱ्या माझ्या इंग्रजाळलेल्या बांधवांनो ! तुमची मला शरम वाटते .युरोपियनांच्या पायाशी बसून लाचारीने अश्रू गाळीत तुम्ही त्यांना विनवीत असता, ' हे गौरकाय देवांनो! आम्ही दीन-हीन-पतित आहोत . पशुतुल्य जिणे जगत आहोत . आता तुम्हीच आमचे तारणकर्ते व्हा आणि या दीनवाण्या अवस्थेतून आमचा उद्धार करा ! '     

विवेकानंद अमृत ७०

           विवेकानंद अमृत ७०

     ' येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच फळाला येणार आहे! ' असे डंके पिटणाऱ्यानो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका. जिझसही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही . ते इथे येण्याची सुतराम शक्यताही नाही . आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही .  

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६९

             विवेकानंद अमृत ६९ 
     इथे तो पुरातन शिवसम्राटच पूर्ववत आसनस्थ आहे. रुधीरप्रिया कालीमातेचीच इथे समारंभपूर्वक पूजा होत आहे. तो यशोदानंदन गोपाल आपली मोहक मुरली वाजवितो आहे. या शिवाने एकदा वृषभावर आरूढ होऊन डमरूचा रुद्रनाद करीत सुमात्रा, बोर्निओ, सेलेबर, ऑस्ट्रेलियापर्यंत आणि अमेरिकेच्या दूर किनाऱ्यापर्यंत प्रवास केला होता. तसेच तिबेट, चीन, जपानपासून सैबेरियापर्यंत आपली मुद्रा उमटवली होती. आजही उमटवीत आहे. कालीची पूजा चीन आणि जपानमध्ये आजही चाललेली आहे. ख्रिश्चनांनी तिचे रुपांतर माता मेरीमध्ये केले आहे. ख्रिस्तमाता म्हणून तिची पूजा करतात. 

बुधवार, १० एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६८

             विवेकानंद अमृत ६८ 

     मी भविष्यात डोकावण्याचा खटाटोप करीत नाही. त्याची मला जरूरच वाटत नाही. मात्र एक उज्ज्वल दृश्य मला स्पष्टपणे दिसत आहे. ती चिरपुरातन मातृदेवता पुनरपि जागी झाली आहे. आपल्या श्रेष्ठ सिंहासनावर ती आरूढ झाली आहे आणि सर्व गौरवाने तळपत आहे. शान्तिमंत्रांनी आणि आशीर्वचनानी तिच्या आगमनाची त्रिभुवनाला ग्वाही देऊया . 

विवेकानंद अमृत ६७

           विवेकानंद अमृत ६७ 

     हिमालयाची ती उत्तुंग शिखरे पहा ! उत्तरेला शिवाचे निधान कैलास आहे . दहा तोंडाचा आणि वीस हातांचा महाबलाढय रावणसुद्धा ते शिवसिंहासन हलवू शकला नाही; मग बिचाऱ्या मिशनरयांचा काय पाड ? या भरतभूमीत भगवान शिवाचा डमरू सतत रुद्र्नाद करीतच राहील , कालीमातेला पशुबली दिले जातच राहतील आणि गोपालकृष्ण त्याची भुवनमोहिनी मुरली वाजवितच राहील ! हिमालयाइतकेच ते धृढ, अचल आहेत . ख्रिस्ती किंवा आणखी कोणा धर्मप्रचारकांनी आकाशपाताळ एक केले तरी ते त्यांना झळ पोचवू शकणार नाहीत . 

मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६६

            विवेकानंद अमृत ६६ 

     तुम्हाला जर ही दैवते सोसत नसतील तर रामराम ! तुमच्या सारख्या मुठभर करंट्यासाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे ? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे . शोध की तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला ! पण हे मुठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच ? तसे करायला हिम्मत लागते . ते या शिवाच्या भूमितच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कोण्या परक्या प्रेषिताचे गोडवे गातील !








सोमवार, ८ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६५

                      विवेकानंद अमृत ६५ 

      हे राष्ट्र उभे राहाणार ते कोणातून ? भंगी आणि चांभार यांच्यातून ! कोळ्यांच्या झोपड्यांतून नि शेतकऱ्यांच्या खोपट्यातून ! या नव्या भारताचे चैतन्य उसळणार आहे कुंभाराच्या भट्टीतून आणि वाण्याच्या दुकानातून ! याचे स्फुरण आहे कारखाने आणि बाजारपेठातून ! वनांतून आणि वनरायामधून . डोंगरदऱ्यामधून !

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६४

                      विवेकानंद अमृत ६४ 

     या देशातील जनसामान्यांनी हजारो वर्षे हूं की चूं  न करता अन्याय सहन केला आहे . त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य निर्माण झाले . त्यांनी अपरंपार सहन केले आहे , त्यामुळे त्यांच्यात दुर्दम्य शक्ती निर्माण झाली आहे . कांदा भाकर खाऊन ते जग जिंकू शकतील . पोटाला घासभर अन्न मिळाले तरीही त्यांची शक्ती, त्यांचा पराक्रम यांना जग अपुरे पडेल . 

विवेकानंद अमृत ६३

                          विवेकानंद अमृत ६३ 

     भूतकाळाच्या निर्जीव सांगाड्यानो ! हे भुमिपुत्रच तुमचे वारसदार आहेत . उराशी घट्ट धरून ठेवलेल्या त्या रत्नांच्या पेट्या खोला आणि ती रत्ने यांच्यावर उधळा . जेवढ्या लवकर हातातल्या त्या अनमोल अंगठ्या त्यांना देता येतील तेवढ्या लवकर देऊन टाका . 

विवेकानंद अमृत ६२

                     विवेकानंद अमृत ६२ 

     ख्रिस्ताच्या या थोर शिष्यांचे बिचाऱ्या हिंदूं असे काय गाठोडे मारले आहे  की, ज्यामुळे प्रत्येक लहान मुलाला शिकविले जाते की, हिंदू हे दुष्ट आहेत, भयानक वृत्तीचे राक्षस आहेत ? रविवारच्या धार्मिक शिक्षणाचा मुख्य भाग हा की, जे ख्रिश्चन नाहीत, त्यांचा द्वेष करायला लहान मुलांना शिकविणे ! हेतू एवढाच की, त्यांनी जमविलेला पै - पैसा मिशनला देऊन टाकावा . 

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६१

                          विवेकानंद अमृत ६१ 

     मिशनरी लोक हे हिंदूंची नितीहीनता, बालहत्या आणि हिंदू विवाहपद्धती याबद्धल जेवढे कमी बोलतील तेवढे बरे . दुसऱ्या काही देशांमधील प्रत्यक्ष चित्रे हही मिशनऱ्यांनी लिहिलेल्या हिंदुस्थानाविषयींच्या काल्पनिक चित्रांहून भयानक असण्याची शक्यता आहे . पण पगार घेऊन लोकांना शिवीगाळ करणे हे काही माझ्या जीवनाचे उद्दिष्ट नाही . 

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ६०

                         विवेकानंद अमृत ६० 

     विदेशातून आलेल्या मित्रांनो, तुम्ही खराखुरा सद्भाव मनात घेऊन सहाय्याला आला असाल, घात करायला आला नसाल तर परमेश्वर तुमचे कल्याण करो . पण सदा न कदा या हतबल जातीच्या माथी तुम्ही शिव्याशापांचा वर्षाव करणार असाल आणि आपल्या देशाच्या नीतीमत्तेचे डांगोरे पिटणार असाल तर मात्र तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे कि, इतर देशांच्या तुलनेत हिंदू नीतिमत्ता ही कितीतरी पट सरस आहे . 


मंगळवार, २ एप्रिल, २०१३

विवेकानंद अमृत ५९

                        विवेकानंद अमृत ५९ 

     तुमचे धर्मोपदेशक जेव्हा आमच्यावर टीका करतात तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे : जर हिंदुस्तानचा अभिमान जागा होऊन तो उभा राहिला आणि सिंधुसागरातील सर्व चिखल जरी त्याने पाश्चात्य राष्ट्रांवर फेकला तरी तुम्ही आमच्यावर जी राळ फेकली आहे त्याचे अंशतःसुद्धा परिमार्जन होणार नाही . तुम्ही आमच्या वाट्याला काय म्हणून जाता ! आम्ही तुमच्या देशात कधी मिशनरी पाठवलेत का ? 

विवेकानंद अमृत ५८

                       विवेकानंद अमृत ५८ 

     एवढ्या बढाया मारता , पण मुसलमानाहून तुम्ही काय वेगळे केले आहे ?  " आम्ही जगातले सर्वश्रेष्ठ ! "  " का बाबांनो ? "  " कारण आम्ही इतरांची हत्या करू शकतो ! " अरबांनी हेच केले . ते गर्वाने फुलले . आता कुठे आहेत अरब ?  ते बदाउनी झाले आहेत . रोमनांनीही आपल्या सामर्थ्याचा मोठा गर्व केला . कुठे आहेत ते रोमन ! अशी वाळूवरची साम्राज्ये अनेकांनी बांधली आणि ती धडाधड कोसळली , विजेते ठरले ते शांतीचे प्रणेते !