बुधवार, २२ जून, २०१६

२३ . स्वदेशी

                                २३ . स्वदेशी

          एक वेळ आमची सत्ता हिंदी लोकांना देऊ पण व्यापार त्यांच्या हातात देणार नाही या ब्रिटीशांच्या नीतीकडे आजपर्यंत आमची नजर गेली नव्हती . स्वदेशाचा शत्रू आणि स्वदेशीचा शत्रू यात काही भेद नाही . देशाची उन्नती किंवा अभ्युदय स्वपराक्रमानेच प्राप्त करून घेण्यास आपण झटले पाहिजे . 
                                                                                                                             -  लोकमान्य टिळक 

         स्वदेशी हा शाश्वत धर्म आहे. त्याचा व्यवहार प्रत्येक युगात बदलत राहील आणि बदललाही पाहिजे. स्वदेशी हा आत्मा आहे. स्वदेशी एक सेवाधर्म आहे. हा सेवाधर्म आपण जर नीट समजून घेतला, तर आपले, आपल्या परिवाराचे, आपल्या देशाचे व सा-या जगाचे कल्याण होईल. स्वदेशीत स्वार्थ नाही, परमार्थ आहे. म्हणून मी त्यास यज्ञ मानतो.                                                                                                                                 - महात्मा गांधी
          स्वदेशीचा कार्यक्रम तात्पुरता नाही. तो स्वराज्याबरोबर सतत चालणारा आहे. परदेशांच्या हितासाठी हिंदुस्थानने आळशी, दरिद्री राहावे हा विचार कोणालाच पटणारा नाही. जर आपल्याला पोटभर खायला प्यायला आणि अंगभर वस्त्र लेऊन लज्जा निवारण व्हावयास हवे असेल तर यावेळी हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाने स्वदेशी धर्माचा अंगीकार केला पाहिजे. एक पुरुष परस्त्रीवर नजर टाकतो त्यासारखे परक्या देशांच्या वस्तुंवर नजर टाकणे हा व्यभिचार आहे.                                                                                               - महात्मा गांधी
         स्वदेशीची चळवळ हि देशभक्तीची व आर्थिक सुबत्तेची चळवळ आहे. मातृभूमि संबंधीचे उत्कट प्रेम स्वदेशीमधून प्रत्ययास येते. स्वदेशीतून मातृभूमीसाठी त्याग करण्याची शिकवण मिळते, समाजात बंधुभाव निर्माण होऊ शकतो व देशाची आर्थिक प्रगती साधणे शक्य होते. स्वदेशीचे प्रेम हे समाजातील सर्व थरांतील गटांपर्यंत पोहोचविणे हि देशाची आज नितांत गरज आहे.                            - नामदार गोपाळकृष्ण गोखले 

       परकीय मदतीच्या कुबड्या फेकून दिल्या तरच भारताची यापुढे प्रगती होऊ शकेल. कारण परकीय मदतीमुळेच आपल्या सवयीच बदलून गेल्या आहेत. आपल्याला स्वदेशीच्या महामंत्राचे पार विस्मरण होऊ लागलेले आहे. असे विस्मरण व्हावे अशीच विदेशी शक्तींची योजना आहे. भारताचे आर्थिक प्रश्न, परकीय मदत कमी पडत आहे म्हणून बिकट झालेले नसून अतिरिक्त परकीय मदत येत आहे, त्यामुळे आपण स्वदेशी आणि स्वावलंबन विसरत चाललो आहोत म्हणून निर्माण झालेले आहेत. ही मदत आपल्याला उपयुक्त ठरत नसून परकीय राष्ट्रांची मंदी, बेकारी दूर करून यांची अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी तिचा वापर होत असतो.   पं. दीनदयाळ उपाध्याय

     “ब्रिटिशांचा ताबा आणि त्यातून निर्माण झालेल्या वसाहतवादी मानसिकतेने भारताला त्याच्या आत्म्यापासून वेगळे करण्याचे अनेक प्रभावी प्रयत्न केले. पण ही भारतीय मनाची ही उपजत ऊर्जा आहे की हे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत.आजही स्वदेशी मूल्यांच्या आधारावर देश घडवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.”                                                                                  मा. धर्मपालजी 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा