विवेकानंद अमृत ११६
आपल्याकडील एखादा महापुरुष निधन पावला तर दुसऱ्याचा अवतार होण्यासाठी आपल्याला शतकानुशतके वाट पहावी लागते . त्यांच्याकडे आज एक गेला की, लगेच त्याच्याजागी दुसरा उभा रहातो .आपल्याकडे मात्र महापुरुषांची वाण पडते . असे का ? कारण त्यांच्याकडे महापुरुषांच्या निर्माणाला मोठे क्षेत्र आहे आणि आपल्याकडे मात्र अगदीच मर्यादित क्षेत्र आहे . ज्यांची लोकसंख्या तीन, चार, सहा कोटी आहे अशा देशांच्या तुलनेत आपल्या तीस कोटींच्या देशात महापुरुषासाठी मर्यादित क्षेत्र आहे हे म्हणणे चमत्कारिक वाटेल . पण ते खरे आहे . कारण त्या देशांमध्ये सुशिक्षित स्त्रीपुरुषांची संख्या फार मोठी आहे . आपल्या देशातील ही त्रुटी फार गंभीर आहे . ती भरून काढली पाहिजे . तळागाळातील माणसांना शिक्षण देऊन वर आणले तरच हे राष्ट्र ' राष्ट्र ' म्हणून उभे राहू शकेल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा